मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी भेट दिली आहे. मुंबईतील केशवजी नाईक चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सवात उपस्थित राहत श्री गणेशाची पूजा केली.
Read More
अमेरिकेने भारताच्या १०५ प्राचीन कलाकृती परत केल्या आहेत. अमेरिकेच्या या निर्णयाकडे पंतप्रधान मोदींच्या अमेरिकन दौऱ्याचे यश मानले जात आहे. या सर्व कलाकृती भारताकडून अमेरिकेने चोरी आणि तस्करीच्या माध्यमातून नेल्या होत्या. भारताचा वारसा परत करण्यासाठी दि. १७ जुलै रोजी न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
मुंबई : महाराष्ट्रात कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मोठी संधी असून अमेरिकेने या क्षेत्रात सहकार्य करावे. अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृह येथे यावेळी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव मनोज सौनिक यावेळी उपस्थित होते.
अमेरिकेने भारताचे महत्त्व ओळखले असून, आशिया खंडात शांतता प्रस्थापित करायचे असेल, तर नव्या भारताला पर्याय नाही, हे तिने मान्य केले आहे म्हणूनच अमेरिकी निर्बंधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून भारत रशियाबरोबर व्यापारी संबंध कायम ठेवतो आणि त्याला विरोध केला जात नाही.
एरीक गारसेटी यांनी भारतामध्ये येण्यापूर्वीच जे तारे तोडले आहेत, ते बघता ही व्यक्ती भारतामध्ये केवळ मोदी सरकारविरोधी पक्ष, संघटना, व्यक्ती, एनजीओज् यांच्याशी परस्पर संवादाच्या नावाखाली मोदी सरकारला ‘उपद्रव’ करण्यासाठी येत आहेत की काय, असे वाटते.