नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांपैकी दोन भावंडं 'फ्रेडी' आणि 'अल्टोन' मध्यप्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये खेळताना दिसल्याचे, उद्यान प्रशासनाने सांगितले आहे. रविवार दि. १८ रोजी संध्याकाळी एका दिवसानंतर त्या सर्वांना भारतात आल्यापासून पहिल्यांदाच जेवण दिले गेले.
Read More
cheetah in india भारतातील आफ्रिकन चित्त्यांचे नवीन घर असलेल्या मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये २० ते २५ चित्त्याना राहण्यासाठी पुरेशी जागा आणि पुरेसा शिकार साठा असल्याचे एका वन अधिकाऱ्याने सांगितले आहे. ज्या अभयारण्याचे नाव कुठेच नव्हते, ते आज जागतिक बातम्यांचे केंद्र बनले आहे. नामिबियातून आणलेले आठ चित्ता - पाच मादी आणि तीन नर १७ सप्टेंबर रोजी कुनो नॅशनल पार्कमध्ये मोठ्या धूमधडाक्यात सोडण्यात आले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातील तीन चित्त्याना उद्यानातील एका विशेष बंदिस्तात सोडले.