भारताचा बुद्धिबळ संघ सातत्याने नवनवे कारनामे करत आहे. नवे विजय पदरात पाडण्याची सवय भारतीय बुद्धिबळपटूंनी अंगीकारली आहे. गेल्या एका वर्षात थोडा थंड असणारा प्रज्ञानंद हा भारताचा युवा बुद्धिबळपटू पुन्हा एकदा नव्या जोमाने मैदानात उतरला आहे. यंदाची ‘टाटा स्टील चेस मास्टर्स’ स्पर्धा हे त्याचेच उदाहरण होय!
Read More
: क्रिडाक्षेत्रात भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूंचा १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात सन्मान करण्यात आला. शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरास्कार सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय भारतीय पुरूष हॉकी संघाचे कर्णधार हरमनप्रीत सिंह यांना सुद्धा खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत
भारतीय बुद्धिबळ महिला ग्रँडमास्टर कोनेरू हंपी यांनी दुसऱ्यांदा वुमन्स रॅपीड चेस चॅम्पियनशिप जिंकली. भारतालाच नव्हे तर सबंध जगाला हेवा वाटावा अशी कामगिरी हम्पी यांनी केली आहे. अशातच आता हंपी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनी हंपी यांची प्रशंसा करत, त्यांच्या खेळाचे कौतुक केले
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेली जागतिक बुद्धीबळ विजेतेपदाची स्पर्धा संपन्न झाली. यास्पर्धेचे निकाल हे भारताला सुखावणारे आहेत. भारताचा डी गुकेश या 18 वर्षीय युवा खेळाडूने संयम, धारिष्ट्य. लढाऊ वृत्तीचे प्रदर्शन करत दैदिप्यमान विजय मिळवला. त्याने मिळवलेला विजय हा बलाढ्य प्रतिस्पर्ध्याविरुद्ध असल्याने त्याचे महत्व अधिक मोठे होते. गुकेशच्या या विजयाचा घेतलेला आढावा...