शंभर कोटी वसुली प्रकरणी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या परमवीर सिंह यांचं राज्य सरकारने अखेर निलंबन केले आहे.
Read More
सर्वोच्च न्यायालायाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. परमवीर सिंह यांनी देश सोडला नसून ते भारतातच आहेत, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. तसेच तपास सीबीआयकडे सोपविल्यास परमवीर ४८ तासांत हजर होतील. मुंबई पोलीसांपासून त्यांना कारवाईचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट्यवधींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी राज्याच्या गृहमंत्री पदावरून पायउतार झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे ‘सक्तवसुली संचलनालया’कडून (ईडी) होणार्या चौकशीला टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.
एसीबीने अभिषेक दुलार यांच्या नेतृत्वाखालील सीबीआय टीम
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार असून १५ दिवसांत प्राथमिक चौकशीचा तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत बोलताना, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाप्रकरणी सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादातून जाहीर झालेली भूमिका गोंधळलेली आहे. त्यातून एकवेळ कायदेशीर लढाईत बाजू सावरली गेली असली, तरी सरकारने केलेला युक्तिवाद म्हणजे स्वतःच्या नैतिक पराभवाची कबुलीच समजली पाहिजे.
राज्यसरकारमध्ये सचिन वाझे यांच्यासारखे आणखी किती अधिकारी दडले आहेत?" असा सवाल भाजपा प्रदेशउपाध्यक्ष माधव भंडारी यांनी उपस्थित केला. परमवीर सिंग यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना पक्षकार करून घेण्याचे दिलेले निर्देश अत्यंत महत्वाचे असून देशमुख यांच्या उलट तपासणीतून अनेक गोष्टींवर प्रकाश पडू शकतो, भंडारी यांनी म्हटले.
परमवीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राष्ट्रवादी आणि सरकारच्या पातळीवर डॅमेज कंट्रोलसाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते सरकारची बाजू लावून धरताना दिसत आहेत; मात्र काँग्रेस हवे तसे सक्रिय दिसत नाही. संबंधित प्रकरणात काँग्रेसमध्ये कुठेतरी नाराजी असल्याचे दिसते.
परमवीर सिंह यांच्या 'लेटर बाॅम्ब'चे पडसाद आज लोकसभेतही उमटले. यावेळी या प्रकरणावरुन शिवसेना आणि भाजपा खासदार एकमेकांशी भिडले. यावेळी भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून अशाप्रकारे राज्याच्या गृहमंत्र्यांवर विरोधातच असा दावा करणे, हे अतिशय गंभीर प्रकरण असून, या प्रकरणी अनिल देशमुख यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करावा व परमवीर सिंग यांनी आपल्या पत्रात नमूद केलेल्या प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी करावी अशी मागणी करत, मुंबई भाजपा प्रभारी अतुल भातखळकर यांनी समता नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
शिवसेनेच्या मते, परमवीर सिंह ‘आज’ भाजपचे झाले असतील, तर ‘काल’ त्यांना कोणी डोक्यावर घेतले होते? शिवसेनेनेच ना? संजय राऊतांपासून उद्धव ठाकरे, परमवीर सिंहच नव्हे, तर सचिन वाझेदेखील कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचे भुवया उडवत, शेलकी शब्दफेक करत सांगत होतेच ना? आज मात्र सिंह यांनी खंडणीखोरांना उघडे पाडले नि शिवसेनारूपी लैला त्यांना ‘बेवफा’ म्हणू लागली.
राज्याच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमवीर सिंगांच्या पत्रातून गंभीर आरोप
पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची उचलबांगडी
सचिन वाझे प्रकराणानंतर महाविकास आघाडीत खलबत सुरू आहेत. तसेच यासंदर्भातील बैठकांचा जोरदेखील कालपासून वाढला आहे. आज सकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत असल्याने, त्या ठिकाणी मुंबई पोलीस आयुक्ताचा बळी देऊन हे प्रकरण निस्तारण्याचा महाविकासआघाडी कडून प्रयत्न सुरू असल्याची म्हटले जात आहे.