ठाणे : कळवा मुंब्र्यातील नागरी विकास कामांना ठाणे महापालिकेतील अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार मंजुरी मिळाली. मंजुरी देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ .श्रीकांत शिंदे आणि माझ्यासह अन्य नगरसेवकांना याचे श्रेय मिळायला हवे. पण जितेंद्र आव्हाड यांनी, मी आमदार मीच श्रेय घेणार, हा अहंकार जपला. नारळ फोडला, पत्रकार परिषदा घेऊन जाहीर केले म्हणजे विकास त्यांनी केला असे होत नाही. तेव्हा, आव्हाड यांनी २००९ पासून आजपर्यंत गेल्या १५ वर्षात शासनाकडून किती निधी आणला, याचे पुरावे द्यावेत, याची श्वेतपत्रिका जारी करावी. अशी
Read More
ठाणे : साठ वर्षात काँग्रेस करू शकले नाही ते दहा वर्षांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने करून दाखवले.तेव्हा, विकास कामे करण्याकरीता पैशांची नाही तर इमानदार नेत्यांची गरज आहे. असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी करून उपहारगृहात चवीसाठी आणि शस्त्रक्रियेसाठी चांगल्या डॉक्टरांकडे जाताना जात पाहत नाही, मग निवडणूकीत आपण जात का बघतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ठाणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गलिच्छ राजकारण सुरू झाले आहे. जितेंद्र आव्हाड समर्थक शमीम खान यांनी मुंब्रा-कळवाचे राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला ( Najeeb Mulla ) यांच्या विरोधात केलेल्या बदनामीकारक, खोट्या आणि तथ्यहीन आरोप केले होते. याची चौकशी करण्याची मागणी नजीब मुल्ला यांनी परिमंडळ-१ चे ठाणे पोलीस उपायुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ठाणे : “नगरसेवकाने काम केले तरी बोर्ड आमदाराचा, असे कारनामे येथील आमदाराने केले. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तब्बल साडेतीन हजार कोटींचा निधी दिला. मात्र तरीही निधी मिळाला नसल्याची बोंब मारतो. तेव्हा, नजीब मुल्ला हा कोकणी पोरगा मराठी आहे. त्यालाच बहुमताने निवडून देत येथील बंटीची (जितेंद्र आव्हाड) ‘घंटी’ वाजवायची आहे,” असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी व्यक्त केला.
ठाणे : कळवा - मुंब्रा विधानसभा क्षेत्रात गेले तीन टर्म आमदारकी भुषविणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना टोरन्ट पॉवरचा झटका बसण्याची चिन्हे आहेत. गेल्या चार वर्षापासुन कळवा - मुंब्रावासियांचा विरोध असलेल्या टोरन्ट पॉवर कंपनीला बंद करण्याचे आश्वासन महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी (अजितदादा गट) काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला ( Najeeb Mulla ) यांनी दिले आहे. शुक्रवारी मुंब्य्रात मुल्ला यांची प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी मतदारांनी फटाक्यांची आतिषबाजी करुन नजीब मुल्ला यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी मु
( Kalwa Mumbra Assembly Constituency ) कळवा - मुंब्रा विधानसभेमध्ये महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नजीब मुल्ला यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच शनिवारी दि. २६ ऑक्टोबर कळवा येथे महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला बाहेरगावी असल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. या निवडणुकीमध्ये नजीब मुल्लाच विजयी होतील आणि निवडणुकीत कळवा मुंब्र्याचा रावण आम्हीच दहन करू असा इशारावजा दावा राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला.
महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करा, अशी जाहीर मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. बुधवारी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.