हॉटेलव्यवसायिक जया शेट्टी हत्येप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुरुवार, दि. ३० मे रोजी तब्बल २३ वर्षांनी मोक्का विशेष न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला. पत्रकार जे. डे. हत्येप्रकरणी छोटा राजन सध्या दिल्लीच्या तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहे.
Read More
कामगार नेते दत्ता सांमत यांच्या हत्या प्रकरणात छोटा राजन याची कोर्टाने निर्दोष मुक्ताता केली आहे. गिरणी कामगारांची आर्थिक हेळसांड पाहून सामंतानी डॉक्टरी पेशा सोडून कामागारांचा 'डॉक्टरसाहेब' अशा पेशा धारण केला होता. १६ जानेवारी १९९७ ला घाटकोपर येथील ऑफिसला जाताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. त्यानंतर या हत्येप्रकरणात छोटा राजन याच्यावर आरोप होते. त्याला न्यायालयाने पुरावा अभावी निर्दोष सुटका केली आहे.
पत्रकार जे डे हत्याकांड प्रकरणावर आज मुंबईचे विशेष मकोका न्यायालय सुनावणी करणार आहे. या प्रकरणात कुख्यात गुंड छोटा राजन सहित ११ आरोपी ठरले आहेत.
पत्रकार जे डे हत्याकांड प्रकरणात आज मुंबईचे विशेष मकोका न्यायालयाने सुनावणी केली असून या प्रकरणात कुख्यात गुंड छोटा राजन सहित ११ आरोपी दोषी ठरले आहेत.