“२०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मध्यस्थी एक प्रमुख साधन असेल आणि मध्यस्थी केवळ न्यायदानाला गती देत नाही तर न्यायालयांवरील भार सुध्दा कमी करते., असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. शनिवार, दि. ३ मे रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भारतीय मध्यस्थता संघटनेच्या शुभारंभ आणि ‘पहिली राष्ट्रीय मध्यस्थता परिषद २०२५’च्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
Read More
Ekta Kapoor चित्रपट निर्माती म्हणून नावारुपाला आलेल्या एकता कपूर यांना पद्मश्री देण्यात आला होता. मात्र, आता पद्मश्री पुरस्कार पुन्हा घ्यावा अशी मागणी करण्यात आली. भारताच्या विविध भागामध्ये १०८ वकिलांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना याबाबत एक पत्रही लिहिण्यात आले आहे.
: क्रिडाक्षेत्रात भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूंचा १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात सन्मान करण्यात आला. शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरास्कार सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय भारतीय पुरूष हॉकी संघाचे कर्णधार हरमनप्रीत सिंह यांना सुद्धा खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत
घटनाबाह्य शक्तींनी देशाच्या संविधानावर हल्ला करण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला. देशात २५ जून १९७५ साली लादण्यात आलेली आणीबाणीदेखील हा देशाच्या लोकशाहीवर हल्ला करण्याचा थेट प्रयत्न होता, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात केले.
जसजशी राममंदिराच्या लोकार्पणाची पवित्र घटिका समीप येत आहे, तसतसे काँग्रेससह ‘इंडी’ आघाडीतील पक्षांच्या पायाखालची वाळू सरकताना दिसते. ठाकरे आणि राऊत हे महाराष्ट्रातील बेताल बडबडेही त्याला अपवाद नाही. पण, प्रभू श्रीरामांचा, राममंदिराचा आणि आता कारसेवकांच्या बलिदानाला अपमानित करणार्या या राजकीय पक्षांचे मतपेटीतून लंकादहन केल्याशिवाय आता रामभक्त स्वस्थ बसणार नाहीत!
‘आयुष्मान भव’ या योजनेचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दि. १३ सप्टेंबर रोजी शुभारंभ केला. तसेच ‘आयुष्मान आपल्या दारी’ हा उपक्रम दि. १७ सप्टेंबर रोजी एका व्यापक देशव्यापी मोहिमेच्या रुपात सुरू झाला आहे आणि तो दि. ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. त्यानिमित्ताने ‘आयुष्मान भारत’ योजनेचे व्यापक यश अधोरेखित करणारा हा लेख....
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त ५ सप्टेंबर, २०२३ रोजी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले. शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळात राष्ट्रार्पित होणारी नव्या संसदेची वास्तू आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाची साक्षीदार आहे. ही वास्तू १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असून विकसित भारताचे स्वप्न साध्य करण्याची प्रेरणा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भारतीय संसदेच्या नव्या वास्तूच्या राष्ट्रार्पणप्रसंगी केले.
नवी दिल्ली : संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे यासाठी लोकसभा सचिवालयाला निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २८ मे रोजी हस्ते नवीन संसद भवनाचे राष्ट्रार्पण होणार आहे. त्याविरोधात वकील सी. आर. जया सुकीन यांनी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक रमेश पतंगे यांनी लिहिलेले ‘डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रविचार` हे पुस्तक आता संथाली भाषेतही अनुवादीत करण्यात आले आहे. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील प्रा. भीमराव भोसले यांनी सर्वप्रथम या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला. त्या आधारावर विश्वभारती विद्यापीठातील सगेन मंडी या संशोधकाने या पुस्तकाचा संथाली भाषेत अनुवाद केला आहे. ‘आंबेडकर, भारत बनाओ राकाब रिनीच उदगया` असे या पुस्तकाचे नाव असून दि. १७ एप्रिल, २०१९ रोजी झारखंडच्या तत्कालीन राज्यपाल आणि सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस
भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित केले. भारतीय स्वातंत्र्य लढा हा जागतिक इतिहासातील एक सुवर्णाध्याय आहे