काँग्रेसशासित कर्नाटकात त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकाची मुलगी नेहा हिरेमठ हिची हत्या करण्यात आली. हत्या करणारा फैयाझ जो आरोपी म्हणून सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, तो एकेकाळी तिच्याच वर्गात शिकत होता. त्याने नेहाला लग्नासाठी विचारले असता, आपण एकाच धर्माचे नसल्याने मी लग्न करू शकत नसल्याचे नेहाने फैयाझ याला स्पष्ट सांगितले होते. यामुळेच त्याने नेहाचा बळी घेतला. तिच्या वडिलांनी माझी मुलगी ‘लव्ह जिहाद’चा बळी गेली असून, देशात ‘लव्ह जिहाद’ मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरत असल्याचे सांगितले.
Read More