मुंबई : “देशात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जैन ( Jain ) समाजाने सातत्यपूर्ण योगदान दिलेले आहे. यापुढील काळातही जैन समाज आपले सर्वोच्च योगदान महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासासाठी देईल,” असा निर्धार जैन समाजाच्या नीती निर्धारण संमेलनावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला.
Read More
ठाणे / मीराभाईंदर : निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसाच्या काही तास आधी भाजपाने उमेदवारी जाहीर करून निवडणूकीच्या मैदानात उतरवलेल्या नरेंद्र मेहता ( Narendra Mehta ) यांनी पक्षाचा विश्वास सार्थ करून दाखवला. मेहता यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मुजफ्फर हुसैन यांचा ६० हजार ४३३ च्या मताधिक्याने पराभव मीरा भाईंदरमध्ये भाजपाचा झेंडा रोवला. भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जय श्रीराम च्या घोषणा देत जल्लोष केला.
भाईंदर : “महाराष्ट्र ही संत, महापुरुषांची पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बाजीराव पेशवे यांनी आदर्श घडवला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला. महाराष्ट्रात अशा थोर पुरुषांची परंपरा आहे.देशात सनातन धर्माशिवाय दुसरे काही नाही. तेव्हा, ‘बटेंगे तो कटेंगे’ असा पुनरुच्चार करून कुठल्याही परिस्थितीत विभागले जाऊ नका,” असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath )
मिरा - भाईंदर : ( Smriti Irani ) काँगेस सत्तेसाठी निवडणुक लढवते तर भाजपा सेवेसाठी निवडणुक लढवते, ते काही तरी मिळविण्यासाठी लढतात तर भाजपा नागरिकांना विकासाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी लढतात, हिंदू , हिंदुत्व याकडे तिरस्कारच्या भावनेने बघणाऱ्या काँग्रेसने संत मीराच्या नावाने सुरू होत असलेल्या आणि रामाचा जल्लोष घराघरात होत असलेल्या या मीरा-भाईंदर मतदार संघात जिंकण्याचे स्वप्न सुध्दा पाहू नये. असा हल्लाबोल माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भाईंदर येथील जाहीर सभेत केला.
ठाणे : गुजराती, मारवाडी, जैन समाजाचे ( Jain community ) प्राबल्य असलेल्या मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघात जैन समाजाचे नरेंद्र मेहता भाजपच्या तिकिटावर उभे आहेत. तर मेहतांसह जैन समाजाचे अन्य तीन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने जैन मतांचे विभाजन अटळ असुन जैन समाज बांधव संभ्रमात पडला आहे.
हिंदू धर्माच्या मुळावर येणार्या ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’विरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने दि. १२ मार्च रोजी भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते. मोर्चेकर्यांच्या हातात भगवे झेंडे आणि फेटे परिधान केलेल्या जनसमुदायामुळे येथील रस्त्यावर भगवे वादळ जाणवत होते.
मुंबईशी संलग्न असणारे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या मीरा-भाईंदर शहरामध्ये भाजपला बंडखोरीचा मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत येथील भाजपच्या बंडखोर उमेदवार आणि मीरा-भाईंदर शहराच्या माजी महापौर गीता जैन यांनी हजारो मतांची आघाडी घेतल्याचे चित्र आहे.