मराठी साहित्याला संत कवयित्रींचा, लेखिकांचा समृद्ध वारसा लाभला आहे. आपल्या काव्यप्रतिभेतून या कवयित्रींनी जीवनाच्या विविध पैलूंवर अगदी नेमकेपणाने भाष्य केले. यापैकी काही आशयगर्भ काव्यपंक्तींची गीतांतही गुंफण झाली. अशाच काही निवडक कवयित्रींचा अक्षरप्रवास रसिकांसमोर उलगडून दाखवत आहेत, लेखिका तपस्या वसंत नेवे. नुकत्याच संपन्न झालेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने आणि आगामी जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर ‘शब्दव्रती’ या अनोख्या संकल्पनेबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’ने तपस्या नेवे यांच्याशी साधलेला हा संवाद...
Read More
नाटककार अभिराम भडकमकर लिखित आणि त्यांच्याच आवाजात साकारलेली कादंबरी ‘इन्शाअल्लाह’ आता स्टोरीटेल मराठीवर
१८९८ साली ग्रंथसंग्रहालयाची स्थापना झाल्यापासून १२१वर्षांत प्रथमच ‘बाऊन्सर’ सुरक्षेसाठी ठेवण्याचा निर्णय ‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया’तर्फे घेण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या संग्रहालयाने भाड्याने घेतलेल्या ‘बाऊन्सर’ सुरक्षेबाबत सामान्य वाचक वर्ग तसेच सभासद आणि संग्रहालयाच्या विविध वास्तूत येणार्या नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. एकीकडे राज्य सरकार आणि पालिकेकडून अनुदानाची याचना केली जाते, तर दुसरीकडे ‘बाऊन्सर’वर लाखो रुपयांची उधळपट्टी होणार आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्षांसह ग्रंथसंग्रहालयाची सर्व पदे वादग्रस्त ?
१२० वर्षे जुने असलेल्या व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाची भूमिका निभावणार्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला सध्या संकटांच्या मालिकेला सामोरे जावे लागत आहे. संस्थेच्या पदाधिकार्यांवर आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार, नियमबाह्य कारभार आदींचे रोज नव्याने गंभीर आरोप होत आहेत. एवढ्या मोठ्या आणि जुन्या संस्थेची ही दुरवस्था का झाली, यामागील नेमके गौडबंगाल काय, याचा दै. ‘मुंबई तरुण भारत’ने घेतलेला हा मागोवा...
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयावर संकटांची मालिका, कर्मचाऱ्यांचे पगारही थकले
‘अशी पुस्तके होती’ या नव्या पुस्तकात १८५० ते १९४५ या काळात प्रकाशित झालेल्या आणि आता वाचकांच्या स्मृतीआड गेलेल्या मराठी पुस्तकांबद्दल त्यांनी सविस्तर लिहीलं आहे.
पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान या प्रांतांमधला वैराण, मातकट, खडकाळ परिसर, जनतेची बेतास बात आर्थिक परिस्थिती इथपासून ते युरोपमधील सुजलाम सुफलाम वातावरणापर्यंत टोकाच्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या.