विक्रोळी परिसरात विक्रोळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ बांगलादेशी फेरीवाल्यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या सर्वांच्या आधारकार्डवर दि. १ जानेवारी हीच जन्मतारीख नमूद करण्यात आली असून पत्ता साहेबगंज, झारखंडचा दर्शवण्यात आला आहे. विक्रोळी येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विनायक कामथ, युवराज मोरे, गणेश शेट्टी आणि केतकी सांगळे यांनी मार्केटमध्ये रविवार, दि. २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भेट दिली. यावेळी, त्यांना डझनभर संशयित फेरीवाले आढळले. याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
Read More
मुंबई : ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’चा प्रवक्ता असलेल्या सज्जाद नोमानी ( Sajjad Nomani ) याचे ‘व्होट जिहाद’चे वक्तव्य त्यांच्या अंगलट आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नोमानीने परभणी येथील पत्रकारपरिषदेत केलेल्या वादग्रस्त जिहादी मानसिकतेच्या वक्तव्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. आयोगाने त्याची तात्काळ दखल घेत, २४ तासांत या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश परभणी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
ऐन दिवाळी तोंडावर असतानाच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. त्यांचे दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश खेडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे रिसॉट अनिल परब यांच्या मालकीचे असल्याचा आरोप करत ते ते बांधतांना सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने जप्तीची कारवाई केली होती.
जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधलेत. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. त्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावलं आहे. त्यांना दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्या
मुलुंड पश्चिम येथे "द केरळ स्टोरी" सारखी घटना घडली आहे. यासंबंधी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. २६ वर्षीय मोहम्मद फैजान हा प्रयागराज (अलाहाबाद) उत्तर प्रदेश येथे राहत असुन तो कॅपिटल मार्केटशी संबंधित एक वर्षाचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी ठाणे येथे आला होता. फैजानने दि. १४ जून रोजी मुंबई येथील २१ वर्षीय जैन हिंदू मुलीला घेऊन पळून गेला आहे,
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. कोल्हापूर बँकेसह इतर अनेक प्रकरणांमध्ये चौकशीचा फेरा मुश्रीफ यांच्या भोवती आवळलेला असताना त्यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांची आता चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नगर : नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा लव्ह जिहाद संबंधित केस उघडकीस आली आहे. नगर जिल्ह्यात लव्हजिहाद प्रकरणात आझीम अकील शेख (दुरगाव) याने दलित अनुसूचित जातीच्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण केले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यात जातीने लक्ष घालून हा प्रकार समोर आणला आहे. त्यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. तसेच, किरीट सोमय्या यांनी अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांशी आणि पोलीस अधीक्षकांशी संवाद साधला.
निफाड तालुक्यातील १८ वर्षीय मुलीस फुस लावून परराज्यात नेण्यात आले. सुदैवाने ग्रामीण पोलिसांनी तपास करून मुलीची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका करत मुलीचा ताबा पालकांना दिला आहे. हा 'लव्ह जिहाद'चा प्रकार असून मुलीचे अपहरण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे माजी खा. किरीट सोमेय्या यांनी केली.
पुणे : कोरोना महामारीच्या काळात बनावट कागदपत्रे, बनावट भागीदारी दस्त तयार करून जम्बो कोविड सेंटरचे कोट्यवधींचे कंत्राट मिळविणार्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनीच्या चार संचालकांपैकी राजू नंदकुमार साळुंखे यांना अटक करण्यात आली आहे. साळुंखे हे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि सुजीत पाटकर यांचे पार्टनर आहेत. पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विट केले आहे.
दापोलीतील साई रिसॉर्ट आणि तेथील अनधिकृत बांधकामावरून भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या पुन्हा एकदा समोर आले आहेत. सोमय्या यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर नव्याने आरोप केले असून परबांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून हे रिसॉर्ट बांधल्याचा आरोप केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल परब यांचे वांद्रे येथील कार्यालयावर म्हाडा कारवाई करण्याची शक्यता आहे. ईडीने साई रिसॉर्ट प्रकरणी 10 कोटींच्या संपत्तीवर कारवाई केल्यानंतर आता म्हाडादेखील कारवाई करण्याची शक्यता आहे. वांद्रे येथील अनिल परब यांच्या कार्यलयावर म्हाडाकडून हातोडा चालवण्यात येण्याची शक्यता आहे.
मढच्या स्टुडिओचा वापर तात्काळ थांबवा
सलीम-जावेद' दोघांचाही मुक्काम ऑर्थर रोड जेल!
हम झुकेंगे नही' म्हणणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आरोप करत १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांची पोलखोल करणार असल्याचा दावा केला आहे.
शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी उभारलेल्या ठाण्यातील विहंग गार्डन येथील बेकायदा बांधकामप्रकरणी ठाणे महापालिकेने ठोठावलेला ११ कोटी रुपयांचा दंड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ २५ लाखांवर आणला असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
यापुढे सीबीआय राज्य सरकारच्या परवानगीशिवाय कुठलाही तपास करू शकत नाही
महिलेच्या मृत्यूला जबाबदार नक्की कोण? भाजपनेते किरीट सोमय्या यांनी विचारला प्रश्न