Kashmir - Arunachal Partition देशद्रोही कृत्य करणारा काँग्रेस पक्ष रोज नव्याने काहीना काही कारणाने आपली लाज चव्हाट्यावर आणत आहे. काँग्रेसने एका पोस्टरमध्ये भारताच्या नकाशातून काश्मीर-अरुणाचल प्रदेश ही राज्ये नकाशातून काढून टाकण्यात आल्याचे दिसून येते. या प्रकरणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून हे फोटो बेळगावात झालेल्या काँग्रेसच्या संमेलनातील आहेत.
Read More
शरद पवारांनी आजवर केवळ दाढ्या कुरवाळण्याचेच राजकारण केले. खरा इतिहास सामान्यांसमोर कधीही येऊ दिला नाही. म्हणूनच देशाचे पंतप्रधान फाळणीचा दिवस हा ‘विभाजन विभीषिका स्मृती दिवस’ म्हणून साजरा करा, असे एकीकडे आवाहन करत असताना, दुसरीकडे शरद पवार हे फाळणीचा इतिहास नव्या पिढीला शिकवण्याची काहीही गरज नाही, असे वक्तव्य करतात. असे हे पवारांचे दडवा आणि दडपाचे राजकारण!
देशाच्या फाळणीचा रक्तरंजित इतिहास, भारतीय नागरिकांचा संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ १४ ऑगस्ट हा विभाजन विभीषिका स्मृती दिन असावा असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. त्या अनुषंगाने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्देशानुसार इंडियन बँकतर्फे फाळणीच्या भीषण आठवणींचे आणि इतिहासाचे हृदयद्रावक चित्रण एका फोटो प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आले. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या प्रदर्शनाचे उदघाटन केले.
फाळणी स्मृती दिन हा देशाच्या फाळणीत ज्या भारतीयांनी प्राणांचे बलिदान दिले, त्या भारतीयांचे श्रद्धेने स्मरण करण्याचा एक प्रसंग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले.
जे अस्मिता जागरण नरेंद्र उर्फ स्वामी विवेकानंदांनी केले आणि जे जागरण महात्मा गांधीजींनी शेवटच्या पंगतीतील निरक्षर माणसांपर्यंत पोहोचविले, त्या जागरणाची मशाल नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी हातात उंच धरली आहे. हा जागरणाचा प्रकाश अत्यंत तेजस्वी आहे आणि त्यामुळे काळ्या इंग्रजांना जे करणे जमले नाही, ते नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले आहे.
दि. २७ ऑक्टोबर, १९१९ला खिलाफत चळवळ (१९१९-१९२४) खर्या अर्थाने सुरू झाली. हा दिवस देशभरात ‘खिलाफत दिवस’ म्हणून पाळण्यात आला. त्या वर्षभरात हिंदुस्थानच्या राजकारणात मोठे स्थित्यंतर झाले. ‘टिळकयुगा’चा अस्त होऊन ‘गांधीयुगा’चा उदय झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांत, गांधींनी खिलाफत चळवळ ज्या दृढनिश्चयाने आणि श्रद्धेने उचलून धरली, तिने अनेक मुस्लिमांना आश्चर्यचकित केले असेल. (पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया, बी.आर. आंबेडकर, ठाकर अॅण्ड कंपनी लि. १९४५, पृ. १३६) खिलाफत चळवळीला नुसता पाठिंबा देऊन गांधी थांब
आज भारत मुळी झोपलेलाच नाहीये. दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास, बंगलोर, लखनऊ, इंदूर, पाटणा, बडोदे, नागपुर..... किती म्हणून नावं घ्यावी. अक्षरशः काल रात्री पासून, देशाच्या कानाकोपऱ्यात जल्लोष आहे. आणि म्हणुनच या पार्श्वभूमीवर, काल आणि आजचा, पाकिस्तान मधे दिसून आलेला निरुत्साह, डोळ्यात भरतोय..!
कलकत्त्या जवळच्या सोडेपूर आश्रमात, गांधीजींच्याबरोबर थांबलेल्या लोकांमध्ये परमा एकादशी करणारे दोघे / तिघेच आहेत. त्यांच्यासाठी खास फराळाची व्यवस्था होतेय. गांधीजींच्या मनात मात्र काल रात्रीची सुह्रावर्दी बरोबरची भेटच घोळतेय.