(Parth Pawar) अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या डिझाईन बॉक्स्डच्या नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढून पोस्ट केल्यानंतर मिटकरींनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. याच संदर्भात अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांनी त्यांचा पक्ष अमोल मिटकरींच्या या मतांचे समर्थन करत नसल्याच्या आशयाची पोस्ट करत मिटकरींना चांगलीच समज दिली आहे.
Read More
(Amol Mitkari on Rohit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दि. २५ नोव्हेंबर रोजी कराड येथील प्रीतीसंगमावर जाऊन महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी अजित पवार व कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांची भेट झाली.या भेटीवेळी अजित पवार रोहित पवारांना “शहाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं. दर्शन घे काकांचे” असं मिश्कीलतेने म्हणाले. त्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.
( Amol Mitkari on Jitendra Awhad ) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यात अजित पवारांवर गरळ ओकत खालच्या भाषेत टीका केली होती. या टीकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ल्यादरम्यान, जय मालोकार नावाच्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. या मृत्यूबाबत आता एक महत्वपूर्ण अपडेट पुढे आली आहे. जय मालोकरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला नसून जबर मारहाणीमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अमोल मिटकरींचा धर्म तपासण्याची आता वेळ आली आहे, अशी टीका भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. जयदीप आपटेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या भुवईच्या वर एक खून दाखवली असल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला होता. यावर राणेंनी प्रत्युत्तर दिले.
जय मालोकर हा दहा दिवसांनंतर राष्ट्रवादीत येणार होता, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरींनी केला आहे. जय मिटकरींचा मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या राड्यामध्ये हृदयविकाऱ्याच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर अमोल मिटकरी शुक्रवारी टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी आणि मनसेतील वाद आता चांगलाच पेटला आहे. मनसेने एक बॅनर तयार करून अमोल मिटकरींना गंभीर इशारा दिला आहे. राजसाहेबांवर टीका करून मोठं होण्याचे स्वप्न बघू नको, असे या बॅनरमध्ये म्हटले आहे.
विधानसभा निवडणूकीला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत. साहाजिकच सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीसाठी कंबर कसलीये. मात्र, राज्यातील वातावरण सध्या वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आलंय. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेला हल्ला आणि या हल्लानंतर दोन्ही पक्षांमध्ये पेटलेलं राजकारण. होय.. मनसे पदाधिकाऱ्यांनी अमोल मिटकरीच्या गाडीवर हल्ला केला. एवढंच नाही तर या राड्यात एका मनसैनिकाचा जीवही गेला. पण हा हल्ला करण्यामागे नेमकं कारण काय? अमोल मिटकरी आणि मनसेमध्ये काय घडलं? आ
राज ठाकरेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी अजित पवार गटाने पोलिसांकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी ही मागणी केली आहे. अमोल मिटकरींच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर त्यांनी ही मागणी केली.
अमोल मिटकरींनी अकोला पोलिस अधिक्षक कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु केलं आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या गाडीवर मनसैनिकांनी केलेल्या हल्ल्याच्या विरोधात त्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. आपल्यावर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या १३ पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांना अटक केली आहे. मंगळवारी अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या वाहनाची अकोल्यात अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. अमोल मिटकरींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून आता ही तोडफोड केल्याचे सांगण्यात येत आहे.
सुपारीबहाद्दरांनी अजितदादांबद्दल बोलू नये, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केला आहे. पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंनी अजित पवारांना टोला लगावला होता. यावर आता मिटकरींनी प्रत्युत्तर दिले.
नाना पटोलेंचं कृत्य म्हणजे सत्तेची मस्ती होती का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरींनी केला आहे. सोमवारी एका कार्यकर्त्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय धुतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर आता मिटकरींनी प्रतिक्रिया दिली.
स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. त्यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा थेट इशारा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी दिला आहे. तसेच त्यांनी आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.
२००४ मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार नव्हता की, असलेल्या उमेदवाराला तुम्हाला मुख्यमंत्री करायचं नव्हतं, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी शरद पवारांनी केला आहे. २००४ मध्ये राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आलेले असतानाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसल्याने काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. यावरून आता अमोल मिटकरींनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना पवारांना सवाल केला.
काँग्रेसचे ७ आमदार आणि शरद पवार गटाचे ५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचेही ते म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाचा असल्याचे आयोगाने सांगितले. त्यानंतर आव्हाडांनी बाप सोडल्याची टीका केली. त्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी आव्हाडांना झापलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य प्रवक्ता पदावरून हटवलं आहे. सहा महिन्यांच्या आतच मिटकरींचे हे पद काढून घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्याऐवजी आता उमेश पाटील यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.
संजय राऊतांचे तीन अवयव निकामी झाले आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर संजय राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. अकोला येथील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते.
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकांसह उपलब्ध करण्यात आलेल्या अन्य साहित्याच्या साठ्याच्या बाबतीत घडणाऱ्या अपहाराच्या घटनांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवार, दि. १८ डिसेंबर रोजी विधान परिषदेत दिली.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी रावण दहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी सरकारकडे केली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात सभागृहात आवाज उठवणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. राज्यात काही भागात आदिवासी संघटनांचा रावण दहनाला विरोध आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी 'मनातले मुख्यमंत्री' अशा आशयाचे होर्डिंग्स लावले होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपद अजित पवारांना मिळणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. या चर्चांना आता अजितदादांनी पूर्णविराम दिला आहे. 'मनातले मुख्यमंत्री' असे पोस्टर लावणाऱ्या आमदारांना अजितदादांनी झापलं आहे.
"आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा अशी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असते आणि त्यात काही वावगे नाही. महायुतीतील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून मी अधिकृतपणे जाहीर करतो की राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहणार असून मुख्यमंत्री पदी इतर कुणाचीही निवड होणार नाही," या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांना आपला पाटिंबा दर्शवला. त्यामुळे त्यांच्यावर महाविकास आघाडीचे नाराज कार्यकर्ते टिका करत आहेत. आता तर अकोल्यातील काँग्रेस कार्यक्रत्यांनी त्यांचं नाव चक्क मनोरुग्णालयात दाखल केलं आहे.
शरद पवार हे खासगी मालमत्ता नाही, आव्हाडांनी गप्प बसावं. असं अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना सुनावलं आहे. शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना त्यांचा फोटो न लावण्याचे आदेश दिले आहेत. विचारसरणीचा विश्वासघात करणाऱ्यांनी शरद पवार यांचे फोटो वापरू नये, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते. यालाचं आता मिटकरी यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.
अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी "विश्वनेते आव्हाड यांना दादांचे नेतृत्त्व का मान्य नाही?" असा सवाल शरद पवार यांच्या गटातील जितेंद्र आव्हाड यांना केला आहे. २ जुलै रोजी राज्याच्या राजकारणात झालेल्या भुकंपानंतर राष्ट्रवादीत ही दोन गट पडले आहेत. तर, आता अजित पवार गटातील आमदारांनी शरद पवार यांच्या गटातील जितेंद्र आव्हाड यांना सवाल केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी मोठी घडामोड दि. २ जुलै रोजी घडली. त्यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते. म्हणून मी राजभवनात होतो. त्यामुळे आज अजित पवारांसोबत गावाखेड्यातील प्रत्येक कार्यकर्ता आहे. त्यामुळे अजितदादा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळेच गुरुपोर्णिमेला अजितदादाना मी भेटायला आलो आहे, असे मिटकरी म्हणाले.
संजय राऊत भांडूपचा देवानंद. असं म्हणत भाजप आमदार नितेश राणेंनी टोला लगावला आहे. शिवाय छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी, "मी छत्रपती संभाजीनगर म्हणणार नाही, औरंगाबादच म्हणणार." असे म्हटले होते. या वक्तव्याचा देखील राणेंनी समाचार घेतला आहे. संजय राऊतांमध्ये हिंमत आहे का शरद पवार साहेबांना सांगण्याची की, बाळासाहेब ठाकरेंची मागणी होती औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करा? असं नितेश राणे म्हणालेत. तसंच जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांच्यावरही नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.
कर्नाटकात भाजपचा पराभव केल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीत उत्साहाचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे मविआमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादीवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी सुषमा अंधारेंसह उद्धव ठाकरेंना इशारा दिलेला आहे. मिटकरी म्हणाले की, उद्धवजी मी तुमचा आदर करतो.पंरतू आपल्या पक्षातील वाचाळविरांना आवर घालावा. अन्यथा गल्लीतील टुकार "दादाहो "राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील तर आम्हालाही व्हिडीओ लावावे लागतील, असा इश
साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ही उपस्थित होते.त्यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांची तक्रार केली. महिलांविरोधात अश्लिल भाषेत टिका केली जात असतांनाही विरोधी पक्षातील नेत्यांनी विधीमंडळात हा विषय काढला नाही. असं म्हणत सुषमा अंधारे भावुक झाल्या. त्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी टिकास्त्र सोडलं आहे. मिटकरी म्हणाले की, दादा विरूद्ध रडलो तरी मीडियात प्रसिद्
संपुर्ण देशभरात रामनवमी उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. यातच आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात लोकांना रामनवमी उत्साहात साजरी करण्याचे आवाहन केले होते. मात्र आता रामनवमी उत्सवात खुद्द राज ठाकरे परदेशवारीला गेले आहेत. यावरूनच अमोल मिटकरी म्हणाले की, रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित "हिंदु जननायक" परदेश दौऱ्यावर पळाले.त्यामुळे आता राम नवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे. तसेच या घटनेला "हंस चुगेगा दा
अकोला जिल्हा रुग्णालयातील गट ‘अ’ व ‘ब’ संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, तर ‘क’ व ‘ड’ संवर्गातील पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात भविष्यात मनुष्यबळ कमी पडणार नाही, अशी दक्षता शासन घेणार असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
राज्यात शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी करताना महिला बचत गटांना त्यांच्या कामाचे पैसे वेळेत मिळण्यात ज्या अडचणी आहेत, त्या दूर केल्या जातील. या प्रकरणी आलेल्या तक्रारीची दखल घेऊन त्याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.
पंढरपूर तीर्थक्षेत्राचा बहुआयामी व सर्वंकष विकास करण्याकरिता कॉरिडॉरची निर्मिती प्रस्तावित आहे. कॉरिडॉरचा प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला असून जनतेच्या सूचना, हरकती यांचा विचार करून या आराखड्यास अंतिम मान्यता देण्यात येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरमध्ये कॉरिडॉर करण्यासंदर्भात सदस्य मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीस उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्याविरुद्ध सोलापूरच्या सदर बाझार पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली.
दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात अधिक लक्ष्यवेधी ठरलेली बाब म्हणजे अजित पवार यांचे नाराजीनाट्य.
महाराष्ट्र विधीमंडळाचं अधिवेशन सुरू असताना विधीमंडळ पायऱ्यांवर झालेल्या घोषणाबाजीत अभूतपूर्व राडा झाला. गेल्या काही दिवसांपासून अधिवेशनादरम्यान विरोधक आंदोलन करत होते. मात्र, सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आमदारांनी खुद्द मातोश्रीविरोधातच घोषणाबाजी केली.
काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्यात तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवारांना क्लीनचिट मिळाली नसल्याचे उघड झाले आहे
काँग्रेसी जयराम रमेश असो वा अमोल मिटकरी, त्यांना घराणेशाहीसमोर झुकण्याव्यतिरिक्त इतर कशाचेही महत्त्व वाटत नाही. मोदीविरोधाच्या नादाने घराण्याच्या म्होरक्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडावी, अशी त्यांची इच्छा असते. त्यातूनच त्यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाला विरोध केला. पण, तिरंगा फक्त मोदींचा वा भाजपचा नाही, इतकीही अक्कल त्यांना राहिली नसल्याचेच यातून स्पष्ट होते.
बेताल आणि वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत राहणारे अमोल मिटकरी यांनी हर घर तिरंगा म्हणजे फालतू आणि देशाच्या नावाने बाजार मांडणारी मोहीम आहे. तसेच देशात लोकांना शिक्षण नाही शेतकऱ्याला न्याय नाही वगैरे वगैरे टीका करून आजादीचे पंचाहत्तर वर्ष का साजरे करताय ही सगळी बोगसबाजी आहे असे म्हणत पुन्हा अकलेचे तारे तोडले. दुसरीकडे शोशल मिडीयावर आपले प्रोफाईल पिक्चर म्हणून तिरंग्याचे फोटो ठेवा या पंतप्रधानांच्या आवाहनावर कॉंग्रेसने राजकारण करायला सुरुवात केली. जयराम रमेश असो वा अमोल मिटकरी, त्यांना घराणेशाहीसमोर नतमस्तक
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील केलेल्या पूजाविधीबद्दल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्षेप घेतला आहे. मंत्रालयातील कामकाज हे संविधानानुसारच व्हायला हवे, अशी भूमिका मांडत त्यांनी मंत्रालयातील पूजाविधीला विरोध केला आहे.
विधान परिषदेच्या निकालाच्या दुसर्याच दिवशी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय उलथापालथ पाहता शिवसेना आणि ठाकरे सरकार धोक्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसुध्दा राष्ट्रपती पदासंदर्भात असलेली बैठक अर्धवट सोडून मुंबईला रवाना झाले होते. अशातच "पवार खंबीर आहेत तोवर सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही!", असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले. बुधवारी (दि. २२ जून) घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बैठकीनंतर ते पत्रकारांशी
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना ब्राह्मणद्वेषी भाष्य भोवण्याची चिन्हे आहेत. आ. मिटकरी यांच्या बेताल वक्तव्याविरोधात परशुराम सेवा संघाच्या निवेदनानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना याप्रकरणी उचित कार्यवाही करण्याचे लेखी निर्देश बजावले आहेत.
" राज्यात जाती- जातींमध्ये फूट पडून द्वेषाची भावना वाढवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कामच आहे" अशा शब्दांत भाजप आ. सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे
आ. अमोल मिटकरी यांच्याविरोधात अंबरनाथला निदर्शने
राजकारण सुरू झाले की, मग विकृत इतिहासकारांकडून निराधार, पुराव्याशिवायच्या वायफळपणाचा प्रसार करण्याचे उद्योग चालू केले गेले. तसे करण्यातून संबंधित जातीतल्या तरुणांची टाळकी भरकटतात आणि आपल्या म्होरक्याची राजकीय कारकिर्द देदीप्यमान व्हावी म्हणून ती जळत राहतात. तशी अवस्था सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधून घेतलेल्यांची झाली आहे.
"राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथे दि. २० एप्रिल रोजी झालेल्या सभेत कन्यादान या हिंदू धर्मातील पवित्र विधी संदर्भात वादग्रस्त विधान केलं. त्यांनी फक्त एका महिलेचाच नव्हे तर या धार्मिक विधी अंतर्गत लग्न झालेल्या राज्यातील अनेक महिलांचा सार्वजनिकरित्या अपमान केला आहे.", असे म्हणत भिवंडीच्या नीता वैभव भोईर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र पाठवलं आहे. त्याच बरोबर या महिलेकडून आयपीसीच्या कलम ३५४ आणि कलम ५०९ अंतर्गत मिटकरींविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
आता सावध व्हा वधुवर झणी अवघ्या स्वधर्मा वरा देवाचे घर नांदवू सुखभरे संकल्प ऐसा स्मरा जितेंद्रिय करा विनंती हृदये देवा धनी मनोहरा राधागोविंद पार्वती शिवहराकुर्यात सदा मंगलम्
राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरुन पवित्र हिंदू धर्माची, परंपरेची, संस्कृतीची खिल्ली उडवण्यात आली. या प्रकरणी आता संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाजप महाराष्ट्र अध्यात्म आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसलेंनीही राऊतांविरोधात जहरी टीका केली आहे. राजकारणातल्या शकुनी मामाचा सरदार अमोल किटकरी, असे म्हणत त्यांच्यावर ही टीका केली आहे.