जोपर्यंत वायू प्रदूषण पूर्णपणे नियंत्रणात येत नाही तोपर्यंत ई विभागातील बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध कायम राहतील. वारंवार सूचना देऊनही निकषांची पूर्तता न करणा-या बांधकाम प्रकल्पांवर कठोर कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
Read More
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी त्वरित सुरू होत असून एमएमआरडीएच्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील प्रकल्पांसाठी ही मार्गदर्शक तत्वे लागू आहेत. या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांवर असून, त्यांनी या संदर्भातील नोंदी ठेवून प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
Thane polluted मुंबईच्या तुलनेत ठाणे शहरातील हवा मध्यम प्रदुषित असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे. १७ डिसेंबर रोजीच्या एअर क्वालिटी इंडेक्सनुसार ठाणे शहरात सरासरी १२० हवा गुणवत्ता निर्देशांक नोंद झाला आहे. असे असले तरी हवेतील प्रदुषण रोखण्याचे मोठे आव्हान ठाणे महापालिकेसमोर आहे. दरम्यान, मुंबई - ठाण्यापेक्षा पुणे, चिंचवड, नाशिक, नांदेड, कोल्हापुर, अहमदनगर आदी शहरातील हवेची गुणवत्ता रेड झोनमध्ये असल्याने श्वास घेण्यासही त्रासदायक असल्याचे अहवालात नमुद आहे.
मागील काही दिवसांत मुंबईमधील ( Mumbai ) वायुप्रदूषणातही वाढ नोंदवण्यात आली असून, काही भागांतील हवा ही ‘अत्यंत वाईट’ या श्रेणीत नोंदविली गेली. परिणामी, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील वायुप्रदूषणाची कारणे आणि त्यावरील उपाययोजना यांचा उहापोह करणारा हा माहितीपूर्ण लेख...
‘नेमेचि येतो मग पावसाळा’प्रमाणे दिल्लीत ‘नेमेचि ओढवते हे प्रदूषण’ अशी बिकट अवस्था. दरवर्षी हिवाळ्याची चाहूल लागताच देशाची राजधानी धूर, धुरके आणि धुक्याच्या गर्तेत हरवून जाते. सालाबादप्रमाणे यंदाही दिल्लीतील वायूप्रदूषणाने नवीन उच्चांक गाठला आहे. त्यानिमित्ताने दिल्लीतील वायूप्रदूषणावर उपाययोजनांचा आढावा घेणारा हा लेख...
(Delhi Air Quality Index ) दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत पोहोचली आहे. गुरुवारी दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी हवेच्या गुणवत्तेचा सरासरी निर्देशांक (एक्यूआय) ४३० इतका नोंदवला गेला. ही पातळी आरोग्यासाठी हानिकारक आहे. दिल्लीतील अनेक भागात एक्यूआय ४०० च्या पुढे आहे. फरिदाबाद, गुरुग्राम, गाझियाबाद, ग्रेटर नोएडा आणि नोएडा येथेही वायू प्रदूषण गंभीर श्रेणीत राहिले.
(Delhi - NCR Air Pollution) दिल्ली - राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) पसरलेल्या प्रदूषणाबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा सरकारला फटकारले.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये वायुप्रदुषणाची स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार मंगळवारी दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३१८ अर्थात अतिखराब श्रेणीत पोहोचला होता. त्याचवेळी सत्ताधारी आप मात्र प्रदुषणाविषयी अन्य राज्यांना जबाबदार धरण्यात धन्यता मानत आहे.
( Shehzad Poonawalla ) देशाच्या राजधानीत दिल्लीच्या विविध भागांमध्ये धुरके पसरण्यास प्रारंभ झाला असून हवेची गुणवत्ता वेगाने खालावण्यास प्रारंभ झाला आहे. त्याचप्रमाणे यमुना नदीतही प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप) विषारी कारभारामुळे दिल्लीकरांना वायू प्रदूषणाचा धोका निर्माण झाल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील वायू प्रदुषणाच्या तक्रारींसाठी संकेतस्थळ (वेब पोर्टल) आणि मोबाईल ऍप्लिकेशन विकसित करण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेला एका जनहित याचिकेच्या निमित्ताने दिल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने एण्ड्रॉईडवर ‘मुंबई एअर’ नावाचे एक विशेष ऍप्लिकेशन विकसित केले आहे. मुंबईतील नागरिकांना या ऍप्लिकेशनचा वापर करून तक्रार दाखल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्रत्येक विभागनिहाय तक्रार दाखल करण्याची सुविधा देखील ऍपमध्ये दिली आहे. प्रारंभी एण्ड्रॉईड प्लॅटफॉर्
दरवर्षीप्रमाणे यंदाही राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा गंभीर झाली असून, दिल्ली तसेच पंजाब येथील आम आदमी पक्ष प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याची बाब समोर आली. पंजाबमधील शेतकर्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून शेतात पराली जाळणे सुरूच ठेवल्याचे आकडेवारी सांगते. हरियाणा तसेच पंजाब सरकार एकमेकांकडे बोट दाखवत असताना, राजधानीतील ढासळलेला हवेचा स्तर मात्र खरे कोणाला मानावे, असाच प्रश्न उपस्थित करणारा आहे.
ठाणे महापालिकेने हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. त्याचसोबत, हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाईन (८६५७८८७१०१) सुरू करण्यात आली आहे.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये परालीद्वारे होणाऱ्या वायु प्रदूषणाच्या तुलनेत फटक्यांनी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण नगण्य असल्याचे वायु गुणवत्ता निर्देशांकात (एक्युआय) स्पष्ट झाले आहे.
राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली असताना, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक ‘मान’ तयार करण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. आता त्यांचे लक्ष राजस्थानवर असून, तिकडे ‘दुसरा मान’ तयार करण्यासाठी त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे.
दिल्लीतील वायु प्रदूषणाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारची सम-विषम वाहन योजना ही अशास्त्रीय असून तो केवळ दिखावा आहे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सध्या वायु प्रदूषणाचे राज्य असून राज्य सरकार त्यावर उपाय करण्यात अपयशी ठरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात वायू प्रदूषण जोरावर असून सातत्याने हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. याची गंभीर नोंद मुंबई उच्च न्यायलयाने घेतली असून शहरातील सर्व बांधकामे दिवाळीपर्यंत थांबविण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. तसेच हवेची गुणवत्ता राखण्यासाठी दिवाळीत फटाके फोडण्यावरही वेळमर्यादा घालून द्यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये हिवाळाच्या प्रारंभीच वायु प्रदूषणाची स्थिती गंभीर झाली आहे. दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसराचा (एनसीआर) हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) हा पाचशेपार गेला आहे. दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांच्या शेतात पिकांचे अवशेष (पराल) जाळून निघणारा धूर थेट राजधानी दिल्लीत पोहोचतो. दिल्लीतील दाट लोकसंख्येमुळे प्रदूषण अनेक पटींनी वाढते.
दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरातील (एनसीआर) प्रदूषणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी राज्यांनी काय पावले उचलली यासाठी पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानला एक आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
देशाची आर्थिक राजधानी, लाखो हातांना रोजगार देऊन जगवणारी मुंबई श्वासकोंडीत गुदमरते आहे. वायू प्रदूषण, बांधकाम प्रकल्पांतील धूळ आणि वातावरणातील धुरक्यामुळे मुंबईच्या हवेचा दर्जा खालावला आहे. यासंबंधी मुंबई महानगरपालिकेने काही उपाययोजना केल्या असल्या तरी, या समस्येकडे अधिक खोलवर आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून बघणे हेच क्रमप्राप्त ठरावे.
पंजाबमधील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकांचे अवशेष (पराली) जाळल्यामुळे दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात (दिल्ली एनसीआर) वायुप्रदूषण झाले आहे, असा आरोप हरियाणा सरकारतर्फे करण्यात आला आहे.
हिवाळ्यात वाढणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या कृती योजनेअंतर्गत दिल्ली सरकारने राजधानीत फटाक्यांची निर्मिती, विक्री, साठवणूक आणि वापरावर बंदी घातली आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत यंदाच्या दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी असेल. वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने सोमवारी हा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत.
१९व्या शतकाच्या अखेरीस पवनचक्क्यांचा वापर विद्युतनिर्मितीसाठी होऊ लागला. पवनऊर्जेचा वापर विद्युतनिर्मिती करण्यासाठी, पवनचक्की चालविण्यासाठी, पाणी उपसा करणारे किंवा मलमूत्राचा निचरा करणारे पंप चालविण्यासाठी तसेच शिडाची जहाजे चालविण्यासाठी केला जातो. आजच्या काळात जगभर पवनऊर्जेचा वापर करून आधुनिक पद्धतीने तयार केलेल्या वातझोत यंत्रांच्या (विंड टर्बाइन) साहाय्याने विद्युत निर्मिती करण्यात येत आहे.
मुंबईमध्ये घन कचरा व्यवस्थापनेसंबंधी नागरिकांच्या तक्रारी १२४% नी वाढल्या आहेत. वायु प्रदूषणाच्यासंबंधी नागरिकांच्या तक्रारी २३७ % नी आणि मल : निसारणासंबंधी नागरिकांच्या तक्रारी ३५% नी वाढल्या असून सन २०२२ मध्ये या तक्रारी सोडवण्याचा सरासरी अधिकतम कालावधी ३१ दिवस असल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे. प्रजा फाउंडेशनकडून मंगळवार दिनांक १६ मे रोजी सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण स्थितिदर्शक अहवालामध्ये (ईएसआर २०२१-२२) प्रति दिन ६३०० मेट्रिक टनाच्या ७३% ओला कचरा जम
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वृक्षलागवडीचा पर्याय हा कधीही फायदेशीर. परंतु, मुंबईसारख्या फारसे मोकळे भूखंड नसलेल्या शहरात वृक्षलागवडीलाही मर्यादा येतात. त्यावरच उपाय म्हणून काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने मियावाकी वनांच्या उभारणीला वेग दिला. तेव्हा, या मियावाकी वनांचे फायदे व मुंबईतील या वनांची सद्यस्थिती याचा आढावा घेणारा हा लेख...
विकासाच्या मागे घिसाडघाईने लागलेल्या खासकरुन युरोपीय आणि पाश्चात्य देशांतील मानवाला, वाढत्या लोकसंख्येबरोबच वाढत्या प्रदूषणाचाही गंभीर धोका भेडसावताना दिसतो. यामध्ये जलप्रदूषण, वायूप्रदूषण, जमिनीचे प्रदूषण, ध्वनिप्रदूषणाचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. वायूप्रदूषणाचा विचार करता, कार्बन, लीड, नायट्रोजन ऑक्साईड्स, सल्फर ऑक्साईड्स अशी काही मुख्य वायू प्रदूषके. कार्बन आणि नायट्रोजन उत्सर्जन व अन्य मोठ्या प्रमाणात वाढणार्या वायू प्रदूषकांमुळे हाडांचे विकार, श्वसनाचे त्रास, फुप्फुसाचा कर्करोग हे आणि असे अनेक
मुंबईत थंडीला सुरुवात झाल्यावर हवेतील प्रदूषण वाढायला लागले आहे व हवेत जाड धुक्याचे (स्मॉग) थर दिसायला लागले आहेत. सतत दोन-तीन दिवस प्रदूषणाचा सरासरी निर्देशांक ३०० च्यावर पोहोचला आहे. डिसेंबर महिन्यात प्रदूषणात वाढच राहाणार आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील वायुप्रदूषणात मोठी वाढ नोंदवण्यात आली. हवेचा दर्जा दाखविणारा निर्देशांकदेखील ३००च्यावर गेला. त्यामुळे हाच प्रश्न उपस्थित होतो की, यंदाच्या महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात ‘मुंबई क्लायमेंट अॅक्शन प्लॅन’ अंतर्गत एक कोटींची तरतूद करुनही खरोखरच मुंबईची हवा शुद्ध होणार का?
'जागतिक आरोग्य संघटने'नुसार (डब्लूएचओ) जगभरात हवा प्रदूषणाने दरवर्षी जवळपास ७० लाख लोक मरण पावतात. 'लॅन्सेट हेअल्थ जर्नलचा रिपोर्ट'नुसार महाराष्ट्रामध्ये दरवर्षी १.८ लाख लोकांना प्रदूषित हवेमुळे मृत्यूला सामोरे जावे लागते. देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची संख्या (१९ शहरे) महाराष्ट्रात आहे. याच धर्तीवर 'वातावरण' या संस्थेने हवा प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या चर्चा सत्राचे आयोजन केले होते. त्यामध्ये तज्ज्ञ डाॅक्टरांनी आपली मते मांडली.
दिल्लीत ‘डब्ल्यूएचओ’ने आखून दिलेल्या प्रदूषणाच्या वार्षिक लक्ष्याचे उल्लंघन १४ वेळा झाले आहे. जानेवारी २०१९ मध्ये भारताने ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम’ची (एनसीएपी) घोषणा केली. ज्यामध्ये देशातील १२२ शहरांमध्ये ‘पीएम २.५’ कणांच्या संख्येत २० ते ३०टक्के कपात करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. मात्र, ‘कोविड’मुळे या कार्यक्रमाचे काम संथगतीने सुरू आहे.
नवी मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कळंबोली येथे स्वयंचलित हवा गुणवत्ता मोजणी स्थानकाची निर्मिती करणार आहे. यासाठी पनवेल महानगर पालिकेकडून 'एमपीसीबी'ला ना हरकत दाखला मिळाला असून खारघर आणि तळोजा एमआयडीसी परिसरातही ही यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
किनारी क्षेत्राचा फायदा असूनही मुंबईत हवेची गुणवत्ता अनेक वेळा ढासळते. आजही मुंभईची हवेची गुणवत्ता खालावली आहे. भारत सरकारच्या 'सफर'च्या आकडेवारीनुसार आज मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा सर्वसाधारण निर्देशांक (एक्यूआय) २९३ नोंदविण्यात आला असून गुणवत्तेचा स्तर 'वाईट' आहे. याउलट पुण्याचा एक्यूआय केवळ ११८ नोंदविण्यात आला आहे.
२०२० मध्ये वायू प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येत मुंबई शहराचा जगामध्ये पाचवा क्रमांक लागल्याचे समोर आहे. ग्रीनपीस संस्थेच्या साऊथइस्ट आशिया विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आहे. मुंबईत वायू प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५ हजारांच्या घरात असून दिल्ली या संख्येत प्रथम क्रमांकावर आहे.
वायू प्रदूषण आणि पर्यावरण संस्थांच्या आर्थिक तरतूदींमध्ये कपात
दोन्ही शहरांची हवा 'अत्यंत वाईट' स्तरावर
हवेच्या गुणवत्तेचा स्तर 'अत्यंत वाईट'
आज हवेची गुणवत्ता 'अत्यंत वाईट' स्तरावर
मागील काही दिवसांत मुंबई महानगराच्या हवेचा स्तर हा गेल्या चार वर्षांतील नीच्चांकी पातळीवर नोंदविला गेला. तेव्हा, यामागील नेमकी कारणे काय आणि वायुप्रदूषणाची पातळी कशी मोजली जाते, याविषयी माहिती सांगणारा हा लेख...
'वातावरण' संस्थेचा अभ्यास
आपल्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान जो बायडन यांनी मोदी सरकारवर नेहमीच टीका केली. भारत सरकारने पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील धार्मिक अत्याचारग्रस्तांना देशात आसरा देण्यासाठी ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू केला. मात्र, बायडन यांनी ‘सीएए’विरोधात विधाने केली. तसेच बायडन यांनी ‘एनआरसी’ आणि काश्मीर मुद्द्याच्या अनुषंगानेदेखील भारतविरोधी वक्तव्ये केली.
दिल्लीतल्या प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या दिल्लीला अगदी लागून असलेल्या भागामधले शेतकरी नव्या हंगामाची सुरुवात करण्यापूर्वी पिकांचे खुंटे जाळतात. वरवर पाहता हा काही फार मोठा मुद्दा वाटत नसला तरी तो अतिशय गंभीर विषय आहे.
‘ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के, जरा बच के, ये है मुंबई मेरी जाँ...’ आजही मुंबईच्या परिस्थितीला हे फिल्मी गीतातील बोल तंतोतंत लागू पडतात. मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरणीय सद्यःस्थितीबद्दल २०१९-२०च्या अहवालातूनही हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करावे लागलेले ‘लॉकडाऊन’ व त्याचा अखिल मानवजातीला भोगावा लागणारा परिणाम याची गणतीच होऊ शकत नाही. तरीही अशा निराशामय वातावरणात आलेली ’वातावरणशुद्धी’ची हीच काय ती सकारात्मक बातमी.
'केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने (सीपीसीबी) जाहीर केलेल्या अहवालामध्ये देशातील १२२ प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे मुंबईतील वायुप्रदूषण २० ते ३० टक्क्यांनी कमी करणे आवश्यक आहे.
मुंबईच्या वायुप्रदूषणात अतिसूक्ष्म कणांची पातळी धोकादायक अवस्थेत पोहोचली असून त्यामुळे वायुप्रदूषणात वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यानिमित्ताने ही समस्या व त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबईला शुद्ध हवेची गरज
वायुप्रदूषणाने २०१७ रोजी दोन्ही देशामध्ये २५ लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागले
वर्षाला ७० लाख लोकांचा वेळेआधीच मृत्यू होत असल्याचा दावा एका अहवालात केला आहे
हवा प्रदूषणाबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने (आयसीएमआर) धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या प्रदूषित हवेमुळे देशात प्रत्येक आठजणांपैकी एकाचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे
WHO च्या या अहवालानुसार भारतात प्रदूषण आणि विषारी वायूमुळे २०१६ या एका वर्षात १ लाख २५ हजार मुलांचा मृत्यू झाला आहे.
देशाला विश्वगुरु बनण्यासाठी महर्षी दयानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शक तत्वांवर चालण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय आर्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.