जम्मू काश्मिरचा विशेषाधिकार रद्द केल्यानंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी युरोपियन संघातील २३ खासदारांचे एक शिष्टमंडळ मंगळवारी भारतात पोहोचले. जीओसी १५ जवानांची श्रीनगर येथे त्यांनी भेट घेतली. प्रतिनिधी मंडळातील खासदार बी.एन.डन यांच्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यातील सर्व सामान्य नागरिकांशी कलम ३७० बद्दल चर्चा केली जाणार आहे. हे मंडळ स्थानिकांशी चर्चा करण्यावर भर देणार आहे.
Read More
युरोपीयन संघाच्या प्रतिनिधींनी जम्मू-काश्मीरमध्ये भेट दिल्यानंतर आता विरोधकांनी यावर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. यावर भाजपतर्फेही हल्ला चढवण्यात आला आहे. "काश्मीरमध्ये जाण्यापासून तुम्हाला कोणी रोखले का ? विमान पकडा खुशाल काश्मीरमध्ये जा, असा टोला भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी कॉंग्रेसला लगावला आहे.