पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलच्या दौऱ्यावर आहेत. या परिषदेला जगभरातील राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अशातच या राष्ट्रप्रमुखांशी भेट घेत, विविध विषयांवर चर्चा केली आहे. ब्राझील, सिंगापूर, स्पेन, या देशांच्या प्रमुखांशी मोदी यांनी भेट घेतली. भारताने स्विकारलेल्या ' ग्लोबल साऊथ 'च्या पार्श्वभूमीवर या भेटीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
Read More
'इटालियन’ ही प्रमुख भाषा असणारा ’इटली’ हा दक्षिण युरोपातील एक देश. रोमन व रोमन-पूर्व काळापासून इटली हा युरोपमधील सांस्कृतिकदृष्ट्या तसा पुढारलेला देश. याच देशात आता इंग्रजी भाषेवर बंदी घालण्याचे वारे वाहू लागले आहेत. कारण, इटलीतील अधिकृत कामांसाठी इंग्रजी भाषेवर बंदी येणार असल्याचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सांगितले.