राहुल गांधींनी मणिपूरच काय, देशाच्या कुठल्याही भागांना जरूर भेट द्यावी. त्याला विरोध असण्याचे मुळी कारण नाही. पण, राहुल गांधी नेमके कुठल्या उद्देशाने अशा ठिकाणांचे दौरे करतात, हे पाहणे महत्त्वाचे.
Read More
मणिपूरमधील वंशिक संघर्षाला 'राजकीय समस्या' म्हणून संबोधून लष्कराच्या पूर्व कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता यांनी सुरक्षा दलांकडून लुटलेली सुमारे ४ हजार शस्त्रे सामान्य लोकांकडून परत मिळेपर्यंत हिंसाचाराच्या घटना थांबणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.
मणिपूरमध्ये मे महिन्यापासून सुरु असलेला जातीय संघर्ष आता थांबला आहे. याप्रकरणी आता एनआयए आणि सीबीआय दंगेखोरांना अटक करत आहे. तपास यंत्रणांच्या या कारवाईचा काही गटांनी विरोध केला आहे. तपास यंत्रणा एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप तपास यंत्रणांवर करण्यात आला आहे.
आता सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या असताना, हे तथाकथित ‘मोहब्बत की दुकान’ राजकीय नेते मणिपूरमधील बिघडलेल्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, जी प्रत्यक्षात त्यांच्या राजकीय नेत्यांनी किंवा पक्षाने निर्माण केली होती. जे भारतविरोधी आणि विकासविरोधी आहेत, ते ईशान्येतील वेगवान पचवू आणि समजू शकलेले नाहीत. मणिपूरमधील अशांततेचे मुख्य कारण म्हणजे सामूहिक धर्मांतर आणि कुकी मनातील विषप्रयोग. अशांततेचा फायदा कोणाला होणार?
मणिपूर हिंसाचाराच्या तपासासाठी सीबीआयने तपास अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या तपास पथकात ५३ अधिकाऱ्यांच्या समावेश करण्यात आला. यात २९ महिला अधिकाऱ्यांचा ही समावेश आहे. राज्यात महिलांवरील हिंसाचार आणि अत्याचाराबाबत ६५ हजारांहून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
एकविसावे शतक हे भारताचे असून संपूर्ण जग आपल्याकडे विश्वमित्र या भावनेने पाहत आहे. देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी घराणेशाही, भ्रष्टाचार आणि लांगुलचालनाविरोधात लढा देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७६ व्या स्वातंत्र्यदिनी देशास संबोधित करताना केले.
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मणिपूमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. मात्र, केंद्र सरकारने तोडगा काढण्यासाठी वेगवान हालचाली केल्यानेच तेथे आता शांतता प्रस्थापित होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी तेथील घटनांचे राजकारण करू आगीत तेल ओतण्याचे काम करू नये, असा इशारा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांनी बुधवारी दिला आहे.
लोकसभेचे कामकाज दि. ८ ऑगस्ट रोजी तहकूब केल्यानंतर दुपारी १२ वाजता पुन्हा सुरू झाले. यादरम्यान अविश्वास ठरावावर चर्चा सुरू झाली. तहकूब केल्यानंतर दुपारी १२ वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा गदारोळ सुरू झाला. यावेळी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, इंडिया विरोधकांची आघाडी नाही तर विनाशाची आघाडी आहे. काँग्रेसच्या काळात देशात भ्रष्टाचार आणि दहशतवाद फोफावला. त्यामुळेच त्यांना युपीए नावाची लाज वाटत होती म्हणून विरोधकांनी इंडिया आघाडी नाव
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून विरोधकांकडून सतत गोंधळ पाहायला मिळतो. यातच आता आम आदमी पार्टीचे खासदार सुशील कुमार रिंकू यांनी निलंबित करण्यात आले आहे. सध्या देशाच्या संसदेत पावसाळी अधिवेशन गाजतय ते मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून त्यावरून विरोधकांकडून चांगलाच गोंधळ घातलेला पाहायला मिळत आहे.
ईशान्य भारतातील बंडखोरांना चीनद्वारे मदत दिली जाते. त्यामुळे मणिपूर हिंसाचारामध्येही परकीय शक्तींचा हात असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे मत देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी व्यक्त केले आहे.
मणिपूर हिंसाचाराची चौकशी आता सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. सीबीआयने मणिपूर हिंसाचार आणि कटाशी संबंधित सहा एफआयआर नोंदवले आहेत. याप्रकरणी तपास यंत्रणेने आतापर्यंत १० आरोपींना अटक केली आहे. गँगरेप (व्हायरल व्हिडिओ प्रकरण) प्रकरणी सीबीआय नवीन एफआयआर दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे.
देशात मणिपूरमधील महिला विवस्त्र प्रकरणावरून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावर बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकारांनीही समाज माध्यमावरुन पोस्ट करत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी मणिपूरचा प्रश्न उचलून धरला आहे. यावर आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही फेसबुक करत मणिपूरच्या घटनेचा निषेध केला आहे. 'मणिपूरमधील घटनेत त्या पुरूषांची जात दिसली, त्या जातीचं नाव होतं नराधम, अशा कठोर शब्दांत सोनाली कुलकर्णीने संताप व्यक्त केला आहे.
कामाच्या शोधात आलेल्या मणिपूर येथील मुलीचा विनयभंग करीत तिच्याशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी कोंढव्यातील तरुणाला कोंढवा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव मांडण्याची तयारी केली आहे. त्याचवेळी अविश्वासच नव्हे तर कोणत्याही प्रस्तावावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे, असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
मणिपूरमधील महिलांच्या नग्न परेडच्या व्हिडिओमुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. यातच आता पीडितांपैकी एक महिला निवृत्त लष्करी जवानाची पत्नी आहे. अशी माहिती मिळाली आहे. हे दाम्पत्य सध्या चुरचंदपूर येथील मदत छावणीत राहत आहे. ४ मे २०२३ रोजी घडलेल्या घटनेपासून पीडित महिला तणावग्रस्त आहे.
मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'माझे हृदय वेदनांनी भरले आहे. मणिपूरमध्ये उघडकीस आलेली घटना ही कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. पापी कोण आहेत, गुन्हे करणारे कोण आहेत, यांच्यामुळे संपूर्ण देशाचा अपमान होत आहे. १४० कोटी देशवासियांना लाज वाटत आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना माता-भगिनींच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलण्याची विनंती करतो.
गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचाराचा सामना करत असलेल्या मणिपूरबाबत युरोपियन युनियनच्या ब्रसेल्सस्थित संसदेत दि. १२ जुलै रोजी एक ठराव मांडण्यात आला, तो भारत सरकारने फेटाळला आहे. मणिपूरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून मणिपूर हिंसाचारावर भारताने आपली भूमिका स्पष्ट करूनही युरोपियन संसदेत ठरावावर चर्चा सुरू असल्याचे भारताचे म्हणणे आहे.
मणिपूरमध्ये म्यानमारच्या ११ नागरिकांना अटक करण्यात आले आहे. त्यांनी वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केला आहे. त्यांना १० जुलै रोजी हिंसाचारग्रस्त चुरचंदपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेले सर्वजण मणिपूरच्या सीमेला लागून असलेल्या म्यानमारमधील टोमू शहरातील रहिवासी आहेत. चुरचंदपूर जिल्हा रुग्णालयात हे लोक बॉम्ब आणि गोळीने झालेल्या जखमांवर उपचार करत होते. मात्र त्यांना ही दुखापती कशा झाल्या हे स्पष्ट झालेले नाही.
नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचार संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांना केंद्र आणि मणिपूर सरकारने उत्तर दिले आहे. राज्यातील परिस्थिती हळुहळू सुधारत आहे, असे सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.
मणिपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा करत असताना त्यांचा ताफा रोखण्यात आला असून इंफाळपासून २० किमी अंतरावरील बिष्णूपूर जिल्ह्यात त्यांना रोखण्यात आले. मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी दोन दिवसीय दौऱ्याचे आयोजन केले आहे. दरम्यान, मणिपूर हिंसाचारातील पीडित कुंटुंबीयांची भेट ते घेणार आहेत.
नवी दिल्ली : शाहिनबाग आणि कथित शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रमाणेच मणिपूरमध्येही हिंसक गटांकडून भारतीय सैन्यासह सुरक्षा दलांच्या कारवाईमध्ये अडथळा आणण्यासाठी महिलांचा ढाल म्हणून वापर होत असल्याचे दिसून आले आहे. मणिपूरमध्ये गेल्या महिन्याभरापासून संघर्षाची स्थिती आहे. तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्य पोलिस, केंद्रीय सुरक्षा दले आणि भारतीय सैन्याच्या तुकड्या कार्यरत आहेत. मात्र, हिंसक गटांकडून भारतीय सैन्याच्या कारवाईमध्ये अडथळे आणले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हिंसक गटांकडून ढाल म्हणून महिलांचा वापर केला
नवी दिल्ली : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरकारतर्फे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, नित्यानंद राय आणि अजय कुमार मिश्रा, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला आणि इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक तपन डेका उपस्थित होते.
नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराच्या अलीकडील उद्रेकाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलेले आश्वासन खोटे असल्याचा आरोप करणाऱ्या मणिपूर आदिवासी मंचाने दाखल केलेल्या अर्जाची तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला आहे.
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये गुरुवारी रात्री उशिरा केंद्रीय परराष्ट्र आणि शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्या निवासस्थानावर जमावाने हल्ला केला. जमावाने इंफाळमधील कोंगबा येथील मंत्र्यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली आणि जाळपोळ केली. हल्ल्याच्या वेळी मंत्री निवासस्थानी उपस्थित नव्हते. या घटनेबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्याचे राज्य सरकार शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरल्याचे राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे. घटनेच्या वेळी मंत्री केरळमध्ये होते. सिंह हे मैतेई समाजाचे आहेत.