विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे तिन्ही भाग कायम दुष्काळमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशिर्वादाची गरज आहे. पुढच्या काळातही केंद्र सरकार मदत करेल. येणाऱ्या काळात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नाही. असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
Read More
२०१४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यापासूनच देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करण्याचे काम करत आहेत. २०१४ मध्ये लोकसहभागातून सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेने महाराष्ट्रातील अनेक गावांना दुष्काळाच्या दृष्टचक्रातून बाहेर काढले आहे. त्यातच आता आणखी एका मोठ्या प्रकल्पाची भर पडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे अनेकांना पोटदुखी झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरच्या शिर्डी दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी दौऱ्यात निळवडे धरणाचं लोकार्पण केलं. या लोकार्पणानंतर आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी कार्यक्रमात बोलताना शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीचे पडसाद अवघ्या महाराष्ट्रभर उमटले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही त्याचे राजकीय परिणाम दिसून येतील, यात शंका नाही. तेव्हा, शिंदे यांच्या बंडाळीनंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा कानोसा घेण्याचा केलेला हा प्रयत्न...
नाशिक येथे आयोजित ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात शहरातील तब्बल २५० ते ३०० कलाकारांचा सहभाग असलेली ‘आनंदयात्रा’ विशेष आकर्षण ठरणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील साहित्यिक, त्यांच्या साहित्याचे प्रातिनिधिक प्रतिबिंब यातून उमटणार असल्याचे सांस्कृतिक समितीप्रमुख, दिग्दर्शक सचिन शिंदे आणि विनोद राठोड यांनी बुधवारी पत्रकार परिषेत सांगितले
मायेची ऊब देणारे घराबाहेरचे घरकुल
नवीन सरकार स्थापणेबाबत भाजप शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वात बोलणी सुरूच असताना राज्यात पुन्हा आलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वच राजकीय पक्ष शेतकर्यांच्या मदत कार्यात उतरल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापना आणखी काही दिवस पुढे गेल्याचे दिसते आहे.
नाशिक येथील कृषी वर्ग, जळगाव येथील सोने व्यापार आणि कृषी व्यवसाय, धुळे आणि नंदुरबार मधील वनवासी बहुल समाज आणि अहमदनगर जिल्ह्यातील सहकार आणि कृषीआधारित जनजीवन यांचा संगम म्हणजे उत्तर महाराष्ट्र होय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
महाराष्ट्र राज्य हे त्यातल्या बऱ्याच विभागांमध्ये पावसाची कमतरता आणि पाण्याचे दुर्भिक्ष असलेला प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. एका बाजूला ठाणे आणि मुंबईसकटचा कोकण प्रांत आहे जिकडे वर्षाचे सरासरी पर्जन्यमान हे २५००-३००० मिमी असते. कोल्हापूरसारखा पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेश आहे, जिथे वार्षिक पर्जन्यमान हे १०७० मिमी असते. महाबळेश्वरसारख्या प्रसिद्ध उंचावरच्या ठिकाणी पाऊस ५८२० मिमी असतो. (या वर्षी तिथे ७०५० मिमी इतका पाऊस पडला.) आणि एका बाजूला मराठवाडा, विदर्भ, आणि उत्तर महाराष्ट्रासारखी क्षेत्र आहेत, जिथे अनुक्रम
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्रातही असाच घोळ झाला होता. प्रथम तपासणीत १० पेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थीदेखील पेपर पुनर्तपासणी झाल्यावर उत्तीर्ण झाले होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्यासन स्थापन करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजुरी दिली असून त्यासाठी 1.25 कोटी रुपयांचे अनुदान मान्य केले आहे.
1930 मध्ये झालेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला स्वतंत्र राज्यघटना हवी आणि मतदानापासून वंचित असणार्या वर्गांना मतदानाचा हक्क हवा अशी ठाम भूमिका मांडली व इंग्रज मंत्री परिषदेने या भूमिकेला सहमती दर्शवली.
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो (महिला) स्पर्धेच्या दुसर्या दिवशी पहिल्या सत्रात महाराष्ट्रातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि सोलापूर विद्यापीठ या 4 विद्यापीठांनी बाद फेरीत विजय प्राप्त केले.
महिलांनी अडचणींना तोंड देत सरावासह खेळामध्ये ठसा उमटवावा
केरळातील कालिकत येथे शनिवारी संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत भारोत्तोलन या खेळात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशांत कोळीने सुवर्णपदक प्राप्त केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात सुरु झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ टेबल टेनिस (महिला) स्पर्धेत उद्या गुरुवारी सकाळच्या सत्रात बाद फेरीतील सामने संपल्यानंतर या फेरीतील चार संघ साखळी फेरीत प्रवेश करतील.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ टेबल टेनिस (महिला) स्पर्धेचा पहिला दिवस महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या महिला खेळाडूंनी गाजवला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी बी. पी. पाटील यांची निवड करण्यात आली असून, सोमवारी त्यांनी प्रा.ए.बी.चौधरी यांच्याकडून या पदाची सूत्रे स्वीकारली.