गेल्या काही महिन्यांत बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर तापल्याचे पहायला मिळाले. मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सध्या बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर या प्रकरणातील त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याच्या चर्चा आहेत. या प्रकरणी पार पडलेल्या तिसऱ्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडने "माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नसल्याने मला या खटल्यातून निर्दोष मुक्त करावे", असा अर्ज न्यायालयास दिला आहे
Read More
बीड जिल्हा सत्र न्यायालयात मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी आरोपी वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याबाबत न्यायालयात अर्ज करण्यात आल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे.
(Gangwar in Beed Jail) गेल्या काही महिन्यांपासून बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेचा विषय ठरलेला वाल्मिक कराड. कुठल्यान कुठल्या कारणामुळे हे नाव सतत समोर येत राहिले. सध्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मात्र चर्चा त्याच्या दहशतीची नसून त्याला झालेल्या मारहाणीची आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची बातमी समोर आलीय. या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट पुढे आली आहे. आपणच देशमुखांची हत्या केल्याची कबुली आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.
Santosh Deshmukh Case Hearing : वकील Ujjwal Nikam यांचा पहिलाच युक्तिवाद, बीडच्या कोर्टात काय झालं?
(Santosh Deshmukh Case Hearing) संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज दि. २६ मार्च रोजी बीड सत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली आहे. यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीसाठी न्यायालयात हजर होते. तसेच या प्रकरणातील आरोपींना व्हिडिओ कॅान्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
( Santosh Deshmukh Case Hearing Updates ) संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या सत्र न्यायालयात २६ मार्चला रोजी सुनावणी पार पडली. या प्रकरणातील आरोपींना व्हिडिओ कॅान्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केस आरोपनिश्चितीसाठी तयार असल्याचे म्हटले. यावर आरोपींच्या वकीलांनी युक्तिवाद करत आरोपनिश्चितीस विरोध दर्शवला आहे.
Khokya Bhosale बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच धनंजय देशमुख यांना मारहाण केल्याप्रकरणाचा व्हि़डिओ काही दिवसांआधी व्हायरल झाला. त्यानंतर फोटोच दिसणाऱ्या आरोपींची माहिती समोर आली. त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा विश्वासू असलेल्या वाल्मिक कराडला मुख्य गुन्हेगार ठरवले आहे. यानंतर आता बीडमधील गुन्हेगारांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. अशातच आता बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्याचे अनेक मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे खोक्या भोसलेच्या पोलिसांनी प्रयागराजमध्ये मुसक्या आवळल्या आहेत. तसेच त्याचे अनधिकृत बा
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे. नाशिकमधील स्थानिक नागरिकांनी कृष्णा आंधळेला पाहिल्याचा दावा केला आहे.
(Beed Case Update) बीडच्या संतोष देशमुख ह्त्याप्रकरणात (Santosh Deshmukh Case) दि. २७ फेब्रुवारी रोजी सीआयडीकडून १८०० पानांचे दोषारोप पत्र बीड सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या आरोपपत्रात १८४ साक्षीदारांचे जबाब आणि ६६ सबळ पुरावे देण्यात आले आहेत. यापैकीच मोकारपंती या व्हॅाट्सअॅप ग्रुपच्या चार सदस्यांनी फरार आरोपी कृष्णा आंधळे बाबत दिलेल्या जबाबातील माहिती समोर आली आहे.
(Santosh Deshmukh Case) बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. अजूनही बीडमध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनं सुरु आहेत. अशातच आता या प्रकरणातील पहिला जामीन मंजूर झाला आहे.मकोका लावण्यात आलेल्या आरोपी सिद्धार्थ सोनवणेला केज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्याच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याने सीआयडीने आरोपपत्रात त्याच्या नावाचा समावेश केलेला नाही. २५ हजारांच्या जातमुचालक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
बीड हत्या प्रकरणात मोठी अपडेट पुढे आली असून वाल्मिक कराड हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याची माहिती समोर आली आहे. सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसकडून विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अनेक तरुण नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, यात आरोपींचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संपूर्ण राज्यभरात खळबळ उडालेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलची माहिती दिली.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची तर बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता उज्ज्वल निकम यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली.
(Bajrang Sonwane Press Beed ) बीडमध्ये दिवंगत संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मस्साजोगमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला भेट देत ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबियांशी संवाद साधला. त्यावेळी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख यांची हत्या होत असताना लाईव्ह पाहिली जात होती, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच आरोपींच्या मोबाईल फोन्सची सिडिआर चौकशी व्हावी अशी देखी
(Suresh Dhas Massajog ) बीडमधील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी देशमुख कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनाला बसले होते. मात्र आता आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आंदोलनस्थळी जाऊन भेट दिल्यानंतर मस्साजोग मधील ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी आंदोलन सुरु केले होते. बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
(Suresh Dhas) बीडमधील आष्टीचे आमदार सुरेश धस हे परळी शहरातील महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या भेटीला गेले आहेत. याआधी त्यांनी मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आणि ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी त्यांनी धनंजय देशमुख यांच्याशी हत्याप्रकरणासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर आता ते परळीत दाखल झाले आहेत. यावेळी ते महादेव मुंडे यांचे कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
(Suresh Dhas) आमदार सुरेश धस यांनी शनिवार दि. २२ फेब्रुवारी रोजी बीड येथील मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. याचदरम्यान सुरेश धस यांनी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. मस्साजोग ग्रामस्थांकडून करण्यात आलेल्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यानंतर त्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बीड अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे. पण पाच-दहा लोकांनी बीडला बदनाम करण्याचे काम केले आहे. आता ही लढाई महिलांनी हातात घ्यायला हवी, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि बजरंग सोनावणेदेखील उपस्थित होते.
(Earthquake in Delhi NCR) देशाची राजधानी दिल्ली येथे सोमवारी सकाळी ५ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीतीलच धौलाकुवा भाग होता. यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) सोमवारी सकाळी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील धौलाकुवा हा भागातील दुर्गाबाई देशमुख कॉलेज ऑफ स्पेशल एजुकेशनच्या जवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि भूकंपाची तीव्रता ही ४.० रिश्टर स्केल एवढी होत
(Dhananjay Deshmukh) 'आम्हाला धमकावलं जातंय', असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. धनंजय देशमुख आपले भाऊ दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाचा सातत्याने पाठपुरावा करताना दिसत आहेत. अशातच आता प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
सरपंच देशमुखांच्या हत्येच्या दिवशी नक्की काय घडलं? सीसीटीव्ही फुटेज मध्ये नेमकं काय आहे?
(Santosh Deshmukh) मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याला दि. १२ फेब्रुवारीला केज न्यायलयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाला पूरक खंडणी प्रकरणाचा गुन्हा आहे. याच खंडणी प्रकरणात सुदर्शन घुले याला केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याच्यावर अवादा पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात प्रत्यक्ष सहभागी असल्
(Santosh Deshmukh) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपी ज्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून पळून जात होते, त्या गाडीचा पोलिस पाठलाग करत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. यावर धनंजय देशमुख यांनी ‘जंगल परिसरात पोलिस रेकी करत असते, तर आरोपी वाशीच्या जंगलातून बाहेर गेले नसते’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
(Beed Case) बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला ५६ दिवस उलटून गेलेत तरीही आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. बीड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत धनंजय देशमुख यांनी कृष्णा आंधळेला पोलिसांनी वेळीच अटक केली असती तर आमच्या कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आली नसती, असा आरोप केला आहे.
(Dhananjay Munde) “गेल्या ५३ दिवसांपासून मीडिया ट्रायलने मला सातत्याने टार्गेट केलं जात आहे. मागच्या या दिवसांत मी एकही शब्द मीडियामध्ये त्याप्रकारे बोललो नाही. त्यामुळे संकट ५३ दिवसांचं होतं”, असं वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी दि. ३० जानेवारीला भगवानगडावर जाऊन दर्शन घेतले. भगवानडाचे महंत नामदेव शास्त्री यांचीही भेट घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना संपूर्ण बीड प्रकरणावर आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य क
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी दोषी वाटत असल्यास त्यांनी राजीनामा मागावा. मी राजीनामा देणार, अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवार, २९ जानेवारी रोजी दिली.
मी राजीनामा द्यावा किंवा नाही द्यावा, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवार, २८ जानेवारी रोजी दिली.
मस्सोजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याला पोलिस कोठडी मिळण्याची शक्यता आहे. सुदर्शन घुलेबाबात काही पुरावे सापडले असल्याचे सांगत एसआयटीकडून बीड न्यायालयात त्याच्या पोलिस कोठडीसाठी अर्ज करण्यात आला आहे.
बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी शनिवार, २५ जानेवारी रोजी मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. मेट्रो सिनेपासून या मोर्चाला सुरुवात झाली असून तो आझाद मैदानापर्यंत असेल.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीच्या ताब्यात असलेला आरोपी वाल्मिक कराड याला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
(Beed Case ) बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड प्रकरणात आता पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडेंची सीआयडी चौकशी करण्यात आली आहे.
(Beed Case) बीडमधील मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्या दिवशी वादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी सर्व आरोपी एकत्र आल्याचे व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. सीसीटीव्ही व्हिडिओत वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि बालाजी तांदळे एकत्र असल्याचे दिसून आले आहे. तसेच इतर आरोपी कृष्णा आंधळे, प्रतीक घुले, विष्णू चाटेदेखील यात दिसले आहेत.
Dhananjay Munde मी वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात णामागे मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे. पक्षातील काही लोक देखील दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. मात्र तरीही माझी भूमिका व वस्तु
(Santosh Deshmukh) संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सहा संशयित आरोपींची पोलिस कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आज त्यांना बीड जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. परंतु न्यायालयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्यांना न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित करण्यात येण्याची शक्यता आहे.
(Beed Case) बीड प्रकरणात सहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सहाही आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सरकारी वकिलांकडून आरोपींच्या एसआयटी कोठडीची मागणी करण्यात आली होती. या मागणीला आरोपींच्या वकीलांनी जोरदार विरोध केला. अखेर न्यायमूर्तींनी आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
: (Walmik Karad) बीडमधील संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणांमधील संशयित आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
(Beed) बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये २८ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. १४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ते २८ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे.
(Santosh Deshmukh Murder Case) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणीच्या तपासासाठी १ जानेवारीला स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, काही अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे.
(Walmik Karad) अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची १४ दिवसांची पोलिस कोठडी संपल्यामुळे आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाकडून कराडला १० दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे. केज न्यायालयात न्यायाधीश एन डी गोळे यांच्या समोर सुनावणी झाली.
(Santosh Deshmukh) बीड-मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला मात्र अद्याप या प्रकरणातील एका आरोपी फरार आहे. तसेच अटकेत असणाऱ्या इतर आरोपींवर कठोर कारवाई न झाल्याने संतप्त मस्साजोगकरांनी आज आंदोलनाचा इशारा दिला आहे.
(Saundana Sarpanch Accident) बीडच्या केज तालुक्यामधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहे. अशातच आता बीडमधीलच परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने एका सरपंचाला उडवल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्देवी घटनेत सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या भीषण अपघातात क्षीरसागर यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
(Vishnu Chate) बीड सरपंच संतोष देशमुख ह्त्या आणि अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणांमध्ये अटकेत असणाऱ्या संशयित आरोपी विष्णू चाटेला १८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ११ जानेवारी रोजी त्याला केज न्यायालयाकडून २ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती. दोन दिवसांच्या कोठडीची मुदत आज संपल्याने आरोपी विष्णू चाटेला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
(Santosh Deshmukh Murder Case) बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. ६ डिसेंबर रोजी मस्साजोगला जातना सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केल्याची माहिती समोर येत आहे.
डमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. एसआयटीकडून याप्रकरणाचा तपास होत असून सर्व आरोपींवर मोक्का लावण्याचा निर्णय घेतला आहे.
(Vishnu Chate) बीड हत्येप्रकरणी विष्णू चाटेला शुक्रवार दि. १० डिसेंबर रोजी खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली होती. मात्र विष्णू चाटेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणी ताबा मिळवण्यासाठी एसआयटीने रीतसर अर्ज केला होता. त्यासंदर्भातील सुनावणीकरिता आज त्याला पुन्हा केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी वकीलांकडून विष्णू चाटेच्या सीआयडी कोठडीची मागणी करण्यात आली होती. ही मागणी न्यायालयाकडून मंजूर करण्यात आली असून विष्णू चाटेला २ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.