कोकण पदवीधर मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आल्याबद्दल आमदार निरंजन डावखरे यांचा दिलीप जाधव यांच्या अष्टविनायक निर्मिती संस्थेकडून सत्कार करण्यात आला. गडकरी रंगायतनमध्ये 'आज्जीबाई जोरात' या नाटकाच्या सुरुवातीलाच सुप्रसिद्ध कलाकार निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, मुग्धा गोडबोले, जयवंत वाडकर, अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे, मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे संचालक डॉ. विशाल कडणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत निर्माते दिलीप जाधव यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
Read More