आमदार कालिदास कोळंबकर यांनी सोमवार, १० मार्च रोजी विधानसभेत मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्न उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेरीवाल्यांच्या समस्यांबाबत महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला उचित सूचना करण्याचे आश्वासन दिले.
Read More
मुंबई : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे सगळे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले. अनेक जिल्ह्यांतून उबाठा गट हद्दपार झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना याबाबत आधीच ताकीद दिली होती. बाळासाहेब म्हणाले होते, “उद्धव असा वागलास तर पक्ष संपेल...” बाळासाहेबांचे शब्द खरे ठरले, असा गौप्यस्फोट महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आ. कालिदास कोळंबकर ( Kalidas Kolambkar ) यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना केला. “माझ्या चौथ्या टर्मला उमेदवारी देण्यात उद्धव ठाकरेंनी आडकाठी आणली होती,” असेही त्यांनी सांगितले. सलग
कालिदास कोळंबकर ( Kalidas Kolambkar ) यांचा विजयीविक्रम!
उद्धव ठाकरेंचे नेमके काय चुकले, याविषयी बाळासाहेबांचे शिवसैनिक तथा भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर ( kalidas Kolambkar ) यांनी परखड भाष्य केले. सलग नऊवेळा विजयी होऊन त्यांनी विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद...
मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई सचिव शिवा चौहान ( Shiva Chauhan ) यांनी नुकताच आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. वडाळा विधानसभेचे आमदार तथा महायुतीचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांना बहुमताने विजयी करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.
नायगाव (दादर) येथील BDD चाळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकल्पाला त्यांचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नाव दिले होते. आव्हाड यांच्या निर्णयावर विद्यमान सरकारने फुली मारली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नायगाव (दादर) येथील बीडीडी चाळीला शरद पवार यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आ. कालिदास कोळंबकर यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. त्यासाठी उपोषणही केले. महायुती सरकार सत्तेवर येताच, त्यांनी या चाळीच्या नामांतरासंदर्भात सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, नायगाव बीडीडीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे
‘आषाढ शुद्ध प्रथमा’ अर्थात ‘आषाढस्य प्रथमः दिवसः’ असे म्हणताच आपसूक महाकवी कालिदासाचे नाव ओठी येते आणि प्रथम आठवते ते त्याने केलेले पावसाचे रम्य वर्णन. ‘ऋतुसंहार’ या खंडकाव्यात कालिदासाने सर्व ऋतूंचे रसिकवाचकाला खिळवून ठेवणारे असे वर्णन केले आहेे. कालच प्रारंभ झालेल्या आषाढ मासाच्या निमित्ताने ‘ऋतुसंहार’ खंडकाव्यातील वर्षा ऋतूची कालिदासाने वर्णिलेली ही महती...
"मुंबईच्या सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीत महत्वाची भूमिका निभावणार्या गिरणी कामगारांच्या योगदानाचा सन्मान करत राज्य शासनाने त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध करून दिला आहे. आज गिरणी कामगारांच्या वारसांना हक्काचा निवारा मिळत आहे म्हणूनच या घरांमध्ये त्यांच्या आई- वडिलांचे छायाचित्र लावून त्यांचे योगदान सार्थकी लावावे”,असे आवाहन गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आ. सुनील राणे यांनी केले.
वैद्यकीय सुविधा सुधारणा आणि रुग्णांसाठी पायाभूत सुविधा विकास करण्याबाबत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सायन येथील लोकमान्य टिळक सामान्य रुग्णालयास भेट दिली. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, आमदार कालिदास कोळंबकर, महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि संबंधित अधिकारी व डॉक्टर्स उपस्थित होते.
वडाळा विधानसभेचे ज्येष्ठ आमदार मा. कालीदासजी कोळंबकर यांच्या पत्नी श्रीमती नम्रता कालीदास कोळंबकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सृष्टी बिल्डींग, फ्लॅट नंबर ७०२, ग. द. आंबेकर मार्ग, भोईवाडा नाका, परेल भोईवाडा येथून सायंकाळी ६:०० वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांना ट्विटद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.
नाशिक येथील सांस्कृतिक केंद्र ‘महाकवी कालिदास कलामंदिरा’चे ’स्मार्ट सिटी’अंतर्गत सुमारे २१ कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण केल्यानंतरही नाट्यमंदिराचे शुक्लकाष्ट संपण्याचे नाव नाही. रविवार, १४ मे रोजी ’कालिदास कलामंदिरा’त एका व्यावसायिक नाटकाचा प्रयोग सुरू असताना ऐन उन्हाळ्यात वातानुकूलित यंत्रणा बंद पडली. त्यावेळी कलामंदिराचे व्यवस्थापक कहाणे जागेवर नव्हते.
नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिरात मराठी नाटकांना २५ टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव महापालिकेने घेतला आहे. गेल्या महिन्यांत सिनेनाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नाट्यगृहांच्या अव्वाच्या सव्वा भाडेवाढीवरुन तक्रार केली होती. दामले यांनी मराठी नाट्यसृष्टी टिकवण्यासाठी परवडणारे दर असावे, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी शासनाच्या सांस्कृतिक विभागाला त्यानुसार सूचना केल्या. त्यामुळे नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात मराठी नाटकांना
आज आषाढ शुद्ध प्रतिपदा अर्थात आषाढस्य प्रथम दिवसे! संपूर्ण साहित्यजगतात केवळ कालिदास हा असा एकमेव कवी आहे की, ज्याच्या काव्यातील एका रचनेमुळे तो दिवस त्या कवीच्या नावे ओळखला जाऊ लागला. कालिदासाच्या उत्तमोत्तम काव्यरत्नातील ‘मेघदूत’ हे एक रत्न. आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघदूताचा थोडक्यात आस्वाद या लेखातून घेऊया...
‘आधुनिक काळातील कालिदास’ अशीच पदवी ज्यांना शोभून दिसेल, असे कविवर्य म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. ज्यांच्या कवितेत फक्त देशप्रेमच नाही, तर कारुण्यरस, वीररस ज्वलंत भावनेने दिसून येतात. सावरकरांच्या कवितांचे जर वर्गीकरण केले गेले, तर त्यामध्ये देशप्रेम, विरह, स्तुतीपर काव्य असे वेगवेगळे भाग करता येतील. यातील काही कवितांमधले भाव तर इतके तरल आहेत की, ही कविता त्यांनी अंदमानसारख्या भीषण परिस्थितीत लिहिली असेल, असं वाटत नाही.
नाशिकचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली माहिती
मुंबईच्या मध्यवर्ती भागात दादर येथील तब्बल ४२ हजार चौरस मीटर जागेवर उभ्या असलेल्या प्रमोद महाजन कला उद्यान येथील प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध करायला सुरुवात केली आहे. आम्हाला या प्रकल्पाची गरज नाही, महापालिकेने हा प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरित करावा अशी आक्रमक भूमिका आता स्थानिक घेत आहेत.
आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबई महानगरपालिकेने शहरात सध्या विकासाच्या नावाखाली सुडाचे राजकारण करण्याचा गोरखधंदा चालविल्याचा आरोप होत आहे.
संस्कृत ही देशातील सर्व भाषांचा आत्मा आहे. भारतातील प्राचीन साहित्याचा समृध्द ठेवा मोठ्या प्रमाणात संस्कृत भाषेमध्ये आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन करण्याचे काम कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात व्हावे. त्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात विश्वविद्यालयाने वाटा उचलावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयच्या अखत्यारित येणाऱ्या विभागीय माहिती कार्यालय, नाशिक सध्या 'अश्विनी बॅरेक्स कक्ष क्र. ५ ते ८ छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रासमोर, नाशिक रोड, नाशिक' येथे कार्यरत होते. परंतु आता हे कार्यालय मीडिया सेंटर बी.डी.भालेकर मैदान, महाकवी कालिदास कलामंदिर समोरील महानगरपालिकेच्या जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे
नातेवाईकांकडे मृतदेह न सोपविताच अपघातग्रस्त तरुणाचे अंत्यसंस्कार
वर्षाधारा बरसू लागल्या की आपसुकच महाकवी कालिदासांच्या काव्यरचनांचा स्मृतिदरवळ सुखावून जातो. तेव्हा, उद्या, दि. २२ जूनपासून आषाढ मास सुरु होतोय. त्यानिमित्ताने आषाढाच्या या प्रथमदिवशी कालिदासांच्या पाऊस, विरह आणि मिलनाची भावनिक गुंफण असलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करुया...
महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवणारा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर याचा नाशिक महापालिकेच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. त्याला बक्षीस म्हणून ११ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. हर्षवर्धन सदगीर याची नाशिक महापालिकेचा सदीच्छा दुत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे कालिदास कोळंबकर यांची विधानसभा हंगामी अध्यक्षपदी निवड
नव्या विधानसभेचे उद्या गठन, नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी
काँग्रेसचे वडाळा विधानसभेचे आमदार आणि नारायण राणेंचे खंदे समर्थक अशी ओळख असलेल्या कालिदास कोळंबकर यांनी सोमवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. ३१ जुलै रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार राहुल शेवाळेंना पाठिंबा जाहीर केला.
आज ‘महाकवी कालिदास दिन.’ कालिदासाची जन्मतिथी उपलब्ध नाही, पण मेघदूतातल्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या शब्दयोजनेमुळे कालिदास या तिथीशी एवढा जोडला गेला की, ‘आषाढ प्रतिपदा’ हा दिवस ‘कालिदास दिन’ म्हणून साजरा केला जातो.
महापालिकेला एक नवीनच स्वप्न पडू लागले आहे ते म्हणजे, कालिदासांनी ‘मेघदूत’ रचले, आमची महापालिका ‘खाजगी दूत’ नेमतेय, ही नसती उठाठेव कशासाठी?