( Israel-Iran War ) इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर तब्बल २०० क्षेपणास्त्र डागली होती. इस्रायल या हल्ल्यानंतर इराणवर पलटवार कधी करणार, या कडे सर्व जगाचे लक्ष्य लागून होते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या लीक झालेल्या कागदपत्रांनुसार इस्रायल इराणवर मोठा हल्ला करणार असल्याची अत्यंतिक गोपनीय माहिती उघडकीस आल्याने जगभर खळबळ उडाली होती. अखेर इस्रायलने शनिवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे भीषण हवाई हल्ला करत इराणच्या सततच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Read More
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली मोदींची भेट