( Palghar dependent on Gujarat after 10 years of district formation the work of the district hospital is still incomplete ) जिल्हानिर्मिती होऊन दहा वर्षे लोटली, तरी पालघर अद्याप गुजरातवर अवलंबून असल्याचे वास्तव समोर आले आहे. येथील गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी नंडोरे या गावात जिल्हा रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली. परंतु, अद्याप 75 टक्केही काम पूर्ण न झाल्याने रुग्णांचे हाल कायम आहेत.
Read More
बुद्ध जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दि .१६ मे रोजी नेपाळच्या एक दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. या दौर्यादरम्यान 'पश्चिम सेती प्रकल्प' विकसित करण्यासाठी भारत सरकारशी चर्चा वजा विनंती करण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला आहे.
महाराष्ट्रात निर्माण होणारी वीज, त्या विजेची मागणी, नियोजन, ‘महावितरण’कडे असलेली सुसज्जता, यंत्रसामुग्रीने परिपूर्ण असलेल्या राज्य ऊर्जा विभाग आणि महावितरणच्या मागील दोन वर्षांतील अनागोंदी आणि नियोजनशून्य कारभाराच्या अनेक कथा आपल्या समोर आलेल्या आहेत.
राज्यावर भीषण वीज संकटाचे काळे ढग घोंघावत आहेत. अघोषित भारनियमनामुळे उद्योग बंद पडतील अशी स्थिती आहे. पण कुण्या नेत्याच्या घरी धाड पडली म्हणून थेट पंतप्रधानांच्या घराचा उंबरठा ओलांडणारे लोकनेते आज ऊर्जा मंत्र्यांच्या बाजूने का उभे राहत नाहीत ? असा गंभीर प्रश्न माजी ऊर्जामंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.