Wayanad Landslides विशेष प्रतिनिधी केंद्र सरकार वायनाडच्या पाठिशी असून पिडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले आहे.
Read More
राहुल गांधींनी वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेण्यावरुन राजकीय वर्तुळात टिका-टिप्पणी होत आहे. या जागेवरून काँग्रेसने प्रियंका गांधी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपने काँग्रेसच्या या निर्णयावर निशाणा साधला आहे. भाजप नेत्यांचे म्हणणे आहे की हा पक्ष घराणेशाहीला प्रोत्साहन देत आहे.
केरळमधील वायनाड मतदारसंघातून भाजपचे के. सुरेंद्रन यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या. वायनाडमध्ये काँग्रेसचे राहुल गांधी हे विद्यमान खासदार आहेत.केरळमधील वायनाड मतदारसंघ हा यंदा हायप्रोफाईल ठरला आहे. काँग्रेसचे विद्यमान खासदार राहुल गांधी हे येथून खासदार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने केरळचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल केला. यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. उमेदवारी अर
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघामधून बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून उमेदवार अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी त्यांनी वायनाडमध्ये रोड शो केला. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले, त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी – वाड्रादेखील यावेळी उपस्थित होत्या. या रोड शोमध्ये जवळपास हजारो लोक सहभागी झाले होते.
काँग्रेसने केलेल्या तक्रारीमुळेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज तुरुंगात आहेत. त्याचवेळी भाजपशी थेट लढत देण्याऐवजी राहुल गांधी वायनाडमध्ये भाकपच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत आहेत, असा टोला केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी काँग्रेसला लगावला आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींकडून त्यांचा मतदारसंघ हिसकावून घेतल्यानंतर, भाजपने आपले पुढचे लक्ष्य केरळमधील वायनाड जिंकण्याकडे वळवले आहे. जो सध्याचा राहुल गांधी यांचा मतदारसंघ आहे. केरळमधील भाजपची आणि त्यांच्या मित्रपक्षाची एकूण ताकद आणि वायनाडमधली भाजपची २०२४ साठीची रणनीती याचा घेतलेला हा आढावा...
फेब्रुवारी महिन्यात केरळमधील वायनाड येथील मेडिकल कॉलेजमधील जेएस सिद्धार्थन या विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत नवीन खुलासे समोर आले आहेत. वसतिगृहात रॅगिंगदरम्यान अत्याचार झाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या रॅगिंगमध्ये डाव्या विचारसरणीची विद्यार्थी संघटना एसएफआयच्या गुंडांचाही समावेश होता. आता याप्रकरणी अँटी रॅगिंग समितीचा अहवाल आला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी शुक्रवारी सायंकाळी जाहिर केली. त्यामध्ये ३९ उमेदवारांचा समावेश असून काँग्रेस खासदार राहुल गांधी हे केरळमधील वायनाडमधून लढणार आहेत.लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 39 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. राहुल गांधींशिवाय भूपेश बघेल यांना राजनांदगावमधून तिकीट देण्यात आले आहे. बेंगळुरू ग्रामीणमधून डी.के. सुरेश आणि रायपूरमधून विकास उपाध्य
इंडिया आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला निश्चित झाला नसताना आता पुन्हा एकदा आघाडीतील विसंवाद समोर आला आहे. दरम्यान, खासदार राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघातून डाव्यांकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वायनाड मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उमेदवार म्हणून डी राजा यांच्या पत्नी अॅनी राजा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
सत्ताप्राप्तीसाठी काँग्रेस पक्ष इतका घायकुतीला आला आहे की, मते मिळविण्यासाठी देशात फुटीची बीजे रोवण्यापर्यंत त्याची मजल गेली. यापूर्वीही देशाचे तुकडे होवोत, अशी इच्छा प्रकट करणार्या टोळीला काँग्रेस नेत्यांनी समर्थन दिले होतेच. आता केंद्रीय करांमध्ये दाक्षिणात्य राज्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याचा, कांगावा सुरू केला आहे. पण, ही केवळ आर्थिक मागणी नसून, देशात उत्तर-दक्षिण अशी फूट पाडण्याचाच काँग्रेसचा कुटिल डाव आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यामुळे वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणे अपेक्षित आहे. मात्र, वायनाडमध्ये अद्याप पोटनिवडणूक होणार नाही, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी पत्रकारपरिषदेत सांगितले आहे.
देशातील राजकारणात खळबळ उडवणारी बातमी म्हणजे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होणे. या कारवाईनंतर त्याचे पडसाद राज्याच्या विधानसभेत दिसून आले आहेत. त्यामुळे आता येत्या काळात काँग्रेस जोरदार आंदोलनाच्या तयारीत आहे.पण खासदारकी नेमकी कशी रद्द होते.
“काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याच्या नावाखाली देशातील ओबीसी समाजाचा द्वेष केला आहे. त्यामुळे न्यायालयाने राहुल गांधी यांना जोरदार चपराक लगाविली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसलाच राहुल गांधी नकोसे झाले आहेत,” असा टोला भाजपतर्फे लगाविण्यात आला आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर २४ मार्च रोजी लोकसभा अध्यक्षांनी लोकसभा सदस्यत्व रद्दची कारवाई केली होती. मात्र या कारवाईनंतर जर राहुल गांधी ना ८ वर्ष निवडणूकबंदी झाली तर काय होईल?
राहुल गांधींच्या राजकीय कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. अशी घटना दि. २४ मार्च रोजी घडली. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर २४ मार्च रोजी लोकसभा अध्यक्षांनी लोकसभा सदस्यत्व रद्दची कारवाई केली. यामुळे राहुल गांधी ज्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते त्या मतदारसंघात पोटनिवडणूका होण्याची शक्यता व्यक्त केली जातं आहे.
‘मोदी’ आडनाव बदनामीप्रकरणी दोन वर्षे तुरूंगवासाच्या शिक्षेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. राहुल गांधी केरळमधील वायनाड येथून लोकसभेचे खासदार होते. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यानंतर खासदार किंवा आमदारांचे सदस्यत्व संपुष्टात येते. दरम्यान, राहुल गांधी यांना सत्य बोलण्याची शिक्षा करण्यात आल्याची टीका काँग्रेसने केली आहे, तर राहुल गांधींच्या सदस्यत्वाविषयी लोकसभा सचिवालयाचा निर्णय देशहिताचा असल्याचे भाजपने म्हटले आहे.
मोदी आडनाव बदनामीप्रकरणी दोन वर्षे तुरूंगवासाच्या शिक्षेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. राहुल गांधी केरळमधील वायनाड येथून लोकसभेचे खासदार होते. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यानंतर खासदार किंवा आमदारांचे सदस्यत्व संपुष्टात येते. दरम्यान, राहुल गांधी यांना सत्य बोलण्याची शिक्षा करण्यात आल्याची टिका काँग्रेसने केली आहे तर राहुल गांधींच्या सदस्यत्वाविषयी लोकसभा सचिवालयाचा निर्णय देशहिताचा असल्याचे म्हटले आहे.
Ramchandra Guha comment about Keral elected rahut gandhi as s MP
एक अमेठी आणि एक केरळमधले वायनाड. निवडणूक जिंकायचे इतके फंडे असताना लोक कसल्या रॅलीबिली काढतात? उगीचच मला भाषणबिषण करायला देतात.