(Cancer awareness campaign at kalyan and dombivali) राज्य सरकार आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहिम पार पडली. या मोहिमेला आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला आणि असंसर्गजन्य रोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांच्या पुढाकाराने ही मोहीम पार पडली.
Read More
BJP mandal adhyksha in dombivali भाजपने एकाच दिवशी संपूर्ण राज्यभरात मंडल अध्यक्षांची निवड केली. पक्षाने केलेल्या नवीन रचनेनुसार आता मंडलाची संख्या वाढली आहे. ‘100 बूथसाठी एक मंडल, एक अध्यक्ष,’ अशी निवड केली आहे. भाजपचे ध्येय ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ हे आहे. नवीन रचनेनुसार भाजपचे बूथ आणखीन मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे. त्याचा फायदा आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला होणार आहे. एकूणच भाजपमधील हे परिवर्तन पाहता महापालिका निवडणुकीसाठी पक्षाने कंबर कसली असल्याचे स्पष्ट होत आहे.
( woman raped by rickshaw driver in dombivali ) एका गतीमंद तरुणीवर एका रिक्षा चालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना डोंबिवलीत घडली आहे. आरोपी रिक्षा चालक फैजल खान याला टिळकनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने अटक केली आहे. कोर्टाने आरोपीला १४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
( Chhatrapati Shivaji Maharaj statue to be unveiled today in dombivali ) ‘कडोंमपा’च्या डोंबिवली विभागातील घरडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण सोमवार, दि. १७ मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
‘सहकार बिना नहीं उद्धार’ या वचनाला जागत नागरिकांच्या गरजा भागवून ‘डोंबिवली मध्यवर्ती सहकार भांडार’ या संस्थेला विकासाकडे नेण्याचे काम नि:स्वार्थीपणे आजवर कार्यकत्यांनी केले. त्यांच्या या कार्यावर आजच्या ‘जागतिक ग्राहक दिना’च्या निमित्ताने प्रकाश टाकणारा हा लेख...
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी केली चर्चा 15 डब्यांच्या गाड्या, महिला विशेष लोकल Kalyan Ladies Special Local सोडण्याची केली मागणी.
मंत्री रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवली विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या वतीने उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केला. चव्हाण यांच्या डोंबिवली पश्चिमेतील जनसंपर्क कार्यालयापासून रॅली काढण्यात आली होती. भव्य शक्तीप्रदर्शन करत मंत्री रविंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ढोलताशा आणि लेझीमच्या गजरात चव्हाण यांनी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात येत होती.
(Dombivali) नवरात्रीचा समारोप विजयादशमीच्या दिवशी होतो. अखेरचा दिवस असल्याने गरबा प्रेमींनी डोंबिवलीच्या सावळाराम क्रीडा संकुलात नमो - रमो गरबा महोत्सवाला मोठी गर्दी केली होती. दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी या गरबा महोत्सवात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. यंदाही हा क्षण आपल्या मोबाईल मध्ये टिपण्यासाठी हजारो डोंबिवलीकरांनी मोठया संख्येने गर्दी केली होती. डोंबिवलीचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते रावणाचा अग्निबाणाने वध करण्यात आला.
( Ratan Tata )उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानिमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यात एक दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत महायुतीकडून आयोजित करण्यात येणाऱ्या रास दांडिया आणि गरब्याचा कार्यक्रम गुरूवारी रद्द करण्यात आला आहे. गुरूवारी सायंकाळी पारंपारिक पध्दतीने देवीची आरती करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
(Namo Ramo Navratri Garba) गेल्या सात वर्षांपासून डोंबिवलीतील ह. भ. प. सावळाराम क्रीडा संकुलात राज्याचे विद्यमान सार्वजानिक बांधकाम मंत्री तथा डोंबिवलीचे लोकप्रिय आमदार रविंद्र चव्हाण राज्यातील सर्वात मोठा आणि विशाल गरबा उत्सव म्हणुन नावारूपास आलेला नमो रमो नवरात्री गरबा नाईटस् अणि नमो रमो रमजट हा भव्य उत्सव आयोजित करतात. गेल्या सात वर्षांपासून हा उत्सव डोंबिवलीमध्ये आनंदाचे आणि एकात्मतेचे प्रतीक बनला आहे.
(Rasrang 2024) डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली आयोजित ''रासरंग - २०२४'' हा नवरात्रोत्सव गुरूवारपासून रंगणार आहे. यंदाही अधिक भव्यतेने आणि कलात्मक पद्धतीने या महोत्सवाचे ३ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत डोंबिवली येथील डी. एन. सी. शाळेच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. यंदाही नैतिक नागदा यांचे जल्लोषमय संगीत हे प्रमुख आकर्षण असणार आहे.
(Bangladeshi) घुसखोरी केलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शाबीर शेख, तौफीर शेख, लकी शेख आणि रुकसाना शेख अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींची नावे आहेत. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी सर्वच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ता निवडणूकीसाठी आपण इच्छुक असल्याचे खुलेपणाने सांगत आहेत. मात्र याला शरद पवार गट अपवाद आहे. शरद पवार गटातही अनेकजण पक्षाकडून उमेदवारीचे तिकीट मिळावे यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्याबाबत त्यांच्याकडून खुलेपणाने कोणतेच वक्तव्य केले जात नाही. एकूणच विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीदेखील मौन बाळगले आहे. इच्छुकांची नावे बाहेर आली तर फाटाफूट होईल या भितीमुळे मौन बाळगल्याची चर्चा आहे.
चिन्मय प्रताप पाटील याने भारताला ‘ऑलिम्पिक’ पदक मिळवून देण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. त्यासाठी तो कशी तयारी करत आहे, त्याची आजपर्यंतची कारकिर्द यावर प्रकाश टाकणारा हा लेख.
उद्धव ठाकरे आज १३ जानेवारीला कल्याण डोंबीवलीच्या दौऱ्यावर आहे. कल्याण डोंबिवलीतील उबाठा गटाच्या शाखांना ते भेट देणार आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. उद्धव ठाकरेंच येथे स्वागत आहे अस ते यावेळी म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे, डोंबिवलीतील अतिश अविनाश कुलकर्णी यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश...
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा 'महा विजय २०२४' संपर्क अभियानांतर्गत घर चलो अभियान कार्यक्रमात नागरिकांसोबत संवाद साधला. या संवादातून त्यांनी नागरिकांच्या मनातील पंतप्रधान कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्वात जास्त पसंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाला मिळाल्याचे दिसून आले.
श्वान निर्बीजीकरणावर कल्याण-डोंबिवली महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, तरीही शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत (मे २०२३ पर्यंत) भटक्या श्वानांनी ४८ हजार, १४ जणांचा चावा घेतला आहे. शहरातील वाढत्या भटक्या श्वानांची दहशत पाहता निर्बीजीकरणावर केला जाणारा खर्च याविषयी साशंकता निर्माण होत आहे. निर्बीजीकरणावर एवढा खर्च केला जात असला तरी शहरातील भटक्या कुत्र्यांची दहशत अजिबात कमी झालेली नाही.
नवरात्र उत्सवात स्त्री शक्तीचा जागर केला जातो. पण आपल्या समाजाचा एक घटक असलेल्या किन्नरांना मात्र नेहमीच दुजाभावाने वागवले जाते. आपल्या समाजातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या किन्नरांना मानाचे स्थान देत डोंबिवलीतील दत्तनगर मित्र मंडळ व माऊली मित्र मंडळाने नवरात्री उत्सवात किन्नर समाजाला देवीच्या आरतीचा मान देत एक नवीन पाऊल उचलले आहे. या मंडळाने दिलेला सामाजिक संदेश शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
भारतात जवळपास वर्षभर काहीना काही उत्सव-सोहळे यांची धूम असतेच. त्यामुळे परदेशी लोक भारताला ‘उत्सवांचा देश’ म्हणूनही संबोधतात. पावसाळ्याच्या मध्यापासून पीकपाणी उत्तम होत असताना उत्सवांची रेलचेल सुरू होते. त्यात गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा, दिवाळी या महाउत्सवांचा विशेष उल्लेख करता येईल. या महाउत्सवांना काही वर्षांपूर्वी सार्वजनिक तसेच व्यावसायिक स्वरुप प्राप्त झाले.
स्वच्छ, सुंदर आणि मोकळे स्वर आणि शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाची सुरीली बैठक असलेल्या अबोली ठोसर यांनी रसिकमनांवर अधिराज्य गाजविले, त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया...
जसजशी मुंबई विस्तारीत गेली, तशी कल्याण-डोंबिवली ते अगदी कर्जत-कसार्यापर्यंत वस्ती वाढत गेली. परंतु, लोकसंख्या वाढीचा वेग आणि या शहरांच्या विकासांचा ताळमेळ मात्र बसला नाही. २०१४ पासून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आणि राज्यातील फडणवीस सरकारने कल्याण-डोंबिवलीच्या विकासाची गोठलेली प्रक्रिया गतिमान केली. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांत कल्याण-डोंबिवलीत अनेक विकास प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. त्यांचाच या लेखात घेतलेला सविस्तर आढावा...
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत डोंबिवली पूव्रेतील घरडा सर्कल ते आर. आर. रूग्णालय येथे र्पयतच्या रस्त्यांच्या कॉक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कामामध्ये रस्त्यांचे खोदकाम न करता डांबरी पृष्ठभागावरच अल्ट्रा थीन व्हाईट टॉपिंग (युटीडब्ल्यूटी)या कॉक्रीटच्या थराचे काम करण्यात येते. या पध्दतीमुळे वेळेची बचत होत असून नागरिकांची होणारी सोय आणि खोळंबा टळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सावजर्निक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने डोंबिवलीत प्रथमच या तंत्रज्ञानाच्या आधारे क
कल्याण डोंबिवली महापालिकेची मालमत्ता आणि पाणीपट्टी करापोटी येणारी थकबाकी वसूल करण्याकरिता महापालिका प्रशासनाकडून अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत महापालिकेस मालमत्ता आणि पाणी पट्टीच्या करापोटी १८०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. या अभय योजनेतंर्गत दिलेल्या मुदतीत थकबाकीदार थकबाकीची रक्कम भरु शकतात. या योजनेचा लाभ घेणाऱ्या थकबाकीदाऱ्याच्या थकबाकीवर लावण्यात आलेल्या व्याजाच्या रक्कमेत ७५ टक्के व्याज माफ केले जाणार आहे, अशी माहिती कडोंमपा आयुक्त डॉ. भाऊसाहेब दा
अणुऊर्जा प्रकल्प स्थापत्य अभियांत्रिकी विशेषतज्ज्ञ म्हणून डोंबिवलीचे माधव हरी जोशी यांची ख्याती. अणुऊर्जा, रसायन आणि कृषी क्षेत्रांमध्ये त्यांचे संशोधनकार्य महत्त्वाचे आहे. त्यांच्याविषयी...
ठाणे जिल्ह्यात खेळाचा दर्जा प्राप्त झालेली पहिली महापालिका म्हणून कल्याण-डोंबिवलीचे नाव घेतले जाते. यासाठी योगदान देणारे आणि खेळाडूंच्या हक्कांसाठी लढणारे लक्ष्मण इंगळे यांच्या वाटचालीचा घेतलेला आढावा...
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत ‘अमृत मिशन योजने’अंतर्गत २७ गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेने उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी ठेकेदाराला सुरू असलेल्या सर्व जलकुंभाची कामे एप्रिल २०२३ अखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सामाजिक संस्थांना आर्थिकबाबतीत ‘आत्मनिर्भर’ करण्याचा मानस बाळगणारे आणि आपल्या शिक्षणाचा फायदा तळागाळातील लोकांना व्हावा, यासाठी प्रयत्नरत डॉ. राहुल अनंत भांडारकर यांच्या समाजसेवेचा प्रवास...
शारदीय नवरात्रोत्सवात आज सरस्वतीपूजन. सरस्वतीचं एक प्रतिभासंपन्न रूप म्हणजे प्रतिभाताई! ज्यांनी केवळ आध्यात्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिलेले आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांचा डोंबिवली भिवंडी बोटीने प्रवास
संततधार पावसामुळे ठाणे शहरातील रस्त्यावरील बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले असून प्रशासनाच्या रस्ते डागडुजीवर पाणी फेरले आहे.
ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील ४० नगरसेवकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. दिपेश म्हात्रे,माजी महापौर विनिता राणे अशा कल्याण,डोंबिवलीतील शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणे पसंत केले. येत्या काळात कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने कल्याणाच्या सत्तेचा बुरुज राखण्याचे आव्हान ठाकरेगटा पुढे उभे राहिले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वागणुकीतून पक्षासाठी त्याग व समर्पण भावनेचा आदर्श घालून दिला आहे.
कल्याण पश्चिमेतील रामबाग लेन क्र.1 मध्ये बुधवारी इमारत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही दोन मजली इमारत कोसळल्यानेे परिसरात खळबळ उडाली. या दुर्घटनेत एका व्यक्तीच्या मृत्यूसह एक जण जखमी झाला आहे. या धोकादायक इमारतीत सूर्यभान व उषा काकड हे दाम्पत्य झोपेत असतानाच हा प्रकार घडल्याने दोघेही ढिगार्याखाली अडकले. नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. दोन इमारतींचा सामायिक जिना असल्याने मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी व जवानांनी काकड दाम
कल्याणच्या रामबाग लेन परिसरात धोकादायक इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झाल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग येते आणि त्यानंतर थातुरमातूर प्रयत्न केले जातात. मात्र, धोकादायक इमारतींमधील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीच राहतो. त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. परिणामी, या इमारतींमधील नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. 2010 साली मनपा हद्दीत 684 धोकादायक इमारती होत्या. या धोकादायक इमारती खाली कर
डोंबिवलीतील शिवसेना उपशहरप्रमुख राम मिराशी यांची तब्येत २१ तारखेला अचानक बिघडल्याने त्यांना डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिराशी यांची तब्येत बिघडल्याची माहिती शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मिळाली. २३ तारखेला सायंकाळी साडे पाच वाजता शिंदें यांनी थेट एम्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांना फोन केला. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची काळजी घ्या, असे सांगून मिराशी यांच्या उपचाराविषयी माहिती घेतली.
लोकांमध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हे ध्येय घेऊन ‘मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर’ व ‘मनोदय ट्रस्ट’ काम करीत आहे.
घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण झाले नसले तरी आज स्वत:चा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणार्या आणि वयाच्या ५८व्या वर्षीही सर्पमित्र म्हणून आवड जोपासणार्या डोंबिवलीच्या बाबाजी बाबुराव पाडेकर यांच्याविषयी...
“निवडणूक आयोगाने मतदार यादीत फोटो नसल्यास मतदान करता येणार नाही, अशी अट घातल्याने डोंबिवलीतील तब्बल १ लाख, १७ हजार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहे. त्यामुळे ही अट शिथिल करण्यात यावी,” अशी मागणी भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून ‘माझी वसुंधरा अभियाना’अंतर्गत पुरस्कार मिळवल्याचा बडेजाव केला जात आहे. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कल्याण-डोंबिवली शहरातील कचर्याचे ढीग पाहता महानगरपालिका प्रशासन खरोखर शहरातील स्वच्छतेसाठी काम करीत आहे का, असा प्रश्न उपस्थित करत, पुढील दहा दिवसांत कचर्याची समस्या न सोडविल्यास भारतीय जनता पार्टीच्यावतीने मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे कल्याण पश्चिमचे माजी आमदार व भाजप भटके विमुक्त आघाडीचे संयोजक नरेंद्र पवार यांनी महागनरपालिका आयुक्तांना पत्र लिहून दिला आहे.
‘दिव्याला अतिरिक्त पाणी मिळणार!’ अशा गमजा सत्ताधारी शिवसेनेमार्फत मारण्यास सुरुवात झाली असून, सोमवारीही दिव्यातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी या भागाला मंगळवारपासून सहा ‘एमएलडी’ अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आजमितीस वडाची तीन ते साडे तीन हजार झाडे आहेत. दहा वर्षापूर्वी हाच आकडा एक हजार इतकाच होता.
डोंबिवली शहरात रिक्षा मीटर पद्धतीने सुरू कराव्यात,अशी गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा संघटना आणि प्रवासी मागणी करीत आहेत.
कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील बहुतांशी नाल्यांच्या अपूर्ण नालेसफाईने नागरिक त्रस्त आहेत. अनेक ठिकाणी साफसफाई झाली असली, तरीही ती केवळ तात्पुरत्या स्वरूपात व दिखाव्यापुरती केल्याचे दिसून येत आहे. डोंबिवली ‘एमआयडीसी’ परिसरातील कावेरी चौकाच्या मागे ‘आरएस ३७’च्या जवळ असलेल्या नाल्याची सफाई झालेली नसून गाळ आणि कचराही ‘जैसे थे’ आहे.
प्रखर हिंदुत्ववादी आणि हिंदू जनजागृती आंदोलन उभारलेल्या समाजोन्नतीच्या धैर्याने झपाटलेल्या, रा. स्व. संघाच्या विचाराची शिदोरी घेतलेल्या नानासाहेब पुणतांबेकर यांच्या निधनानंतर श्रद्धाजंली सभेतच लोकांनी ‘नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास डोंबिवली’ या संस्थेची स्थापना करण्याचा निश्चय केला. या संस्थेचे मालेगाव येथे कामही सुरू झाले. हळूहळू कामाचा पसारा वाढत गेला आणि आता हे काम डोंबिवलीपर्यंत येऊन पोहोचले आहे. ‘नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास डोंबिवली’ या संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊया.
डोंबिवली ‘एमआयडीसी’ भागात अनियमितपणे होणार्या पाणी पुरवठ्याविरोधात आणि ‘शटडाऊन’ काळात जाहीर केलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ पाणीपुरवठा बंद ठेवल्याविरोधात नागरिकांनी ‘एमआयडीसी’ कार्यालयावर सोमवारी धडक देत अधिकार्यांना जाब विचारला.
‘एमएमआर’ क्षेत्रातील कडोंमपासह उल्हासनगर, ठाणे पालिका आणि अंबरनाथ, बदलापूर या नगरपरिषदेत शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप मनसेचे आ. राजू पाटील यांनी गुरूवारी केला.
ठाणे शहराला लाभलेला ३२ किमी लांबीचा खाडी किनारा आणि रस्ते व अन्य प्रवासाच्या ताणावर जलवाहतुकीचा नवा पर्याय उभारण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप हे काम रेंगाळलेले असून आता कल्याण-डोंबिवली-ठाणे-वसई-भाईंदर ही जलवाहतूक दिवाळीपर्यंत सुरू होणार असल्याचे दावे लोकप्रतिनिधींकडूनकेले जात आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाने धडक तोडक कारवाई सुरू ठेवली असून बुधवारी ह, आय व ई प्रभागात अनधिकृत इमारतीचे बांधकाम निष्कासीत करण्यात आले.
वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीसाठी डोंबिवलीतील रामनगर, टिळकनगर, केळकर रोड या परिसरातील काही भागांचा वीजपुरवठा दि. २३ व २४ मे रोजी काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.