आरबीआयकडून मोठी माहिती पुढे आली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये वाढलेल्या सेवांमुळे वित्तीय तूटीत मोठी घट झाली असुन वित्तीय अधिशेषात (Surplus) मध्ये वाढ झाली. आरबीआय (Reserve Bank of India) ने दिलेल्या माहितीनुसार, अखेरच्या तिमाहीत भारताच्या अधिशेषात वाढ झाली असुन वित्तीय तूटीत घसरण झाली आहे.
Read More
भारताचे करंट अकाऊंट डेफिसिट (चालू खात्यातील तूट) जीडीपीच्या तुलनेत १.२ टक्क्याने कमी झाली आहे.ऑक्टोबर - डिसेंबर महिन्यातील वाढलेल्या निर्यातीमुळे वित्तीय तूट भरून निघाली असल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.
जागतिक आर्थिक असंतुलनाचे महत्त्वाचे कारण म्हणजे, कृत्रिमरित्या ठरवलेला चलनदर. जे देश मोठ्या प्रमाणावर निर्यात करतात, ते सर्वसाधारणपणे स्वत:च्या चलनाचे अवमूल्यन करतात. त्यामुळे त्या देशांना डॉलर्स मोठ्या प्रमाणात मिळतात. ज्या देशांची निर्यात जास्त आहे, असे देश हे प्रगतिशील आहेत. (यात आशियाई देश जास्त आहेत.) या देशात सर्वसामान्य नागरिकांकडून बचतीचे प्रमाण जास्त आहे. ही बचत देशाअंतर्गत गुंतवली जाते. त्यामुळे उद्योगधंद्यांची वाढ होते आणि त्याचाच परिणाम म्हणजे उत्पादनवाढीमुळे निर्यातवाढ होते.