केंद्र सरकारने नक्षलवादाच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईला वेग आला असून, १६ जानेवारी रोजी सुरक्षा दलाने बिजापूर येथे १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. बिजापूरच्या दक्षिण भागातील जंगलामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा दलाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार माओवादी गटाचे अनेक म्होरके या परिसरात तैनात असल्याची माहिती त्यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली. गुरूवारी सकाळी ९ वाजता सुरक्षा दलाने या कारवाईला सुरूवात केली.
Read More
छत्तीसगड राज्यातील विजापूर येथील वंदे भारत (Vande Bharat) येथे दगडफेक करण्यात आली होती. यामुळे ३ डब्यांच्या काचा फोडण्यात आल्याची धक्कादायक बाबा आढळून आली आहे. याप्रकरणात सुरू असणाऱ्या वंदे भारत रेल्वेवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणात महासमुंदमध्ये वंदे भारत ट्रेनच्या ट्रायल सुरू होती. यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला होता. याप्रकरणात काँग्रेस नेत्याच्या एका निकटवर्तीयाचा समावेश आहे.
पंतप्रधानांनी उद्योजपतींचे कर्ज माफ केले, मात्र ते छत्तीसगढ येथील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास तयार का नाहीत ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा मी हा प्रश्न विचारुन देखील त्यांनी माझ्या या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. असे वक्तव्य काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. आज छत्तीसगढ येथील सुरगुजा येथे एका जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. २०१९ मध्ये आम्ही सत्तेत आल्यावर छत्तीसगढ येथील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.