व्हिएतनाममध्ये रामकथेचा सांस्कृतिक प्रभाव अत्यंत खोल असून, तेथील समृद्ध परंपरेचा तो एक भाग आहे. प्राचीन ‘चम्पा’ राजवंशाने भारतीय संस्कृतीशी असलेली आपली नाळ अधिक दृढ केली आणि रामकथेचा प्रसार व्हिएतनाममध्ये केला. ‘चाम’ व ‘खमेर’ समाजांनी आपल्या नृत्यनाट्य परंपरांमधून, रामायणाच्या कथा आणि पात्रांना सजीव ठेवले. ‘त्रुयेन कियू’ आणि ‘रोबन याक’ सारख्या लोककला प्रकारांमध्ये रामकथेतील मूल्ये, नीतिकथा आणि आदर्श यांचे प्रभावी दर्शन घडते. बौद्ध संस्कृतीत देखील रामकथेची छाया जाणवते, जिथे प्रभू राम आदर्श पुरुष व धर्मनिष्ठ
Read More
यापूर्वीच्या लेखांतून भारतातील खगोलशास्त्र, गणितशास्त्र आणि एकूणच वैज्ञानिक प्रगतीचा आपण आढावा घेतला. पण, परकीय आक्रमणांच्या पलीकडेही भारतीय विज्ञान परंपरा विस्मृतीत जाण्यामागे अनेक कारणे आहेत. आजच्या लेखातून या विज्ञान परंपरेच्या विस्मृतीच्या कारणांचा केलेला हा उहापोह...
भारतीयांनी वैदिक काळात स्थापत्य, ज्योतिष, खगोलशास्त्र, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये अपार असे ज्ञान आणि कौशल्य संपादित केले होते. दीर्घकाळापर्यंत भारतीय या ज्ञानाचा दैनंदिन वापर करत होते. मात्र, इंग्रजी आक्रमणानंतर त्यात खंड पडला. तेव्हा अशाच काही भारतीय वैज्ञानिक संशोधन परंपरांचा पुनःपरिचय करुन देणारा हा लेख...
आज गणितातील प्रमेये, सिद्धांत हे पाश्चात्त्य गणिततज्ज्ञांच्या नावे असले, तरी भारतीय गणिती परंपरा ही ज्ञानसमृद्ध आणि काळाच्या पलीकडचा विचार करणारी होती. परंतु, दुर्दैवाने वसाहतवाद आणि युरोपीय वंशश्रेष्ठत्वाच्या सिद्धांतामुळे प्राचीन भारतीय गणिती परंपरा पद्धतशीरपणे दुर्लक्षित केल्यामुळे ती काहीशी अडगळीत पडली. पण, आज सर्वच क्षेत्रांत भारतीय ज्ञानपरंपरेचे पुनर्जागरण होत असताना, गणिती परंपरेचा समृद्ध वारसाही प्रत्येक भारतीयाने जाणून घेणे, त्याचा प्रचार-प्रसार करणे, हे देखील तितकेच महत्त्वाचे. तेव्हा, भारतीय गणित
प्रत्येक शहराला आपली स्वतःची ओळख असते. ही ओळख जपत ते शहर मार्गक्रमण करत आपल्यापाशी असलेला पुरातन अनमोल ठेवा एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे हस्तांतरित करत असते. अशीच आपली पौराणिक आणि धार्मिक ओळख नाशिक शहराने जपली आहे. पेशवेकाळापासून सुरू झालेला रहाडींचा रंगोत्सव बदलत्या काळानुसार अधिक खुलत चालला असून येणारी नवीन पिढी अधिक जोमाने हा उत्सव साजरा करीत आहे. उपलब्ध कागदपत्रांवरून २० रहाडी असलेल्या नाशकात सध्या सात रहाडी अस्तित्वात आहेत. पुढील काळात सर्वच्या सर्व रहाडी खुल्या करुन नाशिकच्या या रंगोत्सवाला अधिक झळाळ
भारतीय संस्कृतीचे विविध पैलू हे वैज्ञानिक पायावर आधारभूत आहेत. तसेच त्यांना आरोग्याचेही अधिष्ठान लाभले आहे. म्हणूनच आपले सणवार, प्रथा-परंपरा, व्रतवैकल्ये अशा सगळ्याच्या मुळाशी मानसिक व सामाजिक आरोग्य निगडित आहे. त्याचेच या लेखात केलेले सखोल विवेचन...
भारतीय संस्कृती, ज्ञान, शास्त्र, कला आणि परंपरांचा अभ्यास व प्रचार-प्रसार करण्यासाठी नाशिकमधील काही मान्यवरांनी पुढाकार घेतला. त्यातूनच संस्था स्थापण्याचा विचार पुढे आला. ती संस्था म्हणजे ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’. या संस्थेद्वारे भारतीय संस्कृती, साहित्य, मंदिर स्थापत्य, वारसा, कला, इतिहास, प्रथा-परंपरा, मूर्तिशास्त्र, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींचा अभ्यास आणि प्रचार-प्रसार करण्याचे कार्य आजही अव्याहतपणे सुरू आहे. या लेखाच्या माध्यमातून संस्थेचा आणि संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा सखोल आढावा..
निव्वळ मतांच्या राजकारणासाठी स्वदेश आणि स्वधर्माचा अपमान करण्यापर्यंत आता काँग्रेस आणि अन्य विरोधकांची मजल गेली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सनातन धर्माचा अपमान करणार्या या प्रवृत्तींचा तितक्याच आक्रमकपणे प्रतिवाद केला जात आहे, ही स्वागतार्ह बाब म्हटली पाहिजे. योगी आदित्यनाथांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत भाजपच्या नेत्यांनी या लांगूलचालनवादी ‘नॅरेटिव्ह’ला तितक्याच आक्रमकपणे छेद दिला आहे.
मानवी स्थलांतर ही खरं तर मानवी उत्क्रांतीपासूनचीच निरंतर सुरु असलेली प्रक्रिया. अशा स्थलांतरातून नवीन प्रदेशात प्रत्येक धार्मिक समुदायाची तेथील स्थानिक समाजांशी जुळवून घेण्याची प्रक्रियाही वेगवेगळी असते. काही गट नव्या देशांत गेल्यावरही आपली वेगळी ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोकसंख्येच्या बळावर स्थानिक संस्कृतीत मोठे बदल घडवण्याचा प्रयत्नही करताना दिसतात. मात्र, हिंदू समाजाचा दृष्टिकोन प्रारंभीपासूनच यापेक्षा पूर्णतः वेगळा राहिला आहे. हिंदू जिथे जातो, तेथील स्थानिक संस्कृतीशी तो समरस होतो, त्या
हिंदू संस्कृतीवर टीका करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी डाव्या कंपूची असते. त्यासाठी ते खोटी माहितीदेखील इतिहास म्हणून बेदरकारपणे प्रसिद्ध करतात आणि त्यांची इकोसिस्टम त्यांची लगेचच री ओढते. मात्र, आता जनता जागृत झाली आहे, डाव्यांच्या प्रत्येक आरोपाला संदर्भासहित उत्तर दिले जात आहे. महाकुंभबाबतही डाव्या इकोसिस्टीमने असेच अपप्रचाराचे प्रयत्न करून पाहिले, पण त्यात ते यंदा सपशेल अपयशी ठरले.
‘आम्ही भारताचे लोक’ या वाक्याने आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकाची सुरुवात होते. त्यामुळे परंपरा असो वा संविधान ‘लोक’ हा घटक पूर्वापार आपल्या देशात सर्वच दृष्टींनी केंद्रस्थानी आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वाधिक सांस्कृतिक विविधतेने संपन्न असलेल्या आपल्या देशात ‘लोक’ या घटकाचा विचार करताना फक्त ‘माणसं’ या संकुचित दृष्टिकोनातून विचार करून चालत नाही. या लोकांशी जोडलेल्या विविध संस्कृती, कला, परंपरा अशा सगळ्याच गोष्टींचा समग्र विचार करावा लागतो. मग त्यात लोककला ( Folk Artist of India ) आणि लोकसंस्कृत
भारतातील कुंभमेळ्याला ( Prayagraj Maha Kumbh ) प्राचीन इतिहास आहे. या कुंभमेळ्याने जगभरामध्ये भारताला एक वेगळीच ओळख प्राप्त करून दिली आहे. २०१९ मध्ये झालेला कुंभमेळा हा देखील विशेष असाच होता. त्या कुंभमेळ्याच्या आयोजनातूनच दुणावलेल्या विश्वासाच्या आधारावर महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनाचा घेतलेला हा आढावा...
वसई तालुक्यात घराघरात बसवलेल्या दीड दिवसांच्या गणपतीबाप्पाचे सर्वत्र मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले . यामध्ये वसईच्या ग्रामीण भागात पूर्ण गावात मिरवणूक काढून साऱ्या गावात बसवण्यात आलेल्या दीड दिवसांच्या बाप्पांचे एकत्रित विसर्जन करण्याची परंपरा आजही कायम असून गावातील आबालवृद्ध या विसर्जन मिरवणुकीत सामील होतात. यात दीड दिवस घरात बाप्पांना जेव्हा मखरामधून विसर्जनासाठी काढून नेण्यात येत होते, तेव्हा 'बाप्पांना राहू द्या ना, नेऊ नका ना' म्हणून घरातील चिमुकले टाहो फोडत होते. बाप्पांना आपल्या घरातीलच एक स
प्रभू रामचंद्र आणि मुघल राजा अकबर यांची तुलना करण्याचा अगोचरपणा दिल्लीतील स्पर्धापरीक्षा प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षिका शुभ्रा रंजन यांनी केला आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये शुभ्रा रंजन “प्रभू रामचंद्र प्रशासकीयदृष्ट्या अकबरापेक्षा कमजोर होते,” असे विद्यार्थ्यांना शिकवताना दिसतात.
ज्याप्रमाणे आपल्याकडे भाद्रपद महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पितृपक्ष पाळला जातो, तशीच काहीशी प्रथा काही पाश्चात्य देशांतही दिसून येते. विशेष करून अमेरिका आणि कॅनडामध्ये दरवर्षी दि. ३१ डिसेंबर हा दिवस त्यांचा पितृपक्ष म्हणजेच ‘हेलोविन’ म्हणून साजरा केला जातो. ‘हेलोविन’ हा मूळचा स्कॉटिश शब्द असून, त्याचा अर्थ ‘ऑल’ अर्थात ‘सर्व’. त्याला जोडून आलेला ‘ईव्ह’ म्हणजे ‘समान’ आणि ‘इन’ म्हणजेच ‘करार किंवा संकल्प’. अशी ही ‘हेलोविन’ या शब्दाची उत्पत्ती.
“देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे. तसेच,पारंपरिक क्रीडा प्रकार जपले जावेत, यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये ’छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सव’ आयोजित केला जाणार आहे. महोत्सवाचे नियोजन देशी मैदानी क्रीडा संघटनांनी समन्वय साधून काटेकोरपणे करावे,”असे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
झाडे तणावाच्या वेळी आवाज करतात, त्यांना वेदनाही जाणवते आणि वेदनांमध्ये ते किंचाळतात सुद्धा! इस्रायलमध्ये नुकत्याच झालेल्या या संशोधनात शास्त्रज्ञांनी वरील बाबी प्रयोगाअंती सिद्ध केल्या आहेत. यानिमित्ताने शालेय अभ्यासक्रमात असलेल्या कवी नलेश पाटील यांच्या ‘झाडांच्या मनात जाऊ..!’ या कवितेची पुन्हा एकदा आठवण झाली.
कोणतंही शिक्षण कधीही वाया जात नाही. दृश्य कलाध्यापक आणि उपयोजित कलाकार (दृश्य) प्रणिता आणि अनंत देशपांडे आत्मविश्वासाने सांगतात. हे दोघंही उपयोजित कलाचे संभाजीनगरच्या ‘शाकम’चे म्हणजे आत्ताच्या ‘शासकीय अभिकल्प महाविद्यालया’चे विद्यार्थी. याच कला महाविद्यालयात जीवनात स्वावलंबी होणारे कलाशिक्षण घेताना जीवनाला रेशीमगाठीची जोड लाभली. कलाशिक्षण, कलाविचार आणि जीवन जगण्यासाठीची कला दोघांनाही एकाच विचाराने स्फूर्ती मिळाली. वर्गमैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि प्रेमाचं पर्यावसान विवाहात झालं. प्रेमविवाह सर्वार्थाने
प्रकाशवेगापेक्षा अधिक वेगाच्या अनुभवाची एक विलक्षण कथा श्रीमद्भागवतात आली आहे. एकदा एक रैवत नावाचा राजा सर्व पृथ्वीवर राज्य करीत होता. त्याला रेवती नावाची एक अत्यंत रूपवती व सद्गुणी बहीण होती. तिच्या लग्नाकरिता योग्य वर पाहण्याकरिता रैवत राजाने सर्व जग धुंडाळले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच मरिन लाईन्स मुंबई येथील ‘एचव्हीबी ग्लोबल ॲकॅडमी` या शाळेच्या हीरक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ झाला
गुण आणि कर्म विभागाने माझ्याद्वारे म्हणजे परमशुद्ध बुद्धीद्वारे चातुर्वर्ण्य रचले गेले आहेत. त्यांचा मी कर्ता असलो, तरी मी त्या कर्तृत्वाच्या वर असलेला परमात्मा आहे. चातुर्वर्ण्य ही एक प्राचीन समाजरचना आहे, जिचा वरील श्लोकाद्वारे गीतेत स्पष्ट उल्लेख आला आहे
‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’ प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेने दि. २३ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या मातांसाठी ‘खेळ श्रावणातले’ उपक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बृह्न्मुंबई महानगरपालिकेच्या निरीक्षिका भारती भवारी, जी वॉर्डच्या अधिकारी वर्षा गांगुर्डे, संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. अपर्णा देसाई, शालेय समितीच्या अध्यक्ष भूषणा पाठारे आणि प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये ‘या हृदयीचे त्या हृदयी’ निर्माण झालेले स्नहेबंध इथे मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
कशी सुरू आहे गणपत्ती बाप्पाच्या आगमनाची तयारी? : मूर्तिकार प्रदीप मादुस्कर उलगडतायत श्रीगणेशाचे वैभवसंपन्न रुप...
ज्ञानिक जेव्हा परमाणू फोडतात, त्यावेळेस त्यातील ओतप्रोतांचा सापेक्ष संच विखुरल्यामुळे तो परमाणू त्याची साचेबंद अवस्था सोडतो. त्यामुळे त्या ओतांमधील भयानक शक्ती प्रकाश व उष्णता यारूपाने बाहेर पडते. त्या परमाणूत ही ऊर्जा व प्रकाश पूर्वीपासूनच असतो. परंतु, ती बंदिस्त असल्यामुळे ती असून भासत नाही. योगी त्या ऊर्जेचे प्रकाशमय दर्शन तो परमाणू न फोडता घेऊ शकतो. म्हणून ‘ऋतंभराप्रज्ञा’ सिद्धी प्राप्त योग्याला असल्या सहस्रसूर्यप्रकाशाचे त्या दिव्य अवस्थेत दर्शन होत असते. भगवद्गीतेत पुढील वर्णन आहे.
आजचे युग हे विज्ञान युग मानले जाते. विज्ञान संशोधनाद्वारे प्रगत होत असते. वैज्ञानिकांना आपल्या मनाच्या एकाग्रतेमुळे अशी संशोधने करणे शक्य झाले आहे. सर्व थोर वैज्ञानिक आधुनिक ऋषीच होत. आपले मन ध्यानाद्वारे एकाग्र करून ऋषी आध्यात्मिक चिंतन करीत आणि त्याद्वारे ज्ञानविज्ञानातील गहन तत्त्वे समाजासमोर ठेवित असत. वेदांमध्ये बरेच ज्ञानविज्ञान साठविले आहे. परंतु, दुर्दैवाने आज वेद म्हणजे केवळ मंत्र मानले जातात. वैदिक परंपरेने केवळ ज्ञानाचा किंवा विज्ञानाचाच एकांगी बडेजाव केला नाही, तर ज्ञानाची पूर्ती होण्याकरिता
भारतात घडणाऱ्या वाईट गोष्टीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सत्यमेव जयते सारखा कार्यक्रम आमिर खान घेत असे. याच कार्यक्रमातून त्याने अनेक क्षेत्रांतील मान्यवर, खरोखरीच समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना बोलावून त्यांचे कार्य जगासमोर आणले
भारतीय स्त्रियांचा ‘वीकपॉईंट’ म्हणजे साडी. प्रत्येकीला नटायला आवडतेच. आजच्या फॅशनच्या युगातही स्त्रियांची पहिली पसंती असते ती साडीलाच. साड्यांच्या पारंपरिकतेला एक वेगळा साज देऊन आजच्या स्त्रीला आवडेल, अशा गोष्टींचा मिलाफ साधून ‘अनीक सारीज्’ हा ब्र्रॅण्ड नावारुपाला आणणार्या अनुजा काकतकर यांच्याविषयी...
धन्यकाम होऊन पांडव मेले असे समजून अश्वत्थामा परत फिरला. परंतु, पांडवीवृत्तीचे अजून काम बाकी होते. त्यांना हस्तिनापूर राज्यावर पुन्हा अधिष्ठित व्हायचे होते. महाभारत संपायचे होते
वसाहतवादी धोरणांचा बळी ठरलेल्या वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध असलेला असंतोष एकवटण्यासाठी ७ ऑगस्ट, १९०५रोजी स्वदेशी आंदोलनाची हाक देण्यात आली. याची आठवण म्हणून भारतात दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी हातमाग दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जाणून घेऊया भारतातील पारंपरिक वस्त्रकला अर्थात हातमाग क्षेत्र आणि त्यासाठी सर्वसामान्य भारतीय काय योगदान देऊ शकतो याविषयी...
दुर्योधन म्हणजे आपल्यातीलच वाईट गुण न सोडणारी, झगडणारी दुर्दम्य वृत्ती होय. म्हणून सार्या कौरवांची नावे ‘दु:’ म्हणजे वाईट विशेषणांनी या सुरू होतात. कोणीही आपल्या मुलांना अशी वाईट नावे ठेवणार नाही. एकच मुलगी झाली, पण तिचे नाव ’सुशीला’ न ठेवता ’दु:शीला’ ठेवले. जी वृत्ती युद्ध करण्यास वा विजय मिळविण्यास कठीण, अशाला वेदव्यास ‘दुर्योधन’ असे म्हणतात.
कुंतीला सूर्यापासून झालेला पहिला मुलगा व पांडवांचा सर्वात मोठा भाऊ म्हणजे कर्ण. कथेनुसार पंडू प्रजननात अकार्यक्षम असल्यामुळे कुंतीला दुर्वासांपासून मिळालेल्या वरामुळे तिने कुमारी असतानाच त्या वरमंत्राचा प्रयोग करून पाहिला. कुमारी कुंती गरोदर राहून तिला कर्ण अपत्य झाले. कुंतीने कर्णाला गुपचूप गंगेत सोडणे भाग होते. कारण, जग काय म्हणणार? कुमारी मातेला मुलगा झाला!
कौरवांचे पहिले सेनापती भीष्मच होत. दहा दिवसांपर्यंत ते सेनानी म्हणून राहिले आणि दहाव्या दिवशी शिखंडीची आड घेऊन अर्जुनाने त्यांना शरबद्ध केले. दशेंद्रियांशी युद्ध म्हणजे भीष्मांचे कौरवांकडे दहा दिवसांपर्यंत सेनापतीपद सांभाळणे होय.
वर्षानुवर्षांपासून अमरनाथ यात्रा सुरू आहे. पण, कधीही मुसळधार पाऊस, वादळ, बॉम्बहल्ले तथा दहशतवादी हल्ल्यांमुळे यात्रेत खंड पडलेला नाही, उलट दिवसेंदिवस यात्रेकरूंच्या संख्येत भरच पडत आहे. काश्मीर खोर्यातील मूठभर पाकिस्तानवादी विघटनवाद्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अमरनाथ यात्रा रोखण्याचा, त्यात अडथळे आणण्याचा आणि यात्रेकरूंना निरनिराळे प्रयत्न करून निरुत्साहित करण्याचे प्रयत्न चालविले होते. पण, तरीही या यात्रेसाठीचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, दि. १० जुलै रोजी नैसर्गिक शेती परिसंवादामध्ये ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले.
प्रकाशाला गती असते. गतीमुळेच प्रकाश दिसतो. गती जर कुंठीत झाली, तर शून्यावस्था म्हणजे अप्रकाशावस्था उत्पन्न होत असते. गती सव्य वा अपसव्य नसली की, अंध:कार म्हणजे काळेपणा उत्पन्न होणारच!
भगवान श्रीकृष्णाचे आयुध सुदर्शनचक्र मानले आहे. वास्तविक भगवान श्रीरामचंद्र व भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूचेच अवतार मानले जातात. परंतु, भगवान श्रीविष्णूंचे आवडते आयुध सुदर्शन श्रीरामांनी नाकारून धनुष्यबाणच आपल्या खांद्यावर ठेवले. श्रीकृष्णाने मात्र विष्णूंचा सुदर्शनाचा वारसा चालू ठेवला. कित्येकजण सुदर्शन म्हणजे ऑस्ट्रेलियातील मावरीजन वापरत असत तसल्या ‘बूमरँग’सारखे शस्त्र मानतात आणि अशी तुलना करून श्रीकृष्णाला मागासलेल्या मावरींच्या पंक्तीत बसवितात.
कथा लिहाव्यात भगवान वेदव्यासांनीच आणि त्या कथांना साजेशी नावेसुद्धा योजून काढावी व्यासांनीच! कथेतील प्रत्येक नावात गहन योगज्ञान आहे, हे व्यासकृपा झाल्याशिवाय लक्षात येणे कठीण आहे. कालयवन म्हणजे प्रत्येक जीवनाला दरक्षण कमी करणारा काळ प्रत्येकाला शत्रूसमान म्हणजे दुष्ट यवन वाटतो, म्हणून मृत्यू जवळ आणणार्या काळाला भगवान वेदव्यास कालयवन म्हणतात. या कालयवनाची जेव्हा जेव्हा भगवान श्रीकृष्णाची गाठ पडायची तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्ण कालयवनाच्या समोरून दूर पळून जायचे.
तिबेट, चीन येथील अभ्यासकांनी अनेक ग्रंथ तिबेटी, चिनी भाषांमध्ये भाषांतरित केले. पुढे भारतातील विद्यापीठांच्या विनाशामध्ये भारतीय भाषांमधील मूळ ग्रंथ नष्ट झाले, तरीही त्यांची भारताबाहेरील भाषांमधील भाषांतरे टिकून असल्याने कालांतराने पुन्हा एकदा हे प्राचीन भारतीय ग्रंथ उपलब्ध झाले. या ग्रंथांमधील नोंदी तसेच परदेशी प्रवाशांच्या लेखनातले संदर्भ प्रस्तुत पुस्तकांमध्ये विपुल प्रमाणात दिलेले आहेत.
यमुना म्हणजे काय व यमुनेचे जल काळेच का सांगितले आहे, याचे रहस्य आम्ही पाहिले आहे. आता त्या काळ्या यमुनेत असणार्या काळ्या कालियाचे रहस्य पाहू.
ज्या खोलीत कृष्णाला पाळण्यात झोपविले होते, त्या खोलीत, शेतकरी आपल्या घराच्या ओट्यावर छकड्याचा मूळ साचा ठेवतात, तसे नंदाघरी आढ्यावर एक छकडा ठेवला होता. छकड्याला संस्कृत भाषेत ‘शकट’ म्हणतात. त्या शकटाला दोर बांधून कृष्णाचा पाळणा बांधला होता. आता कृष्ण बालकाला एकटाच पाहून कंसाचा दूत असलेल्या त्या शकटात एकदम जीव संचारला व त्याने पाळण्यात झोपलेल्या कृष्णाला आपल्या भाराखाली दाबण्याचा प्रयत्न केला.
भगवान गोपालकृष्णांच्या जीवनघटनांद्वारे भगवान वेदव्यास राजयोग्यांचा प्रशस्त मार्ग प्रत्येक आवश्यक अशा कर्मानुसार सांगत आहेत. कृष्णाचा जन्म मध्यरात्रीच का होतो? सर्व जग ज्यावेळेस निद्रेत असते, त्यावेळेस योगी जागृत असतो. गीता सांगते, ‘या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी।’ अशा मध्यरात्रीच्या शांत वेळी योगी आपले चित्त एकाग्र करून विश्वशक्तीचे स्वत:मध्ये कर्षण करीत असतो. ‘कर्षति इति कृष्णः’ योग्याच्या या महान कर्षण अवस्थेलाच वेदव्यास ‘कृष्ण’ म्हणतात. ही कृष्ण अवस्था योग्यांच्या चित्तात मध्यरात्री जन्मास येत
कोणत्याही विषयाशी तद्रूप झाल्याशिवाय त्या अवस्थेचा अनुभव वा ज्ञान होत नसते.
ऊर्जा व शक्तीच्या निरनिराळ्या अवस्थांमुळे साधकाला भिन्न भिन्न अनुभव येतात. लहरी मंद व जड झाल्यास त्या नादरुपाने प्रतीत होतात,
जड-यम नियमांच्याही वर म्हणजे उणे असलेल्या त्या देहातीत कालावस्थेला भगवान वेदव्यास ‘काळ्या पाण्याची यमुना’ (यम+उना) म्हणतात. याच यमुनेवर (सुषुम्नेवर) भगवान गोपालकृष्ण खेळत असतात.
सापेक्षरित्या एकसमयावच्छेदेकरून संघात संभव झाले की, त्यापासून परमाणू तयार होतो. परमाणूपासून अणू, अणूपासून विभिन्न पदार्थ एवं विभिन्न पदार्थांच्या संघातापासून सर्व जग तयार झाले आहे. ओतांच्या साकारण्यामुळेच सर्व जग दृश्यमान होते, म्हणून तेजस तत्त्वाचा गुण आकार मानला आहे. कुंडलिनीजागृत साधकाला बाह्य उत्तेजनाशिवाय स्वत:च्या ठिकाणी दिव्यस्पर्शाचा अनुभव येत असतो.
साधनेद्वारे झालेली गुणाणुरचना, शरीरशुद्धी व चित्तशुद्धीकरिता असल्याने त्यासाठी गुणाणुंची रचना अतिशय शुद्ध म्हणजेच सुसंस्कृत हवी. योगसाधना म्हणजे प्राणायाम, ध्यानधारणा करताना साधकाच्या शरीरातील असली उपयुक्त गुणाणुरचना आपोआप घडत असे. साधकाचा मूळ स्वभावच बदलत असतो
ध्यानाचा अभ्यास दृढ आणि दीर्घकाळ करण्याच्या अवस्थेला ‘धारणा’ म्हणतात. १५ मिनिटे ध्यान कायम ठेवल्यास एक मिनिट अवस्थेची प्राप्त होऊ शकते. धारणेमध्ये ध्येयविषय सोडून अन्य विषयाचे अस्तित्व उरत नाही. सखोल ध्यान म्हणजे धारणा. धारणा ही समाधीची पहिली पायरी आहे. साधकाचा पिंडधर्म जागृत होतो. पिंडधर्म जागृत झाल्यावर साधक आपल्या पिंडधर्मानुसार समाधीअवस्था आणि ज्ञान प्राप्त करेल.
फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात, ‘यशवंत कला महाविद्यालया’च्या विस्तीर्ण परिसरात शिल्पकारांची मांदियाळी भरली होती. तब्बल दहा दिवस अनेक ‘यशवंत’ शिल्पकार या महाविद्यालयात नांदले. विविध प्रकारच्या दगडांबरोबर त्यांनी सौंदर्याभिरुचीपूर्ण संवाद साधला. दगड घडत गेले. शिल्पकारांचे हात दगडाला घडवत होते. छिन्नी-हातोड्यांची जणू जुगलबंदीच!
आसामी संस्कृती आणि परंपरेच्या विरुद्ध असलेल्या शहरांची आणि गावांची नावे बदलण्यात येणार आहेत.
तेजस म्हणजे प्रकाश. प्रकाशाला ज्ञान मानलेले आहे. तेजस तत्त्वाची प्रमुख देवता जी श्री गणेश आहे, तिला ज्ञानमूर्ती मानलेले आहे. बुद्धिविना ज्ञान मिळू शकत नाही, म्हणून श्री गणेशाला बुद्धिदेवतासुद्धा मानलेले आहे. आप तत्त्वातून हे तत्त्व उत्पन्न होते, म्हणून श्री गणेशाला आपतत्त्व देवता शिवाचा पुत्र मानलेले आहे. प्रकाशतत्त्व सर्व तत्त्वाचा मध्य असल्यामुळे तेजस तत्त्वाला मध्य तत्त्वसुद्धा मानलेले आहे.