अटल सेतूची जोडणी थेट वरळीपर्यंत मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल मार्ग दोन वर्षांसाठी बंद केला जाणार आहे. त्यानुसार वाहतुकीतही बदल करण्यात येणार आहे.
Read More
मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मुंबई मेट्रो ३ने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ‘ॲक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो-३ च्या ट्रेनने शुक्रवार, दि.२८ रोजी कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यामुळे मुंबईकरांसाठी आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील मोठी समस्या लवकरच सुटणार आहे. २५जुलैपर्यंत संपूर्ण मार्गिका आणि आचार्य अत्रे ते कफ परेड हा मेट्रोमार्ग प्रवासी वाहतुकीसाठी सुरू होण्याच्या दिशेने हा महत्वाचा दिवस आ
मुंबई महानगरपालिकेने बांधलेल्या धर्मवीर,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड (दक्षिण) प्रकल्पाला हाजी अली येथील पुलावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण केल्याची दृश्ये आणि छायाचित्रे सोशलमिडीयावर प्रसारित झाली. त्यावरुन प्रकल्पाच्या बांधकामात दोष असल्याचे आरोपही झाले. मात्र, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हा प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित असून, या रस्त्यावर कोणतेही तडे अथवा खड्डे नाहीत.
शिवडी- वरळी जोडरस्त्याचे आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले असून हा जोडरस्ता २०२५ अखेर पूर्ण करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) नियोजन आहे. या पुलाच्या कमला गती देण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज पाडण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आखली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कनेक्टरमुळे शिवडी ते वरळी हा प्रवासाचा वेळ सध्याच्या ४०-६० मिनिटांवरून १० मिनिटांपेक्षा कमी होण्याची अपेक्षा आहे.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) नरिमन पॉंईंटकडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत लोकार्पण करण्यात आले. राज्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर दि.२७ जानेवारीपासून सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा मार्ग मुंबईकरांसाठी खुला झाला.
वरळीत आदित्य ठाकरेंचा ( Aditya Thackeray ) निसटता विजय!
( Bimal kediya ) बिमलजी कामाच्या बाबतीत खूप आग्रही आहेत. एखाद्या गोष्टीसाठी ते कमालीचे आग्रही असू शकतात. त्यांनी कामासाठी आखलेल्या योजनेवर त्यांची पकड अत्यंत चिवट असते. पण, जसे जसे पर्यायी नेतृत्व तयार व्हायला लागते, तशी त्यांची ती पकड हळूहळू सुटायला लागते. काम नव्या पिढीच्या हातात देऊन ते पुढच्या कामाच्या शोधात निघालेले असतात. ही प्रक्रिया इतकी सहज आणि शांतपणे चाललेली असते, की ‘ड्रायव्हिंग सीट’वर असलेले बिमलजी ‘बॅक सीट’वर कधी जाऊन बसले, हेदेखील कळत नाही.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल मुस्लीम मुल्ला मौलवी फतवे काढत आहेत. सर्व मुस्लीमांनी एकत्र यावे आणि मतदान करावे, अशी मागणी करत तुमच्या नाकावर टीच्चून व्हिडिओ काढत आहेत. जर मुल्ला मौलवी फतवे काढत आहेत ना तर आज राज ठाकरे फतवे काढतो आहे.
Aditya Thackeray वऱळी मतदारसंघातून मनसे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना धारेवर धरले आहे. वरळी मतदारसंघात काही काम झाले नाही. यामुळेच आम्हाला संदीप देशपांडे यांना उमेदवारी द्यावी लागल्याचा मिश्कील टोला लगावला आहे.
मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प हा मुंबई महानगरपालिकेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा एक मोठा टप्पा पूर्ण होऊन लाखो मुंबईकर या मार्गावरून जलद प्रवासाचा आनंद घेत आहेत. मात्र हा प्रकल्प बांधत असताना वरळीच्या क्लिव्हलँड बंदर भागातील स्थानिक मच्छिमार आणि कोळी बांधवांनी या रोडला विरोध केल्यामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या कोळी बांधवानी सत्तेत असणाऱ्या स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी सतत भेटीचा पाठपुरावा केला. मात्र, ठाकरे सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असणाऱ्या आदित्य ठाकरे यां
बुधवारी उबाठा गटाची पहिली यादी जाहीर झाली. यात आदित्य ठाकरेंना पुन्हा एकदा वरळीतून संधी देण्यात आली आहे. मात्र, मागील वर्षी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाण्यातून लढण्याचं आव्हान दिलं होतं. त्याचं आता काय झालं? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
मनसेने मंगळवारी रात्री विधानसभा निवडणूकीसाठी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात वरळी विधानसभा मतदारसंघात संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा वरळीत पुतण्याच्या विरोधात काकांनी आपल्या पक्षाचा उमेदवार उभा केल्याची चर्चा रंगली आहे.
मुंबई पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात म्हाडाला २५०० घरे म्हाडा बांधेल. या २५०० घरांच्या उभारणीसाठी नुकत्याच निविदा अंतिम करून राज्य सरकाराला पाठविण्यात आल्या. या निविदांना राज्य सरकारने मंजुरी दिली अजून येत्या २ दिवसात पत्रा चाळीतील घरांचे काम सुरु होईल. या इमारती उंच असल्याने या बांधण्यासाठी साधारण अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागेल. २०२४मध्ये हे काम सुरु होऊन २०२७ पर्यंत हे काम पूर्ण होण्याचा अंदाज म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली.
राज्यभरात आज ठिकठिकाणी दहिहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यातच मुंबईतील वरळीमध्ये दहिहंडी महोत्सवादरम्यान एक अनोखा देखावा तयार करण्यात आला आहे. वरळीमध्ये भाजपच्या दहीहंडीमध्ये अफजल खानाच्या वधाचे नाट्य साजरे करण्यात आले. या नाट्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
वरळी हिट अँड रन प्रकरणात जीव गमवावा लागलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबियांना विशेष बाब म्हणून १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, दि. १० जुलै रोजी केली. या प्रकरणात नाखवा कुटूंबाचे झालेले नुकसान कधीही भरून येणारे नसल्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून ही मदत जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले.
वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाचे वडील आणि शिवसेनेचे नेते राजेश शाह यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी कारवाई केली आहे. राजेश शाह यांची शिवसेना उपनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. बुधवारी याबद्दलचा पक्षादेश जारी करण्यात आला.
वरळी हिट अँड रन प्रकरणात एक मोठी अपडेट पुढे आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिहीर शाहाला ताब्यात घेण्यात मंगळवारी पोलिसांना यश आलं. त्यानंतर आज त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
वरळी अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. याआधी मिहीर शाहाचे वडील आणि शिवसेनेचे नेते राजेश शाह यांना अटक करण्यात आली होती. आता मिहीर शाहसह १२ जणांना शाहापूरमधून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) अर्थात कोस्टल रोड प्रकल्पाचे काम वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. या प्रकल्पावर महानगरपालिकेची यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे.
"आदित्य ठाकरे यांनी आता नवीन मतदारसंघाचा शोध सुरु केला आहे. राहुल गांधी पराभूत झाल्यानंतर जसे वायनाडच्या शोधात निघाले होते, तसंच आता आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रातील आपला वायनाड शोधण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे आता वरळीतून लढणार नाहीत," असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणेंनी केलंय. लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर दक्षिण मुंबई लोकसभेत उबाठा गटाने बाजी मारली. पण उबाठाचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत मात्र आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा वाजली. दक्षिण मुंबई लोकसभेत उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत यांनी विजय मिळवला
देशाच्या आर्थिक राजधानीतील सर्वांत प्रतिष्ठेच्या म्हणून ओळखल्या गेलेल्या दक्षिण मुंबईच्या लढतीत उबाठा गटाने बाजी मारली असली. असे असले तरी, त्यांचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. उद्धवपुत्रासाठी दोन नेत्यांचा बळी घेऊन सुभेदारी (विधान परिषदेची आमदारकी) बहाल केल्यानंतरही त्यांना वरळीत मताधिक्य टिकवता आलेले नाही. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा कस लागणार आहे.
वरळी शिवडी उन्नत मार्गिकेच्या प्रभादेवी रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या पुलाचा तिढा सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) या पुलाच्या संरचनेत बदल करण्याचा विचार सुरू आहे. हा बदल केल्यास परिसरातील १९ इमारती वाचणार असून, त्यातून या इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनावर कराव्या लागणाऱ्या खर्चाचीही बचत होणार आहे.
कोस्टल रोड प्रकल्पाने ओलांडला आव्हानात्मक टप्पा!
मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने आज शुक्रवार, दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) यशस्वीपणे स्थापन केली.
राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु आहे. सर्वच पक्ष निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, वरळी विधानसभा मतदारसंघात वरळीकरांकडून पोस्टबाजी करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईत बदल घडवणार अशा आशयाचे पोस्टर याठिकाणी लावण्यात आले आहेत.
हिम्मत असेल तर द्या राजीनामा आणि वरळीतून पुन्हा निवडणुक लढवा, असे थेट आव्हानच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे. आदित्य ठाकरेंनी ठाण्यात सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राजीनामा देऊन पुन्हा निवडून येण्याचे आव्हान दिले होते. यावर आता शेलारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अडीच वर्षात जी घाण झाली आहे ती आम्ही साफ करत आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला आहे. तसेच क्लिन स्वीप होऊ या भीतीने विरोधकांची भंबेरी उडाली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वरळी येथे स्वच्छता मोहिमेची पाहणी करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
आदित्य ठाकरे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे अशी चर्चा सुरू असताना राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. पण आता या मुद्द्यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपले मौन सोडले आहे आणि थेट आदित्य ठाकरेंना कुठून उभे राहायचे आहे असा सवाल उपस्थित करत एका प्रकारे आव्हान दिले आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये चाळीत वास्तव्यास असलेल्या पात्र पोलिस कर्मचारी गाळेधारकांना वितरित करावयाच्या ११३३ पुनर्वसन सदनिकांची संगणकीय प्रणालीद्वारे निश्चिती आज करण्यात आली.
भाजप विरुद्ध उबाठा गटात रंगलेल्या राजकीय संघर्षात आणखी एकदा हे दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकणार आहेत. ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दहीहंडी उत्सवावरून मुंबईत पुन्हा एकदा राजकीय हंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष असून वरळीची हंडी कोण फोडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मुंबईत वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये दि. ५ ते ११ सप्टेंबर, २०२३ हया दरम्यान महाराष्ट्र आर्ट फेअर चे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील उद्योजकांना आणि व्यावसायिकांना कलेच्या माध्यमासाठी व्यासपीठ मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांनी छंद म्हणून जोपासलेल्या दर्जेदार कलाकृतींना कलाक्षेत्रात वाव मिळावा तसेच त्यांच्या कलाकृतींतून सामाजिक कार्यास हातभार लाभावा या हेतूने दीपकला फाऊंडेशनतर्फे “महाराष्ट्र आर्ट फेअर” चे आयोजन करण्यात आले आहे.
वरळी येथील नेहरू तारांगण जवळील बस स्थानके अद्ययावत सोयी सुविधांनी परिपूर्ण करण्यात आली आहेत. येथे बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी आरामदायी आसने तसेच वाचनालयाचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींपासून जेष्ठ नागरिक व लहान मुलांसाठीही विविध सोयीचे आयोजन केले आहे.
मंचावर भाषण सुरू असताना भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे म्हणून उल्लेख झाला आणि पुन्हा एकदा राजकीय वर्तूळात चर्चा रंगली आहे जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त वरळीत मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वरळीला एकनाथ शिंदेंनी हादरे दिल्यानंतर युवराज पुन्हा एकदा आपला किल्ला मजबूत करण्याच्या तयारीत आहेत. इथूनच भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे, अशी घोषणा ठाकरे समर्थकांनी केली आहे.
हातात कोणतेच सामाजिक मुद्दे नसल्यामुळे मग नव्वदच्या दशकात आंबेडकरी चळवळ व नेते पुरते गोंधळले होते आणि तो गोंधळ अजूनही सुरूच आहे.
वरळीतील माजी नगरसेवकाचा शिंदे गटात पक्षप्रवेश राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेना नक्की कुणाची यावरून सुरु झालेला वाद न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या समोर आहे. एकीकडे न्यायालयीन लढाई लढत असताना दुसरीकडे शिंदे गटाकडून ठाकरेंना सातत्याने जोरदार धक्के दिले जात आहेत. माजी मंत्री आदित्य उद्धव ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील नगरसेवक संतोष खरात यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश ठाकरेंना मोठा धक्का समजला जात आहे.
आम्हाला भेटायला मराठी मुस्लीम संघाचे शिष्टमंडळ आले होते.” “काय म्हणता, जगभरच्या मुस्लिमांची जी मानसिक बैठक असते, रूढी-रिती पंरपंराबाबत जो आग्रह असतो, तो मराठी मुस्लिमांना नसतो का?” “मला काही माहिती नाही. मला इतकेच माहिती आहे की, मराठी-मुस्लीम संघाने पाठिंबा दिला आणि आता सगळे मराठी-मुसलमान आम्हाला मतदान करणार. आम्हीच जिंकणार!” “काय म्हणता, मग शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि दिल्लीच्या गांधी कुटुंबाच्या काँग्रेसला कोण मतदान करणार?” “आम्हाला काय करायचे त्याच्याशी? आज सगळे आमच्यासेाबत आहेत. राष्
मुंबई पारबंदर प्रकल्प आणि वांद्रे - वरळी सागरी सेतू यांना जोडणाऱ्या उन्नत मार्गिकेतील अडथळे दूर होण्यास सुरुवात झाली आहे. या उन्नत मार्गिकेत परळ आणि प्रभादेवी स्थानकांना जोडणारा उड्डाणपुल बांधण्यात येणार आहे. ४.५ किमी लांबीच्या या उड्डाणपुलाच्या कामाला मध्य रेल्वेकडून मंजुरी मिळाली आहे. अद्याप पश्चिम रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमआरआयडीसी) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मदतीने पूल उभारला जाणार आहे
वरळीत आदित्य ठाकरेंचा पराभव होणार?
वरळीतील मच्छीमार बांधवांनी आपला कौल एकनाथ शिंदे गटाला दिला आहे. जोगेश्वरी, वरळी, अंधेरी, येथील विविध भागांतून पाच हजार शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली हा पाठिंबा दिला आहे. कोळी बांधवांच्या या पाठिंब्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही जबरदस्त हादरा दिला, मुंबईतील राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे
आदित्य ठाकरे वरळी : ठाकरे पितापुत्राच्या हातून वरळी निसटते का ? असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर शिंदे गट ठाकरेंच्या विरोधात रान पेटवताना दिसत आहे. ठाकरे गटातील महत्त्वाचे मोहरे आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यात शिंदेंना यश मिळत असतानाच त्यांच्याकडून मोठा डाव टाकला जात आहे. युवासेनाप्रमुख आणि माजी मंत्री असलेले वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना त्यांच्याच मतदारसंघात आस्मान दाखवण्याची तयारी शिंदे गटाकडून केली जात आहे. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारी वरळी ठाकरे पितापुत्
देशात आजवर एकाच पक्षाचे राज्य होते, एवढी वर्षे सत्ता उपभोगूनसुद्धा देशात विकास झालाच नाही, गरिबांपर्यंत काहीच पोहोचले नाही, परंतु नरेंद्र मोदी यांनी हे चित्र बदलून दाखवले
कायम थंड वातावरणातील पिंजऱ्यात राहणाऱ्या पेंग्विनसेनेला वरळीमध्ये वाढणारा हिंदूंचा प्रभाव असह्य होतोय म्हणून त्यांनी चक्क ऐन गणेशोत्सवात गणपतीचे बॅनर फाडले अशी बोचरी टीका भाजप प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केली आहे
मुंबई : वरळीतील अनेक समस्या प्रलंबित असल्याने माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मतदार संघात नाराजी असल्याचे छत्र आहे. त्यामुळे भाजपने वरळी मतदार संघात आदित्य यांच्या विरोधात रान पेटवायला सुरुवात केली. त्याचा पहिला अंक जबोरी मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सुरु केला. तर दुसरीकडे वरळीतील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. येत्या काही दिवसात वरळीतील काही शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने आदित्य ठाकरे यांची चिंता वाढ
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुंबई महापालिका वॉर्ड पूर्नरचनेबद्दल चर्चा सुरू असताना आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटातील पक्षश्रेष्ठींवर थेट विधीमंडळातच आरोप लावले आहेत. सरवणकर ज्या शिवसेना भवननजीक दादरच्या मतदार संघातील वॉर्ड वरळीला जोडण्याचा प्रकार झाल्याचा आरोप करत त्यांनी आदित्य ठाकरेंवरच निशाणा साधला. माझ्या मतदार संघातील वॉर्ड हे वरळीला का नेण्यात आले, असा थेट सवाल त्यांनी विधानसभेत विचारला.
उद्धव ठाकरेंच्या विरोधात उठाव झाल्यानंतर उरलेले शिवसैनिक तरी आपल्यासोबत टिकावेत यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांकडून शपथपत्र लिहून घेण्यास सुरुवात केली होती
स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी खऱ्या अर्थाने दहीहंडी उत्सवाला मोठ केलं आणि म्हणूनच दिघेंच्या ठाण्यात जगातील सर्वात उंच मानवी मनोरे रचण्याचा रेकॉर्ड नोंदवला गेला. या दहीहंडी उत्सवाने अनेक नेत्यांची राजकीय करियर घडवली. त्यातल्या काहींना मंत्रीपद मिळाल्यावर त्यांनी या उत्सवाकडे पाठ फिरवली तर या उत्सवावर प्रेम असणारे अनेक नेते आजही या उत्सवाचे आयोजन करतात. सध्या मुंबई-ठाण्यात ज्याची हंडी त्याचा मतदारसंघ असे समीकरण बनलंय. नुकताच आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंच्या मतदार संघातील जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाच्य
हे सरकार बेईमानी लोकांचे सरकार आहे, त्यांना जनतेचा आवाज ऐकू जात नाही अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. जे गद्दार आहेत त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही, ते गद्दार आहेत अजूनही शिवसेना आम्हीच आहोत असा दावा देखील आदित्य यांनी केला
"आदित्य ठाकरे हे मुळात भाजपच्या सहाय्यानेच निवडून आले आहेत त्यामुळे त्यांनी कुठलेही विधान करताना जरा अभ्यास करून ते करावे तेच त्यांच्याaसाठी चांगले आहे" असा टोला लगावत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे
आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील जांबोरी मैदानात भाजपकडून दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला गेलेला असताना त्याला उत्तर म्हणून आदित्य ठाकरेंनीही दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे
वरळीतील स्थानिक मच्छीमारानी 'व्हेल' माश्याची 'उलटी' कांदळवन कक्षाकडे सुपूर्द केली आहे. संजय बैकर यांनी आपल्याकडे 'स्पर्म व्हेल' माश्याची उलटी असल्याचे सांगून ती कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली. ही उलटी घन स्वरुपात असून वरळीच्या लोटस जेट्टी बंदरावर, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक विरेंद्र तिवारी यांच्या उपस्थितीत हे 'अंबरग्रीस' (स्पर्म व्हेलची उलटी) ताब्यात घेण्यात आले.