महिलांच्या न्यायासाठी राज्य सरकारने महिला आयोग आपल्या दारी हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. मंगळवार, १५ एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा तीन दिवसांचा पुणे जिल्हा दौरा सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमा अंतर्गत पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी घेण्यात आली.
Read More
मुंबई-पुणे प्रवास वेगवान करण्याच्यादृष्टीने ६,६९५ कोटी रुपयांच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असलेल्या केबल-स्टेड ब्रिजचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, या प्रकल्पाची अंतिम मुदत आता मार्च २०२५पर्यंत वाढणार असल्याने मुंबई-पुणे प्रवाशांना सुरळीत प्रवासासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. केबल स्टेड व्हायाडक्ट बांधणे वेगवान वाऱ्याच्या प्रवाहामुळे आणि दरीच्या खोलीमुळे अत्यंत आव्हानात्मक आहे.
लैंगिक हिंसाचार समस्यांकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 'दिलासा' केंद्रांचा विस्तार करण्यात येणार आहे. लैंगिक हिंसाचाराला सामोरे जावे लागणाऱया महिलांना त्यांच्या घरानजीक व अधिकाधिक प्रमाणात प्रतिसाद आणि वैद्यकीय त्याचप्रमाणे कायदेशीर सेवा पुरवता यावी, या दृष्टिकोनातून 'बीएमसी'च्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नवीन उपक्रम हाती घेतला आहे.
कल्याणात येत्या शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत साई हॉल, वायले नगर, कल्याण पश्चिम येथे रोजगार आपल्या दारी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने हा मेळावा होत आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील तब्बल 4 हजार संधी उपलब्ध होणार आहेत. ज्यामध्ये खासगी क्षेत्रासोबतच शासकीय विभागातीलही निवडक पदांसाठी इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत.
'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ येथे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमातुन मोठी घोषणा केली. महात्मा जोतिराव फुले योजना ३ लाखाची होती ती ५ लाखाची करण्यात आली आहे. सर्वांना ही योजना लागू होणार आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध असणार आहेत. गेल्या अडीच वर्षात एकही सिंचन प्रकल्प मंजूर झाला नव्हता. पण, आपलं सरकार आल्यानंततर ३५ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जेजुरी येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नागरिकांना ६९ स्टॉल्सद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. येथील विविध दालनांमध्ये नागरिकांना शासनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक योजनांची ओळख करुन देण्यात आली.
नुकताच पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. तसेच या कार्यक्रमांतर्गत आयोजित महारोजगार मेळाव्यात ६३९ उमेदवारांची रोजगारासाठी निवड करण्यात आली.
राज्य सरकारच्या "शासन आपल्या दारी" उपक्रमांतर्गत राज्यातील नागरिकांना घरपोच रेशन मिळणार असून याची सुरुवात ठाणे आणि मुंबई या शहरातून करण्यात येणार आहे. "शासन आपल्या दारी" या उपक्रमाच्या धर्तीवर आता रेशन आपल्या दारी हा उपक्रम राबविला जाणार आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून तशा पध्दतीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
कुठल्याही जाहिरातीमुळे वाद होईल इतकं तकलादू सरकार आमचं नाही. शिंदे आणि माझा प्रवास २५ वर्षांचा आहे. शिंदे आणि माझ्या एकत्र प्रवासाची चिंता नको. असं प्रत्त्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना दिलं आहे. पालघरमध्ये 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात ते बोलत होते.
"आमच्या युतीत मिठाचा खडा एक वर्षापूर्वी टाकला होता,तो आम्ही फेकून दिला. माझी आणि देवेंद्र फडणवीसांची दोस्ती आताची नाही. ते आमदार आणि मी आमदार होतो, तेव्हापासून आमची मैत्री होती. हा फेव्हिकॉलचा जोड आहे, कितीही प्रयत्न केले तरी दोस्ती तुटणार नाही. काही लोक म्हणतात जय विरुची जोडी. पण ही जोडी युतीची आहे. काही लोक स्वार्थासाठी एकत्र आले होते त्यांना जनतेने दूर केले." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्त्युत्तर दिलं आहे. ते पालघरमध्ये बोलत होते. पालघरमध्ये शासन आपल्या दारी योजनेचा कार्यक्रम पालघरमध
(Sarkar Tumchya Dari) राज्यातील फडणवीस शिंदे सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील महिलांच्या सन्मानार्थ अनेक महत्त्वपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीसह विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. महिला बालविकास खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या विभागाच्या माध्यमातून युवती, महिला आणि बालिकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेत महिलांचा सन्मान करत त्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला आहे.
राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने सध्या महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार आपल्या दरबारी हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत मुंबईतील अनेक भागांमध्ये थेट महिलांमध्ये जाऊन त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचा मंत्री लोढा यांचा प्रयत्न असून त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण प्रभागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर अर्थात सरकार आपल्या दारी या उपक्रम अंतर्गत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाल
'सरकार आपल्या दारी उपक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार कार्यक्रमात १५०० तक्रारी आज दाखल झाल्या असून २०० अर्जदार महिलांनी आपल्या समस्या महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये मांडल्या. स्थानिक प्रशासनाने १५०० तक्रारी पडताळून घेऊन यावर तातडीने कार्यवाही करावी, ज्या महिलांना रोजगाराची आवश्यकता आहे त्यांना रोजगार मार्गदर्शन करावे तसेच निराधार महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभ देता येवू शकतो ही माहिती द्यावी अशा सूचना महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात
गृहस्थाश्रमात पत्नीचे स्थान सर्वात मोठे आहे. घरातील स्त्री ही मजबूत, खंबीर व धाडसी असेल, तर पुरुष कधीही डगमगणार नाही. तो आपल्या कार्यात तितकाच धैर्याने पुढे जाईल व यशस्वी होईल. म्हणूनच विचारवंतांनी म्हटले आहे की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक यशस्वी स्त्री उभी असते. तेव्हाच तो पुरुष विविध क्षेत्रांतील प्रगतीची शिखरे गाठू शकतो. यासाठीच पुरुषाची जीवनसंगिनी म्हणजेच अर्धांगिनी तितकीच धैर्यशील हवी.
नेटवर्क नाही म्हणून स्वप्नाली सुतार डोंगरावर झोपडीत करत होती अभ्यास, सरकारने केली थेट केबल जोडणी
‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत आहे. वाचकांना घरापर्यंत पुस्तक उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला.