(Narendra Bhondekar) राज्याच्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम दि. १५ डिसेंबर रोजी नागपूर येथील राजभवन येथे पार पडला. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी शिवसेनेच्या उपनेते पदाचा तसेच पूर्व विदर्भाच्या समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाने मला मंत्रिपदाचं आश्वासन दिल्यानंतरही आता डावलल्याने शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप होत असून वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामाही देणार असल्याचे नरेंद्र भोंडेकर म्हणाले आहेत.
Read More