Delhi IAS Coaching Centre दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या तळघरातील दुर्घटनेचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील पूरस्थिती दरम्यान राजेंद्र नगरच्या के. राव या कोचिंग सेंटरच्या तळमजल्यात पावसाचे पाणी शिरले होते. बायोमॅट्रीक दरवाजा आतून बंद झाल्याने विद्यार्थ्यांना बाहेर पडता आले नाही, यात युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या श्रेया यादव, तान्या सोनी आणि नेविन डेल्विन यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलीसांसह दिल्ली महापालिकेलाही फटकारले आहे.
Read More
दिल्लीतील राजेंद्र नगर येथील कोचिंग इन्स्टिट्यूट प्रकरणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. याच इन्स्टिट्यूटच्या तळघरात पाणी साचून तीन विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने दिल्लीत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
राजधानी दिल्लीमध्ये स्पर्धापरीक्षेची तयारी करणार्या तीन विद्यार्थ्यांचा साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने, दिल्लीच्या राज्य दरबारची संपूर्ण यंत्रणाच हादरली आहे. प्रामाणिकपणाने कायद्याचे राज्य आपने चालवले असते, तर निश्चितच आज असा मृत्यू त्या विद्यार्थ्यांच्या नशिबी आला नसता. दिल्लीतील बिघडलेल्या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा...
नवी दिल्लीतील शकूरपूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे रिझवान नावाचा शिक्षक जेएमडी कोचिंग सेंटरमध्ये हिंदू विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश करत असल्याचे समोर आले आहे. तो त्यांना देवाची पूजा सोडून अल्लाची पूजा करण्यास सांगत होता. आता कोचिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांकरिता भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात क्रीडा प्राधिकरणाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणांतर्गत एकूण २१४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या जागांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (SAI) भरतीसंदर्भात सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
कोटा येथील कोचिंग विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. कोटा येथे NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. फरिद हुसेन हा पश्चिम बंगालचा रहिवासी होता. कोटा कोचिंग संस्थेत सुमारे एक वर्षापासून NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. या वर्षी जुलै महिन्यापासून तो वौफ नगर येथे राहत होता. त्याच इमारतीत तो इतर काही विद्यार्थ्यांसोबत भाड्याच्या खोलीत राहत होता.
कोटा येथे दि. २७ ऑगस्ट रोजी पुन्हा दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. कोचिंग इन्स्टिट्यूटकडून घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये त्याचा नंबर सतत कमी येत होता. ह्या नंबर गेममुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो आणि अनेकांना या भीतीमुळे आपले जीवन संपवावे लागते.
महापालिका, सरकारसह संघटनांनीही जारी केले अत्यावश्यक निर्देश