Maharashtra new sarcastic emperor Sapkal statements can be said to be a guide to the future course of the Congress at present एका सामान्य कार्यकर्त्याला थेट महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी बसविल्याचा टेंभा काँग्रेसने मिरवला खरा. पण, हा टेंभा फार काळ टिकला नाही. काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष सध्या माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाच कित्ता गिरवताना दिसतात. दररोजची बेताल वक्तव्ये, सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका, यापलीकडे सध्या तरी सपकाळ यांची कामगिरी समोर आलेली
Read More
जळगावमधील दोन माजी मंत्री आणि तीन माजी आमदारांनी शनिवार, दि. ३ मे रोजी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या असंख्य पदाधिकार्यांनी के. सी. कॉलेज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जाहीर प्रवेश केला.
उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा दावा केल्याने सध्या चर्चांना उधाण आले आहे.
morale of Congress workers वरील मथळा एखाद्या दाक्षिणात्य सिनेमाला साजेसा असला, तरी प्राप्त परिस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसमधल्या घडामोडींना तंतोतंत लागू पडतो. विधानसभा निवडणुकीतील मानहानिकारक पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचे पुरते मनोबल खचले. त्यातून सावरण्याची ताकद मिळते ना मिळते तोच ‘हायकमांड’ने हर्षवर्धन सपकाळ यांना कार्यकर्त्यांच्या माथी मारले. भलेभले इच्छुकांच्या रांगेत असताना, केवळ राहुल गांधींचे लाडके म्हणून सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद सोपवण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला ६५ वर्ष पूर्ण होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण राज्यात महाराष्ट्र महोत्सव साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
Congress “आम्ही सर्व धर्मांचा, त्यांच्या श्रद्धेचा आणि त्यांच्या कृतींचा आदर करतो. संबंधितांवर कारवाई करणार आहोत,” असे कर्नाटक सरकारने म्हटले. तरीही प्रत्यक्षात मात्र हिंदूंची मुस्कटदाबी सुरूच आहे. ‘सीईटी’ परीक्षेसाठी केंद्रावर आलेल्या तीन विद्यार्थ्यांना हातात धागा आणि जानवे घातल्याने बाहेरच थांबवण्यात आले होते. त्यातील दोन मुलांनी जानवे आणि हातातला धागा काढला. मात्र, एका विद्यार्थ्याने जानवे काढण्यास नकार दिला. तेव्हा त्याला 15 मिनिटांपर्यंत बाहेरच थांबवण्यात आले.
targets Hindus कर्नाटकमध्ये विरोधकांनी सत्ताधारी आणि सरकारवर हल्ला केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारवर टीका टिप्पणी सुरू आहे. अशातच आता माजी मुख्यमंत्री असणाऱ्या सिद्धारमैया यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस सरकारने नेहमीच हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यांनी सांगितले होते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू कार्यकर्त्यांची हत्या पीएफआयसारख्या मुस्लिम संगठनांनी केली होती.
Congress सलग तीन लोकसभा निवडणुका आणि कित्येक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव पत्करल्यानंतरही, काँग्रेसने पक्षसंघटनेत बदलांना प्राधान्य दिले नाहीच. आताही अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात आत्मचिंतनाच्या नावाखाली राजकीय आगपाखड करण्यातच बहुतांश नेत्यांनी धन्यता मानली. त्यामुळे काँग्रेसचे हे अधिवेशन म्हणजे नुसते बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ठरण्याचीच शक्यता अधिक!
( fight at Congress headquarters in Bihar ) काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या बिहार दौऱ्यावर आहेत आणि त्यांचा हा दौरा २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला बळकटी देण्याच्या उद्देशाने केला जात आहे. परंतु दौऱ्यादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच झालेल्या हाणामारीने काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
( Devendra Fadanvis on Congress Babasaheb constitution ) “संविधान बचाव’च्या घोषणा देणार्यांच्या काँग्रेस पक्षाने आणीबाणी लादून भारतीयांचे मूलभूत अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य काढून घेतले. राज्य कायद्याने नव्हे, तर हुकमाने चालेल, अशी व्यवस्था तयार करण्यात आली. विरोधी पक्षातील एक लाखाहून अधिक नेत्यांना तुरुंगात टाकले. माझे वडील दोन वर्षे तुरुंगात होते, काकू शोभा फडणवीस तुरुंगात होत्या. त्यांचा गुन्हा काय, हे सांगायला सरकार तयार नव्हते. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान गोठवून विरोधी पक्षच तुरु
( CBI raids Congress leader Bhupesh Baghel for Mahadev Satta App case ) ‘महादेव सट्टा अॅप’ प्रकरणात ‘सीबीआय’च्या पथकाने छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह दिल्ली, भोपाळ आणि कोलकाता यांसह चार राज्यांमध्ये 60 ठिकाणी छापे टाकले आहेत.
'एका माळेचे मणी, ओवायला नाही कुणी’ अशी काँग्रेसची गत. विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे मातब्बर पराभूत झाल्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस दु:खी होईल, अशी अपेक्षा होती. कसले काय? दुसर्या फळीतील नेत्यांनी जणू दिवाळीच साजरी केली. त्यांच्या चेहर्यावरचा आनंद आजही कमी झालेला नाही. सर्वांत आनंदी झाले ते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार. पटोलेंनी प्रदेशाध्यक्ष पद भूषवले असले, तरी सरंजामी नेते त्यांना कायम दुय्यम वागणूक द्यायचे, हे ते खासगीत कबूल करतील. त्यामुळेच बहुदा सरंजाम्यांच्या पराभ
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरून काँग्रेससह विरोधकांनी टीकेची झोड उठविली. ‘लाडकी बहीण योजने’मुळे सरकारने विकासकामांना कात्री लावल्याचाही आरोप करण्यात आला. पण, नुकत्याच सादर झालेल्या काँग्रेसशासित हिमाचल प्रदेशमधील सुक्खू सरकारच्या अर्थसंकल्पाने तर तेथील विकासालाच गोठवल्याचे दिसून आले. त्याचे कारण म्हणजे, सुक्खू सरकारच्या रेवड्यांमुळे सरकारी तिजोरीवरील आर्थिक बोजाचा वाढता हिमालय! अर्थसंकल्पीय कागदपत्रांनुसार, हिमाचल प्रदेशचे कर्ज १ लाख, ०४ हजार, ७२९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
(Shashi Tharoor admits) गेल्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia-Ukraine War)सुरु आहे. या युद्धात प्रचंड विध्वंस झाला आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही अद्याप या भागात शांतता प्रस्थापित झालेली नाही. दरम्यान, फेब्रुवारी २०२२ मध्ये जेव्हा या युद्धाला तोंड फुटले होते, तेव्हा काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर सडकून टीका केली होती. मात्र आता थरूर यांनी रशिया आणि
विधानपरिषद पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा आली असून त्यासाठी त्यांनी नुकाच आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांना विधानपरिषदेसाठी संधी दिली आहे. सोमवार, १७ मार्च रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून २७ मार्च रोजी मतदान पार पडेल.
भाजप आपल्या संघटनेत कार्यकर्त्यांमधून नेतृत्व तयार करते, आणि काँग्रेस नेतृत्व आपल्याच कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवते! मग पक्षाच्या अधोगतीला जबाबदार कोण? भाजप की राहुल गांधी? खरं तर, हा प्रश्न आता काँग्रेसच्या उरलेल्या निष्ठावंतांनी स्वतःला विचारायला हवा. राहुल गांधी यांची एकूणच नेतृत्वशैली बघता, काँग्रेसचा भविष्यकाळही अंधारातच जाणार, हे निश्चित! why rahul gandhi says congress leaders working for bjp ?
मध्ययुगीन काळात हिंदूंवर लादला गेलेला ‘जिझिया’ कर केवळ आर्थिक शोषणाचा विषय नव्हता, तर तो हिंदू संस्कृतीच्या अधोगतीसाठी रचलेला कट होता. आज, हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारने मंदिरांच्या देणग्यांवर डोळा ठेवत, सरकारी तिजोर्या भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हिमाचल सरकारने, हिंदू मंदिरांना सरकारच्या योजनांसाठी अर्थसाहाय्य करण्याच्या सूचना केल्या आहेत. हा निर्णय म्हणजे, त्या ‘जिझिया’चाचेच एक आधुनिक रुप आहे.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
(Congress leader Sajjan Kumar) दिल्लीतील एका विशेष न्यायालयाने १९८४ च्या शीखविरोधी दंगलींदरम्यान झालेल्या हत्येच्या प्रकरणात काँग्रेसचा माजी खा. सज्जन कुमार यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीत १९८४ मध्ये शीखविरोधी दंगली उसळल्या होत्या. या प्रकरणात काँग्रेसचे माजी खा. सज्जन कुमार यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या पूर्वेकडील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बुकावूमध्ये ‘एम २३’ गटाच्या बंडखोरांनी घुसखोरी केली असून, त्यांनी बुकावूच्या उत्तरेकडील विमानतळ आपल्या ताब्यात घेतले आहे. सोबतच त्यांनी गोमा शहरही आपल्या ताब्यात घेतले. गोमा येथे भारतीय लष्कराच्या मेडिकल कॉर्प्सचे एकूण ८० सैनिक आणि अधिकारी सध्या उपस्थित आहेत. हे सैनिक संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेचा एक भाग म्हणून काम करतात. या बंडखोरांनी शांतीसेनेच्या लेव्हल थ्री फील्ड हॉस्पिटल असलेल्या कॅम्पला वेढा घातला. त्यामुळे हे ‘एम २३’ प्
काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोलेंचा पत्ता कट करण्यात आला असून हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियूक्ती करण्यात आली आहे. गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी याबाबतची घोषणा करण्यात आली.
पक्षाने संधी दिल्यास प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडेन, असे विधान काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केले आहे. मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी एका वृत्तवाहिनीशी त्यांनी बोलताना आपली ईच्छा बोलून दाखवली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोलेंचा पत्ता कट होणार का? अशा चर्चा सुरु आहेत.
कुणीही कुणाला खंडणी मागितल्याचे कानावर आल्यास त्याच्यावर मकोका लावण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.
Mahakumbh Mela 2025 काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी प्रयागरामध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याबाबत असभ्य टिप्पणी केली आहे. महाकुंभमेळ्यामुळे प्रयागराजमध्ये अस्वच्छता निर्माण होईल असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. याचसोबत त्यांनी दावा केला की, १२ वर्षातून एकदा महाकुंभमेळा साजरा केला जातो. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग आजार पसरला जात असल्याचे सांगितले जाते आहे.
Dhananjay Munde मी वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात णामागे मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे. पक्षातील काही लोक देखील दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. मात्र तरीही माझी भूमिका व वस्तु
(Prithviraj Chavan) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचे कारण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तत्काळ बोलवण्यात आल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ते तातडीने दिल्लीला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस वरिष्ठांकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याचे बोलले जात आहे.
( Dr. Manmohan Singh Death) माजी पंतप्रधान आणि आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवार, दि. २८ डिसेंबर रोजी पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. सध्या त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.
(Chhattisgarh) महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेप्रमाणेच छत्तीसगडमध्येही महतारी वंदन योजना सुरु आहे. मात्र काहीजण या योजनांचा चुकीच्या पद्धतीने वापर करताना दिसतात. दरम्यान एका काँग्रेस नेत्याने चक्क अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाने या योजनेतून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
काँग्रेसने आपली सत्ता अबाधित राहावी, यासाठी देशभरातील डाव्या-नक्षलवादी संघटनांना पाळले, पोसले आणि मोठेही केले. बुद्धिभेद करणार्या डाव्या बुद्धिजीवींच्या हातात देशातील शिक्षण व्यवस्था, विद्यापीठांचा कारभार सोपवून काँग्रेसने अगदी पद्धतशीरपणे भारतीय संस्कृतीवरच घाला आतला. राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ देशातील ज्या ज्या भागांतून गेली, त्या भागांत दंगली पेटल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात यामागचे तपशीलवार तथ्यात्मक वासतव मांडून ‘काँग्रेसी नक्षलवादा’चा बुरखा फाडला आहे.
(Congress MLA Laxman Savadi) काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांनी बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उत्तर कर्नाटकावर चर्चा होत असताना अचानक बेळगावसह मुंबईलाही केंद्रशासित करण्याची मागणी केली. अधिवेशनाच्या उत्तरार्धात उत्तर कर्नाटकातील समस्या आणि विकासावर चर्चा सुरू असताना आमदार सवदींनी ही मागणी केली आहे.
Uddhav Thackeray काहीही झाले की, ‘हा भाजपचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे,’ असे वारंवार बेताल आरोप करणार्या उद्धव ठाकरेंनी आता ‘मुंबई केंद्रशासित करा’ अशी दर्पोक्ती करणार्या कर्नाटकी काँग्रेस आमदाराला जाब विचारायला हवा. एवढेच नाही तर अधिवेशनातही याविषयी ठाकरे परखड भूमिका घेऊन मविआतील काँग्रेसला शिंगावर घेतील का?
गेल्या आठवड्यात ‘इंडी’ आघाडीतील जवळपास सर्वच घटकपक्षांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला विरोध केल्यावर राहुल गांधी यांनी आपल्या कार्यकर्ते व नेत्यांना ‘इंडी’ आघाडीतील घटकपक्षांच्या छुटभैया नेत्यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करा, आघाडीचे नेतृत्व आपल्याकडेच राहणार आहे, असा स्पष्ट सल्ला दिला होता. यावरून काँग्रेस आता घटकपक्षांना महत्त्व देणार नसल्याचे स्पष्ट आहे. मात्र, यामुळे ‘इंडी’ आघाडीमध्ये मतभेद सुरूच राहणार असल्याचे दिसून येते. त्याचवेळी प्रादेशिक पक्ष आपापल्या राज्यामध्ये वेगळी चूल मांडण्याचाही निर्णय घेतील
EVM एकीकडे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मविआचे नेते ‘ईव्हीएम’वरुन ‘हात’चलाखी करीत असताना, ‘इंडी’ आघाडीतील त्यांच्याच मित्रपक्षांपैकी नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्ला आणि तृणमूल काँग्रेसच्या अभिषेक बॅनर्जी यांनी ‘ईव्हीएम’वरुन काँग्रेसच्या रडारडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, त्यांच्या भूमिकेला सुरुंग लावला आहे. त्यामुळे अदानी प्रकरणाप्रमाणेच ‘ईव्हीएम’च्या मुद्द्यावरुन काँग्रेस पक्ष राष्ट्रीय स्तरावरही आता एकाकी पडल्याचेच हे द्योतक म्हणावे लागेल.
Telangana Thalli तेलंगणा येथे राज्यत्वाच्या आंदोलनादरम्यान देवीच्या पुतळ्याचा रंग बदलण्यात आल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. तेलंगणा थल्लीच्या सचिवालयात देवीच्या एका नवीन पुतळ्याचे आनावर करण्यात आले आहे. याआधी असलेली तेलंगणा थल्ली देवी ही हिंदू सणांशी संस्कृती जपणारी आहे. तर संबंधित नवीन पुतळ्यात त्यांनी तेलंगणाची असलेली मुख्य ओळख लपवण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी ९ डिसेंबर २०२४ रोजी तेलंगणा सचिवालयाबाहेर हा पुतळा बसवण्यात आला असल्याचे सांगितले. काँग्रेस सरकारचे प्रमुख रेवंत रेड्डी यांच्या हस्ते या पुतळ्याचे
अगदी काही महिन्यांपूर्वीच गुलाल उधळणाऱ्या शरदचंद्र पवार गटाच्या निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. मात्र निलेश लंके यांचा लोकसभेचा विजयी गुलाल उतरलाही नसताना मतदारांनी निवडणूक रिंगणात उतरलेल्या निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना सपशेल नाकारले. लंके यांच्याविरोधात अजित पवार गटाचे काशिनाथ दाते निवडणूक लढवत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जोरदार पीआर केल्याने आणि महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या जोरावर विजयी झालेल्या खासदार नील
विधानसभा निवडणूकीचा निकाल हा काँग्रेससाठी अतिशय लाजीरवाणा असून काँग्रेसच्या आमदारांनी भाजपममध्ये विलीन व्हावे, असे वक्तव्य भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली.
(Devendra Fadnavis) "देशामध्ये ॲक्सिडेंटल पीएम सिनेमा आला तसंच कसब्यात ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला ज्याची कामं कमी आणि दंगे जास्त", असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका केली.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘कलम ३७०’ रद्द केल्यावर पाच वर्षांत त्या राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारली. राज्यातील फुटीरतावाद व दहशतवादही आटोक्यात आला. पण, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता गेल्यानंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात पुन्हा ‘कलम ३७०’चे तुणतुणे वाजविले गेले. त्यामुळे अशा फुटीरतावादी शक्तींना विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही आळा घालण्याचे आव्हान ओमर अब्दुल्ला सरकारसह केंद्र सरकारलाही पेलावे लागणार आहे.
Telangana तील पेड्डापल्ली जिल्ह्यात माता पोचम्म थल्लीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये कालीचे अवतार मानल्या जाणाऱ्या माता पोचम्माच्या मूर्तीची विटंबना केल्याबद्दल हिंदू समाजात संताप असून ही घटना बुधवारी ६ नोव्हेंबर २०२४ रोजी घडली आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात बारामतीच्या प्रगतीसाठी विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे.
कर्नाटकात वक्फ बोर्डाने विजयपुरा येथील गोलघुमटसह ५३ ऐतिहासिक वास्तूंवर नुकताच दावा ठोकला. ज्या पुरातत्त्व विभागाकडे या वास्तूंच्या देखभालीची जबाबदारी आहे, तेही याबाबत अनभिज्ञ. पण, कर्नाटकातील काँग्रेसी सरकारच्या परवानगीशिवाय वक्फ बोर्डाने हा उद्योग केलेला नाही. म्हणूनच, त्याला चाप लावण्यासाठी वक्फ बोर्डात सुधारणांची गरज अधिक तीव्र झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खानं यांचं ३ नोव्हेंबर रोजी निधन झालं आहे. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातामध्ये ते गंभीकर जखमी झाल्याची माहिती माध्यमांना मिळाली. त्यांच्यावर कोहीनूर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. नवाब मलिक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे शिवाजीनगर-माणकूर विधानसभेचे उमेदवार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून वांद्रे पूर्व विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात उबाठा गटाचे वरुण सरदेसाई मैदानात असतील.
( Nationalist Congress Party )"नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण सहा आमदार आहेत. हिरामण खोसकर हे आपले सातवे आमदार आहेत. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक आमदार असून येणाऱ्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात आठ आमदार निवडून आणू", असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
( NCP) विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली असून, अध्यक्षपदी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची, तर निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे.
काय स्वप्न होते? हरियाणामध्ये जिंकलो की तो दिवस ‘जिलेबी दिवस’ म्हणून साजरा करणार! हरियाणामध्ये जिलेबीने धोका दिला. ‘बिग बॉस’मध्ये सुरज म्हणतो ना, ‘गुलीगत धोका’. अगदी तसाच धोका हरियाणावाल्यांनी दिला. आता महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ‘लाडकी बहीण योजने’बद्दल काहीतरी खोटे पसरवले पाहिजे. काम न करता सहानुभूती मिळवायला पाहिजे.
काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या तीन पिढ्यांनाही कलम ३७० पुन्हा लागू करता येणार नाही, असा घणाघात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी जम्मू – काश्मीरमधील प्रचारसभेस संबोधित करताना गुरुवारी केला.
बांगलादेशातील हिंदूंविषयी राहुल गांधी बोलणार का, असा प्रश्न सॅम पित्रोडा यांना विचारल्यामुळे राहुल गांधींच्या टीमने आपल्याला धक्काबुक्की केली; असा अतिशय गंभीर दावा पत्रकार इंडिया टुडे या माध्यमसमुहाचे रोहित शर्मा यांनी केला आहे.
Swantarta Veer Sawarkar स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Swantarta Veer Sawarkar )चित्र असलेले टी-शर्ट काँग्रेस नेत्याने हिसकावल्याचा प्रकार गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात उघडकीस आले आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुजरातमधील सांगणी गावात घडली. याप्रकरणी काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय मुख्य संघटक लालजी देसाई आणि गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष रुत्विक मकवाना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आहे.
RG Kar Hospital विशेष प्रतिनिधी कोलकात्यातील आरजी कार (RG Kar hospital) वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालया झालेल्या बलात्काराविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर बुधवारी मध्यरात्री गुंडांकडून भीषण हल्ला चढविण्यात आला. हा प्रकार स्थानिक राजकीय पक्षांच्या गुडांनी घडविल्याचा आरोप ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट असोसिएशन या संघटनेने केले आहे.