( Government support for Vedic mathematics; Chief Minister Devendra Fadnavis ) “भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. वैदिक गणिताची महती व उपयोग येणार्या पिढ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्याकरिता भारती कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करत यास शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. ३१ मार्च रोजी दिली.
Read More
थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांची आज पुण्यतिथी. रामानुजन आणि त्यांचे गणिताचे वेड, त्यांनी मांडलेले गणितीय सिद्धांत हे अगदी सुविख्यात. पण, रामानुजन यांच्यासारखेच गणितशास्त्र, खगोलविज्ञान, ज्योतिषशास्त्र यांसारख्या भारतीय शास्त्रांमध्ये महनीय व्यक्तींनी दिलेले योगदान हे कायमच जागतिक पातळीवर मात्र उपेक्षित राहिले. तेव्हा,आज रामानुजन यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्राचीन भारतीय ज्योतिर्गणित-ज्योतिषशास्त्राच्या परंपरेचा आढावा घेणारा हा लेख...
इंजिनिअरिंग पदवीच्या प्रवेश परीक्षेसाठी आता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे अत्यावश्यक विषय राहणार नाहीत, तर यादीत दिलेल्या दहा-बारा विषयांपैकी इतर कोणत्याही तीन विषयांचे जास्तीत जास्त गुण धरले जातील, असा निर्णय 'एआयसीटीई'ने घेतला आहे. इंजिनिअरिंगच्या हजारो जागा रिकाम्या जातात म्हणून खासगी संस्थाचालकांच्या स्वार्थासाठी, कुठल्याही लॉबीच्या दबावाखाली जर हा निर्णय घेतला असेल, तर तो देशासाठी जास्तच घातक.
बरे, यातील किती मंडळी आपल्या वेतनाचा धनादेश देवनागरीत लिहून मिळालेला नाही म्हणून तो परत देण्याचा कणखर बाणा दाखवू शकतात? तिथे याच पद्धतीने इंग्रजीत लिहिलेला धनादेश साळसूदपणे स्वीकारला जातो.
उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली या छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक प्रवीण बनकर यांनी फक्त गावातीलच नाही तर जगाच्या विविध कोपऱ्यातील विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण केली आहे.
मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या अक्षय यांचा आताच ‘गणिताचे नोबेल’ अशी ख्याती असणाऱ्या ‘फिल्डस मेडल’ने गौरविण्यात आले. वयाच्या केवळ ३६व्या वर्षी त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.