नवी मुंबई : ‘मुंबई लेबर युनियन’ (संलग्न : हिंदू मजदूर सभा)तर्फे ‘सिडको’ महामंडळातील ३०० कर्मचार्यांनी विविध मागण्यांकरिता ‘सिडको’ ( CIDCO ) भवनसमोर पुकारलेल्या धरणे आंदोलनाला आमदार मंदा म्हात्रे यांनी गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी उपस्थिती दर्शवली. कर्मचार्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या व सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डीले यांच्या दालनात तातडीची बैठक घेतली. या कर्मचार्यांचा मागण्या लवकर पूर्ण करण्यात याव्यात, असे आदेश आमदार म्हात्रे यांनी सहव्यवस्थापकीय संचालक कर्डीले व उपस्थित संबंधित अधिकार्यांना दिले.
Read More
Manda Mhatre फेरीवाले आणि नौदल समुद्रात वाट्टेल त्या ठिकाणी बोटी चालवतात. त्यामुळे त्यांना मार्ग ठरवून द्यावे, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी विधानसभेत केली. बुधवार दि. १८ डिसेंबर रोजी गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा बेटावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीचा अपघात झाला. दरम्यान, यासंदर्भात गुरुवारी आमदार मंदा म्हात्रे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे प्रश्न उपस्थित केला.
मंदाताई आमची फायरब्रँड नेता आहे. त्या जे काही करतात ते जनतेसाठीच करतात. त्यामुळे या भागात त्यांची लोकप्रियता आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत बेलापूर विधानसभेच्या भाजप आणि महायूतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
बेलापूर विधानसभा मतदारसंघात मनसेने गजानन काळे यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्याविरोधात भाजपच्या मंदा म्हात्रे आणि शरद पवार गटाचे संदीप नाईक रिंगणात आहेत. त्यामुळे बेलापूरमध्ये यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवी मुंबईतील बहुचर्चित बेलापूर विधानसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल. पाहूया काय आहे या मतदारसंघाचा इतिहास
माथाडी समाजातील बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हे शासन वचनबद्ध आहे. माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात आलेल्या माथाडी कायद्यात कोणत्याही परिस्थितीत छेडछाड केली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली.
मोठा गाजावाजा करत सुरुवात केलेली वॉटर टॅक्सी सेवा प्रवाशांच्या अभावी रिकामीच असल्याचे समोर आले आहे. उदघाटन होऊन दहा दिवस होऊनसुद्धा स्पीडबोटीच्या केवळ दहाच फेऱ्या झाल्या आहेत
'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ व आरोग्य' या संमेलनाचा आज समारोपाचा दिवस. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे सकाळपासूनच विद्यार्थी आणि वैद्यकीय प्रतिनिधी मोठा संख्येने येथे उपस्थित आहेत. संमेलनाचा अंतिम दिवस असला तरी उपस्थितांमध्ये पहिल्या दिवसाइतकेच उत्साहाचे वातावरण असून आज दिवस अनेकविध परिसंवाद आणि चर्चासत्रांचे आयोजन आज दिवसभरात करण्यात आले आहे.
योगदौड'निमित्त धावली नवी मुंबई : 'वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९' निमित्त योगाथॉनमध्ये आबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग
'योगदौड'मध्ये सहभागी व्हा ! ’वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९’निमित्त नवी मुंबईत कार्यक्रम
आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार आणि सिद्ध (आयुष) या चिकित्सापद्धतींना एकाच मंचावर आणून या क्षेत्रातील व्यक्ती, संस्था आणि मान्यवरांना एकत्रित आणण्यासाठी दि. २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९’ आणि आरोग्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे हे भारतातील सर्वात पहिले आयुष संमेलन भरणार आहेत. नवी मुंबईत सिडको विश्रामगृह येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे सचिव डॉ. विष्णू बावने यांनी ही माहिती दिली.