केंद्र सरकार स्वच्छ ऊर्जा रूपांतरणासाठी छोट्या अणुभट्ट्यांसारख्या नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. बुधवारी संसदेत ही माहिती देण्यात आली. केंद्रीय अणुऊर्जामंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, अणुऊर्जा हा वीज निर्मितीसाठी सर्वात आशादायक स्वच्छ ऊर्जा पर्यायांपैकी एक मानला जातो. आगामी काळात जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करू शकणाऱ्या अणुऊर्जेचा वापर करण्याच्या धोरणावर जगभरात भर पडत आहे.
Read More