(CM Devendra Fadnavis) राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दि. ११ ते १२ डिसेंबर दरम्यान पहिला दिल्ली दौरा केला. या दौऱ्यावर असताना त्यांनी दिल्लीतील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या आहेत. या भेटीत त्यांनी निरनिराळ्या मूर्ती देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले आहे.
Read More
‘सध्या आपल्या संसदेचे आणि विधिमंडळांचे कामकाज सुरळीत नाही, हे उघड आहे. लोकशाहीच्या या मंदिरांचा जाणिवपूर्वक पावित्र्यभंग होत आहे. पक्षांमधील संवाद हरपला आहे आणि भाषणाची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे, हे अयोग्य आहे. भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या मार्गावर आहे. या प्रवासात राज्य विधिमंडळाचे सदस्य (आमदार) आणि संसदेतील सदस्य (खासदार) हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत’, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शुक्रवार, दि. १० मे रोजी सहपरिवार अयोध्येत रामललाचे दर्शन घेतले. दुपारी सर्वप्रथम त्यांनी हनुमान गढी येथे मारुतीरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर राम मंदिर येथे श्री रामलला चरणी ते नतमस्तक झाले. संध्याकाळी सर्व परिवाराने मिळून शरयू नदीची आरती केली. गुरुवारपासूनच स्थानिक प्रशासन उपराष्ट्रपतींच्या आगमनाच्या तयारीला लागले होते. दरम्यान राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासचे महामंत्री चंपत राय व अन्य सदस्यांसह उपराष्ट्रपतींची बैठकही संपन्न झाली.
खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची संसदेबाहेर केलेली मिमिक्री ही ठिकच आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले आहे. गुरुवारी दिल्ली येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
घमंडिया युतीच्या खासदारांचे कृत्य देशासाठी लज्जास्पद आणि अस्वीकारार्ह आहे, असा घणाघात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. तृणमुल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली होती. याबद्दल मंत्री लोढांनी 'X' वर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उपराष्ट्रपतींचे मिमिक्री प्रकरण चांगलेच भोवले आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अटकेची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबईतील लालबाग परिसरात भाजपकडून गुरुवारी जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अपमान हा संपुर्ण भारताचा अपमान असल्याचे मंत्री लोढांनी म्हटले आहे.
राजकारणात विरोधकांनी एकमेकांच्या नकला करणे, हे जनतेच्याही म्हणा आता चांगलेच अंगवळणी पडलेले. अगदी बाळासाहेबांपासून ते राज ठाकरेंपर्यंत महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठांवरील नकलांनी खोचक राजकीय टिप्पण्या आणि एकमेकांना रीतसर चिमटेही काढले. नक्कलच काय तर व्यंगचित्रांच्या फटकार्यांतूनही बाळासाहेबांनी राजकीय विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. पण, नक्कलबाजीतून होणारी ही राजकीय शेरेबाजी नेमकी कोणाची, कुठे आणि कोणासमोर करावी, हेही तितकेच महत्त्वाचे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना फोन करून त्यांच्या अपमानाबद्दल शोक व्यक्त केला आहे. गेल्या दोन दशकांपासून अशा अपमानाचा सामना करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी ही दुःखद घटना असल्याचे म्हटले आहे. उपाध्यक्ष जगदीप धनखड यांनी हा त्यांच्या शेतकरी पार्श्वभूमीचा आणि जाट समाजाचा अपमान असल्याचे म्हटले होते. दि.१९ डिसेंबर २०२३ रोजी विरोधी खासदारांनी संसदेबाहेर उपराष्ट्रपतींची नक्कल केली होती आणि त्यांची खिल्ली उडवली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या प्रकरणावर शोक व्यक्त
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री करणारा व्हिडिओ संसदेत बनवल्याच्या वादावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलंबित झालेले विरोधी पक्षाचे खासदार संसदेच्या पायरीवर निदर्शने करत होते. यावेळी तृणमुल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची लज्जास्पद पद्धतीने थट्टा करताना दिसले. तर काँग्रेस नेते राहुल गांधी हे त्यांचे व्हीडिओ शुट करण्यात व्यस्त होते आणि इतर खासदार हसत मजा घेत होते.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा झालेला अपमान हा अतिशय गंभीर आहे. लोकप्रतिनिधींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यास शिष्टाचाराचे बंधन हवे, असे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी व्यक्त केले आहे.तृणमूल काँग्रेस खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेच्या पायऱ्यांवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली होती. त्यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी हे हसून त्या प्रकाराचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होते. या प्रकाराचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निषेध
घमंडिया युतीची कृती देशासाठी अत्यंत लज्जास्पद आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर संताप व्यक्त केला आहे. मंगळवारी लोकसभेतून विरोधी पक्षांच्या ७९ खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर तृणमुल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली. विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहूल गांधीनी त्यांचा व्हिडीओ बनवला.
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. संसदेच्या सुरक्षेमध्ये मोठा गोंधळ झाल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भुमिका घेतली. संबंधित प्रकरणावर संसदेच्या सभागृहात चर्चा करावी, अशी मागणी विरोधीपक्षाच्या खासदारांकडून करण्यात आली होती.
राज्यसभेचे कामकाज गुरुवारी सुरू होताच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नतमस्तक झाल्याबद्दल विरोधी पक्षातील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. सुप्रिया श्रीनेत यांचे नाव न घेता उपराष्ट्रपतींनी विरोधकांना सुनावले. काँग्रेसच्या काही नेत्यांनी उपराष्ट्रपतींचा व्हिडिओ 'भारताचे उपाध्यक्ष' या कॅप्शनसह शेअर केला होता. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये उपराष्ट्रपती धनखड कारमधून खाली उतरून भारतीय परंपरेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना नमस्कार करत आहेत.
अथर्ववेद हा वैद्यकशास्त्राचा विश्वकोश आहे. चारही वेद वैद्यकशास्त्राच्या विविध पैलूंच्या संदर्भाने परिपूर्ण आहेत.जग झपाट्याने बदलत आहे, पण जेव्हा आपण वेदांकडे पाहतो तेव्हा माहितीची समृद्ध खाण आपल्याला गवसते. त्यामुळे अथर्ववेद हा आरोग्याशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला देऊ शकतो, असे विधान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
देशाच्या प्रगतीमध्ये कोणत्याहील प्रकारचे अडथळे येऊ नयेत, यासाठी भारतविरोधी वक्तव्ये करणाऱ्यांविषयी ‘मूकदर्शक’ होऊ नका; असा सल्ला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जोधपूरस्थित राष्ट्रीय विधी विद्यापीठातील (एनएलयू) विद्यार्थ्यांना नुकताच दिला आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी२० शिखर परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'दूरदर्शी' नेतृत्वाची प्रशंसा केली. ओम बिर्ला म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या 'दूरदृष्टी आणि मार्गदर्शनामुळे' जी२० नेत्यांनी जारी केलेल्या नवी दिल्ली जाहीरनाम्यात संवेदनशील मुद्द्यांवर एकमत झाले.
सोमवारपासून संसदेचे विशेष अधिवेशन चालू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याहस्ते नवीन संसदेच्या गेटवर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन, पीयूष गोयल, अर्जुन राम मेघवाल, काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी आणि प्रमोद चौधरी हे उपस्थित होते.
आज (१६ ऑगस्ट २०२३) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा ५वा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने संपूर्ण देश त्यांची आठवण करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी 'सदैव अटल' या स्मृतीस्थळावर जाऊन अटलजींना नमन केले.
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही संसदेत विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. राज्यसभेत आपचे खासदार संजय सिंह आणि राघव चढ्ढा यांनी गोंधळ घातला. इतर सदस्यांना बोलू दिले नाही आणि कामकाजात व्यत्यय आणला. यावेळी उपराष्ट्रपती आणि सभागृहाचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी दोघांनाही संसदेत योग्य वर्तवनूक करण्याचा सल्ला दिला.
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल (प्रचंड) हे बुधवार ३१ मे पासुन चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. ते विविध मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे. ३१ मे ते ३ जून या कोलोवधीत ते विविध नेत्यांच्या भेटी घेऊन चर्चा करणार आहेत. या भेटीदरम्यान प्रचंड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीदेखील भेट घेणार आहेत.
नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याही संदेशाचे वाचन राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी केले. उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, भारतीय लोकशाहीच्या अभूतपूर्व विकास प्रवासाच्या या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षणाबद्दल संपूर्ण देशाचे मनःपूर्वक अभिनंदन करताना मला खूप आनंद होत आहे. आपले सध्याचे संसद भवन हे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज जगातील एक मोठी शक्ती म्हणून भारताची ओळख होण्यापर्यंतच्या ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार आहे. आत्मनिर्भर भारताचे
सर्वसामान्य भारतीय माणसाला राज्यसभा,विधान परिषद, उपराष्ट्रपती या निवडणुकांविषयी फारशी माहिती नसते. वृत्तपत्रात बातम्या येतात तेव्हा भारतीय मतदारराजाला या भारतीय राज्यघटनेतील व भारतीय राज्यव्यवस्थेतील कळीच्या घटकांविषयी माहिती होते. काही वेळेला या निवडणुका बिनविरोध होतात. त्यामुळे त्या फार चर्चेतही येत नाहीत.अर्थात, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींमुळे आपण राजकीय घडामोडींबाबत इतके बहुश्रुत झालो आहोत. पण, त्यात माध्यमनिर्मित रंजकतेचा भाग अधिक आहे. ‘आयपीएल’ आणि चित्रपटाबाबत आपण जितके जागरूक अ
विरोधी पक्षांकडून माजी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी आणि काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे