Lama ‘चॅट जीपीटी’, ‘जेमिनी’ यांच्याप्रमाणेच ‘लामा’ या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मॉडेलचीही इंटरनेटवर चलती आहे. ‘लामा’ हे मॉडेल यशस्वीरित्या कार्यरत होण्यासाठी, या मॉडेलला मोठ्या प्रमाणात डेटा दिला जातो. याच डेटाच्या माध्यमातून ‘लामा’ नवनिमिर्तीचा आविष्कार घडवतो. परंतु, या आविष्कारामुळे लेखकांवर संक्रांत आली आहे.
Read More
दलाई लामा यांची अमेरिकेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आहे. या भेटीमुळे चीनला चांगल्याच मिर्च्या झोंबल्या आहेत. चीनने या भेटीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दलाई लामा हे पूर्णपणे धार्मिक व्यक्ती नाहीत, असे चीनने म्हटले आहे. धर्माच्या नावाखाली ते चीनविरोधी फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केला. अमेरिकेने दलाई लामांपासून दूर राहावे आणि तिबेटच्या कारभारात हस्तक्षेप करू नये, असे आवाहनही चीनने केले आहे.
अमेरिकी शिष्टमंडळाची ही भेट चीनला चांगलीच जिव्हारी लागली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी काल मंगळवारी पत्रकार परिषदेला संबोधित करताना अमेरिकेला दलाई समूहाचे चीनविरोधी फुटीरतावादी स्वरूप पूर्णपणे ओळखण्याचे आणि जगाला चुकीचे संकेत पाठवणे थांबवण्याचे आवाहन केले.
अमेरिका आणि चीनमधील कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन सतत संघर्ष सुरुच असतो. आताही तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांची अमेरिकेच्या शिष्टमंडळाने भारतात भेट घेतल्यामुळे, या दोन देशांत नवा वाद उफाळून आला आहे. मागच्या 70 वर्षांत तिबेटकडे दुर्लक्ष करणार्या अमेरिकेला अचानक तिबेटचा कळवळा आला. यामागील अमेरिकेची कुटनीती समजून घेणे म्हणूनच आवश्यक!
मणिपूर AFSPA (अशांत क्षेत्रात लष्कराचे विशेष अधिकार)आणखी सहा महिने लागू राहील. सरकारने दि. ३० सप्टेंबर रोजी ते हटवण्याची घोषणा केली होती, परंतु परिस्थिती लक्षात घेऊन आता निर्णय बदलण्यात आला आहे. १९ पोलीस ठाण्यांचा परिसर वगळता संपूर्ण राज्य हा असुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.AFSPA च्या बाहेर ठेवण्यात आलेल्या १९ पोलीस ठाण्यांमध्ये इम्फाळ, लेनफले, सिटी, सिंगजमेई, सेकमाई, लामसांग, पटसोई, वांगोई, पोरोम्पत, हांगेंग, लमलाई, इरिलबुंग, लेमखोंग, थोबुल, बिष्णुपूर, नंबोल, मोइरोंग, काकबचिंग आणि जिबचिंग या
दि. २० व २१ एप्रिल रोजी दोन दिवसीय ‘जागतिक बौद्ध परिषद’ पार पडली. या परिषदेच्या आयोजनाचे कर्तेपण भारताकडे होते. भारतीय सांस्कृतिक मंत्रालय व ‘इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन’ यांनी एकत्रितरित्या या परिषदेचे आयोजन केले होते. जागतिक राजकारणात भारताच्या या आयोजनावर बरीच चर्चा झाली. आजच्या आधुनिक जगात अशा प्रकारच्या जागतिक बौद्ध परिषदेचे हे पहिलेच आयोजन ठरले. जगभरातील अनेक बौद्ध भिक्खू, तत्वज्ञ, अभ्यासक यांनी या परिषदेस हजेरी लावली. त्यामुळे एकप्रकारे भारताने चीनला दिलेला हा शह मानला जात आहे.
अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे चीनने अरूणाचल प्रदेशातील ११ जागांची नावे जरी बदलली, तरी त्यांना वस्तुस्थिती बदलता येणार नसल्याचे भारताने चीनला सुनावले आहे.
आपल्या लष्करी बळावर तिबेट गिळंकृत करणार्या चीनला नेहमीच तेथील स्वातंत्र्य चळवळीची भीती वाटते. अशातच दलाई लामांनी धर्मशाळा येथे तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरा सर्वांत महत्त्वाचा आध्यात्मिक धर्मगुरू म्हणून एका मंगोलियन बालकाचे नाव दिले आहे. या नियुक्त केलेल्या धर्मगुरूमुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. म्हणूनच या तिबेटी आध्यात्मिक स्वातंत्र्यलढ्याच्या सद्यस्थितीची समीक्षा करणे जरूरी आहे.
चीनच्या दडपशाहीला न जुमानता ज्येष्ठ बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरा सर्वात महत्त्वाचा आध्यात्मिक धर्मगुरु म्हणून एका अमेरिकन मंगोलियन मुलाचं नाव दिलं आहे. यामुळे चीनला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.
दि. 6 जुलै रोजी तिबेटियन बुद्धिस्ट समाजाचे सर्वोच्च अध्यात्मिक धर्मगुरू चौदावे दलाई लामा हे वयाच्या 87व्या वर्षांत पदार्पण करणार आहेत. त्यांना अभिवादन व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा म्हणून तिबेट आणि चीन या विषयाचे आणखीन काही पैलू उलगडणारा आजचा हा दुसरा भाग...
दि. 6 जुलै रोजी तिबेटियन बुद्धिस्ट समाजाचे सर्वोच्च अध्यात्मिक धर्मगुरू चौदावे दलाई लामा हे वयाच्या 87व्या वर्षांत पदार्पण करणार आहेत. त्यांना अभिवादन व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा म्हणून तिबेट आणि चीनचा विषय दोन भागांत मांडण्याचा केलेला हा प्रयत्न.
भारत दौर्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अॅन्टोनी ब्लिंकन यांनी बुधवार, दि. २८ जुलै रोजी दलाई लामा यांचे प्रतिनिधी नगोदूप डोंगचंग यांची भेट घेतली. त्यामुळे तिबेटविषयी अमेरिकेची भूमिका काय असेल, याविषयी सूचक इशाराच यानिमित्ताने ब्लिंकन यांनी चीनला दिला आहे.
अंगावर येण्याचा प्रयत्न केल्यास शिंगावरच घेतले जाईल, असा संदेश नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना आपल्या एका साध्याशा कृतीतून दिला. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी यांनी चीनचे प्रमुख विरोधक आणि बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांसह आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक, विश्लेषकांत मोदींच्या शुभसंदेशाचीच चर्चा सुरू होती. चीनने आक्रस्ताळेपणा केल्यास आमच्याकडे ‘तिबेट कार्ड’ आहे, असेच भारताने यातून सूचित केल्
तिबेटवर चीनचे वर्चस्व प्रस्थापित होण्यामुळे भारताची जी मोठी सीमा चीनला भिडली गेली आहे त्यामुळे लडाख, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, भूतान या सर्व ठिकाणी भारताला संरक्षणसज्जता वाढवावी लागत आहे. या संरक्षण सज्जतेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरही मोठा ताण येत आहे हे निश्चित. तिबेटी लोकांना तिबेटच्या स्वातंत्र्याबाबत जी काही आशा आहे, ती केवळ आणि केवळ भारताकडूनच आहे. दलाई लामा असेपर्यंतच या आशेमध्ये धुगधुगी राहील.
चीनविरोधी लढ्यामध्ये त्यांनी अत्यंत मुत्सद्दीपणाने तिबेटला स्वातंत्र्यापेक्षाही स्वायत्तता मिळावी, अशी भूमिका घेतली. मात्र, तिबेटला स्वायत्तता दिल्यास दलाई लामांच्या नेतृत्वाखाली काय होऊ शकते, याची जाणीव चीनला आहे. त्यामुळे त्यांनी स्वायत्ततेच्या मागणीकडे दुर्लक्ष करून आपला विस्तारवाद सुरूच ठेवला आहे. तिबेटला आपली वसाहत बनवून तेथे चिनी संस्कृतीचे आक्रमण तर केले आहेच. पण, सोबतच दलाई लामांचा नवा उत्तराधिकारी हा आपल्याच मर्जीतला असावा, अशीही सोय चीनने करून ठेवली आहे. त्यामुळे अमेरिकेची ताजी भूमिका चीनची चिंता
सध्या कोरोना व्हायरसमुळे चीन चिंतेत आहे. एकटा चीनच नाही तर सगळे जग या व्हायरसच्या राक्षसी प्रतापाने चिंतेत आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. चीनमध्ये या विषाणूमुळे शेकडो माणसे हकनाक मृत्युमुखी पडली, तर हजारो माणसे या आजाराच्या चक्रात अडकून मृत्यूची घटिका मोजत आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी चीनने काही निर्बंध तातडीने लादले आहेत. या सगळ्या गदारोळातही चीनने आपल्या दडपशाहीची एकही संधी सोडली नाही.
अमेरिकेतर्फे मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर
पंचेन लामांप्रमाणे दलाई लामांवरही चीन अत्याचार करेल, असे वातावरण तिबेटमध्ये तयार झाले. चीनचे षड्यंत्र जगासमोर मांडण्यासाठी १९५९मध्ये दलाई लामांनी भारतामध्ये राजाश्रय घेतला. आज जवळजवळ सहा दशकं ते भारतात आहेत.
शि जिंगपिंग यांच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रीया
चीन तिबेटवर आक्रमण करत आहे, ज्यामध्ये मोठी धरणे बांधली जात आहेत, नद्यांचे प्रवाह बदलले जात आहेत. तिबेटमध्ये पर्यावरण आक्रमण होते आहे.
बरं, कालपर्यंतची परिस्थिती अशी होती की, हिंदुत्ववादी, संघवाले म्हटलं की, रान मोकळे असायचे सर्वांना शिवीगाळ करायला. आता नेहरूंविरूद्ध ब्र काढायचा म्हटलं, तर लोक बिनदिक्कतपणे मोदीभक्त ठरवून टाकतात. त्यामुळे सत्य मांडले गेले तरी हवेत उडवला जायचा मुद्दा. खिल्ली उडविली जायची. खरा असूनही बेदखल राहायचा आरोप! नेहरूंनी घालून ठेवलेल्या घोळाचे गांभीर्य कधी देशाच्या ध्यानातच येऊ दिले नाही कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट विचारांच्या राज्यकर्त्यांनी.
दलाई लामांना भारतात आश्रय दिल्यापासून चीन भारताकडे संशयाच्या नजरेने पाहतो. एवढेच नव्हे तर १९५९ साली चिनी अध्यक्ष माओ-त्से यांनी तर तिबेटमधील विद्रोहाला भारताचीच फूस असल्याचा आरोप केला होता.
येत्या ३१ मार्च आणि १ एप्रिलला चीनच्या तिबेट प्रशासनाकडून भारतामध्ये 'थँक्यू इंडिया' हे शिबीर राबवण्यात येणार आहे.