पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी पुरविण्यासाठी सुरू केलेल्या ‘हर घर नल से जल’ योजनेतून जल जीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्यात जलक्रांती’ होत आहे. भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील १९६ गाव-पाड्यांमध्ये ‘जल जीवन मिशन’ व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ३८१ कोटी रुपये खर्चून नळाने पाणीपुरवठा करण्याच्या योजनांचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.
Read More
नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी नुकताच पालिकेचा २,२२७ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर केला. विशेष म्हणजे, कोणतीही करवाढ केली नसल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सादर झालेला अर्थसंकल्प पुढील आठवड्यात महासभेत मांडला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा अर्थसंकल्प अनेक अर्थाने वेगळा ठरला. शहराच्या विकासाबरोबरच महापालिकेने पर्यावरणालाही विशेष महत्त्व दिलेले दिसते.