केंद्र सरकारने नक्षलवादाच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईला वेग आला असून, १६ जानेवारी रोजी सुरक्षा दलाने बिजापूर येथे १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. बिजापूरच्या दक्षिण भागातील जंगलामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा दलाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार माओवादी गटाचे अनेक म्होरके या परिसरात तैनात असल्याची माहिती त्यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली. गुरूवारी सकाळी ९ वाजता सुरक्षा दलाने या कारवाईला सुरूवात केली.
Read More