(Online Allowance for Polling Staff) निवडणूकीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता ऑनलाईन भत्ता मिळणार आहे. पूर्वी हा भत्ता मतदान केंद्र अध्यक्षांकडून मतदान संपताच रोख स्वरूपात दिला जात होता.
Read More
(Women Controlled Polling Stations) केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार यंदा विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती देण्यात येणार आहे. महिलांचा मतदानातील सहभाग वाढावा, हा यामागचा उद्देश आहे.
महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून सर्व पूर्वतयारी पूर्ण होते आहे. या मतदान प्रक्रियेत एसटी बसेस महत्त्वाची भूमिका बजावतात. यावेळी, एमएसआरटीसी, बेस्ट आणि शाळेच्या बसेस वापरात येतात. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने एसटी प्राधिकरणाकडे सुमारे ९२३२ बसेसची मागणी केली होती, जेणेकरुन या बसेस १९ नोव्हेंबर रोजी मतपेट्या मतदान केंद्रापर्यंत सुरक्षित जाऊ शकतील आणि २० नोव्हेंबर रोजी मतदान संपल्यानंतर मतमोजणी स्थळी पुन्हा सुरक्षित पोहोचू शकतील.
( Kopri-Pachpakhadi )मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघात सद्यस्थितीत एकूण ३ लाख, ३८ हजार, ३२० मतदार आहेत. मागील २०१९ ची विधानसभा आणि नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक पाहता या मतदार संघात जेमतेम ५० ते ५६ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे २०२४ च्या या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
(Election Commission )लोकसभा निवडणुकीच्या मतदानप्रक्रियेवेळी मुंबईतील काही मतदान केंद्रावर गर्दी झाल्याने अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले होते. त्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरात २१८ अतिरिक्त केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ इतकी होईल.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी यावेळी थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयांमध्ये १९५ क्रमांकाचे मतदान केंद्र 'सखी मतदान केंद्र' म्हणून तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी महिला अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून त्या केंद्राची विशेष रचना तयार करण्यात आली आहे. रावेत येथील बबनराव भोंडवे शाळेमधील २३ क्रमांकाचे केंद्र तसेच वाकड येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील ३९५ आणि ४०५ क्रमांकाचे केंद्र आदर्श मतदान केंद्र (मॉडेल पोलिंग स्टेशन) म्हणून तयार करण्यात आले आहे.
शहर आणि जिल्ह्यात १० मतदान केंद्र महिला शक्तीच्या हाती सोपविण्यात आले आहेत
राज्यात एकूण ९७ हजार ६४० मतदान केंद्र असणार आहेत. राज्यात नव्याने दोन हजारांहून अधिक मतदान केंद्र वाढविण्यात आली असल्याने यंदा मतदार केंद्राची संख्या वाढली.
महाराष्ट्र विधानसभेचा पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या अक्कलकुवा मतदारसंघातील गाव व राज्यातील पहिल्या क्रमांकाचे मतदानकेंद्र असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील मणिबेली या गावाला राज्य आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एसडीआरएफच्या जवानांनी नुकतीच भेट दिली तसेच तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला.