‘मत्स्यगंधा’मधील सगळी गाणी व्यवस्थित ध्वनिमुद्रित झाली. त्याच दिवशी संध्याकाळी घरी जाताना त्यांनी मला विचारलं, “अशोक, तू माझ्याबरोबर सहायक म्हणून राहू शकशील का? तुझी इच्छा काय आहे?” मग काय, मी क्षणाचाही विलंब न करता लगेच होकार कळवला. एवढी सुवर्णसंधी कोण सोडणार? आणि त्या दिवसापासून मी त्यांच्याबरोबर राहू लागलो. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाण्याचे भाग्य मला लाभले. अभिषेकी बुवांमुळे मला संगीतक्षेत्रात खूप काही नवीन शिकायला, अनुभवायला मिळाले.
Read More
नाशिकचे प्रख्यात सांधेरोपणतज्ज्ञ व दुर्बिणीद्वारे सांध्याची शस्त्रक्रिया करणारे शल्यविशारद डॉ. सागर केळकर यांनी त्यांच्या वैद्यकीय यशामागे मोलाची भूमिका निभावणार्या गुरुंविषयी व्यक्त केलेले हे मनोगत...
सद्गुरू प्राप्तीसाठी कितीही वणवण भटकलं तरी 'सद्गुरू' प्राप्ती होईलच असं नाही. परंतु, सद्गुरू प्राप्तीची आस असेल तर मात्र सद्गुरू किती सहजगत्या सगळं घडवून आणतात आणि आपल्याला स्वतःपाशी बोलवून घेऊन आपल्याला शिष्यत्व बहाल करतात, याची अत्यंत नैसर्गिकरित्या मी स्वतः घेतलेली ही अनुभूती आहे.
मी शैलेंद्रसिंह प्रकाश राजपूत, एनरिच बायोटेक, कचरा व्यवस्थापन कंपनीमध्ये संचालक पदावर कार्यरत आहे. मी माझी कचरा व्यवस्थापनावर केंद्रित केमिकल इंजिनिअरिंगमधील पीएचडी आयसीटी (पूर्वीची युडीसीटी) मधून पूर्ण केली आहे.