युक्रेनमधील महिलांच्या परिस्थितीचा आढावा घेतला, तर जाणवेल की, युद्धग्रस्त स्थितीत स्त्रीला विकृततेचा सामना करावा लागतो. असाहाय्य महिलेला मदत करणारे लोक आहेत. पण, परिस्थितीमुळे तिच्या स्त्रीत्वाचा फायदा घेणारेही आहेत. वाईट असणार्यांमुळे मुली, महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त होते.
Read More
भारत आणि अमेरिकेने तैवानशी वाढवलेली जवळीक पाहता, चीनचा जळफळाट होणे तसे अपेक्षितच. मात्र, चीनच्या कुटील राजकारणामुळे जगाच्या पटलावर तैवान आपली ओळख निर्माण करू शकले नाही. परंतु, कोरोनावर यशस्वीपणे केलेली मात आणि आंतरराष्ट्रीय संघटनेत सहभागी होण्याचा प्रयत्न ही तैवानला प्रकाशझोतात आणण्याची संधी आहे...
मुंबई आणि जगभरातील अशी बरीच शहरे २०५० पर्यंत पाण्याखाली जातील, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. समुद्राच्या जलस्तराची पातळी लक्षात घेता याचा मोठा फटका दक्षिण मुंबईतील मोठ्या भूभागाला बसणार आहे, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
ज्या कोणत्याही देशात दहशतवादाचा, फुटीरतावादाचा नायनाट करण्याची वेळ येते, तिथे तिथे अॅम्नेस्टी इंटरनॅशनल ही संस्था आपला मानवाधिकाराचा कंडू शमविण्यासाठी खोडा घालते. जगभरात या संस्थेने हेच उद्योग केले आणि भारतातही अॅम्नेस्टीचे काम त्याच धर्तीवर चालते. म्हणूनच अॅम्नेस्टीच्या समाजसेवेचा बुरखा फाडून सत्य समोर आणणे कर्तव्य ठरते.