योगिक चक्र साधना करताना चक्रांसंबधित खालील मुद्दे जाणून घेणे आवश्यक आहे.
Read More
दुर्मीळ आजारातही संघकार्य नेटाने पुढे घेऊन जात समाजासाठी प्रेरणास्रोत बनलेल्या ‘राष्ट्र सेविका समिती’च्या साधना गांगल यांच्याविषयी....
ठाणे : “ज्ञानसाधना हीच खरी आनंदसाधना ( Anandasadhana ) असून वाचन हा आपला श्वास असला पाहिजे,” असे प्रतिपादन ‘चाणक्य मंडळा’चे संस्थापक, माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
खर व दूषण यांच्यासह १४ सहस्त्र असुरांना दंडकारण्यात, एकाहाती यमसदनी धाडणारे श्रीराम, अंतिम युद्धासाठी हजारो वानरांनासोबतीला घेऊन गेले नसते. म्हणूनच कलियुगासाठी श्रीराम हे सामूहिक प्रयत्नांच्या मार्गाने कार्यसिद्धी घडवण्याची प्रेरणा आहेत. जे श्रीराम यांच्याबाबत तेच त्यांच्या नावाने असलेल्या, रक्षा स्तोत्राबाबतसुद्धा सत्य आहे. या लेखात पाहूया श्रीरामरक्षा स्तोत्राविषयी..!
“या शतकात जरी लता मंगेशकर यांच्यासारख्या गायिका एकट्याच झाल्या असल्या, तरीही दुसर्या आशा भोसलेही झाल्या नाहीत, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे,” असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा सन्मान करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. दि. २४ मार्च रोजी सायंकाळी २०२१ सालचा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार आशा भोसले यांना मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ’भारतरत्न’ सचिन तेंडुलकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सा
विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. राष्ट्रीय छात्रसेनेच्या मध्यामातून विद्यार्थी दशेत एकता, शिस्त व राष्ट्रभक्ती दृढ होण्यास मदत होत असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्ली येथील संचलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या १२५ छात्रसेनेच्या चमूचा सन्मान आज मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी केला. त्यावेळी ते बोलत होते.
गुण आणि कर्म विभागाने माझ्याद्वारे म्हणजे परमशुद्ध बुद्धीद्वारे चातुर्वर्ण्य रचले गेले आहेत. त्यांचा मी कर्ता असलो, तरी मी त्या कर्तृत्वाच्या वर असलेला परमात्मा आहे. चातुर्वर्ण्य ही एक प्राचीन समाजरचना आहे, जिचा वरील श्लोकाद्वारे गीतेत स्पष्ट उल्लेख आला आहे
कौरवांचे पहिले सेनापती भीष्मच होत. दहा दिवसांपर्यंत ते सेनानी म्हणून राहिले आणि दहाव्या दिवशी शिखंडीची आड घेऊन अर्जुनाने त्यांना शरबद्ध केले. दशेंद्रियांशी युद्ध म्हणजे भीष्मांचे कौरवांकडे दहा दिवसांपर्यंत सेनापतीपद सांभाळणे होय.
भगवान श्रीकृष्णाचे आयुध सुदर्शनचक्र मानले आहे. वास्तविक भगवान श्रीरामचंद्र व भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूचेच अवतार मानले जातात. परंतु, भगवान श्रीविष्णूंचे आवडते आयुध सुदर्शन श्रीरामांनी नाकारून धनुष्यबाणच आपल्या खांद्यावर ठेवले. श्रीकृष्णाने मात्र विष्णूंचा सुदर्शनाचा वारसा चालू ठेवला. कित्येकजण सुदर्शन म्हणजे ऑस्ट्रेलियातील मावरीजन वापरत असत तसल्या ‘बूमरँग’सारखे शस्त्र मानतात आणि अशी तुलना करून श्रीकृष्णाला मागासलेल्या मावरींच्या पंक्तीत बसवितात.
कथा लिहाव्यात भगवान वेदव्यासांनीच आणि त्या कथांना साजेशी नावेसुद्धा योजून काढावी व्यासांनीच! कथेतील प्रत्येक नावात गहन योगज्ञान आहे, हे व्यासकृपा झाल्याशिवाय लक्षात येणे कठीण आहे. कालयवन म्हणजे प्रत्येक जीवनाला दरक्षण कमी करणारा काळ प्रत्येकाला शत्रूसमान म्हणजे दुष्ट यवन वाटतो, म्हणून मृत्यू जवळ आणणार्या काळाला भगवान वेदव्यास कालयवन म्हणतात. या कालयवनाची जेव्हा जेव्हा भगवान श्रीकृष्णाची गाठ पडायची तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्ण कालयवनाच्या समोरून दूर पळून जायचे.
एखादा अपघात, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अथवा गंभीर आजाराच्या वेळी कुशल डॉक्टर्स व अद्ययावय हॉस्पिटलची गरज असते. बहुतांश वेळा तेथे रक्ताची गरज देखील लागू शकते. बाकी उपचारांसाठी लागणारी औषधे अथवा उपकरणे जसे मेडिकल दुकानात मिळतात तसे रक्त घ्यायला मात्र रक्तपेढीतच जावे लागते. तेथील व्यवस्थेशी अनेकांचा प्रथमच संबंध येतो. तेव्हा त्यासाठी रक्ताची उपलब्धता व लागणारा वेळ लक्षात येतो
यमुना म्हणजे काय व यमुनेचे जल काळेच का सांगितले आहे, याचे रहस्य आम्ही पाहिले आहे. आता त्या काळ्या यमुनेत असणार्या काळ्या कालियाचे रहस्य पाहू.
ज्या खोलीत कृष्णाला पाळण्यात झोपविले होते, त्या खोलीत, शेतकरी आपल्या घराच्या ओट्यावर छकड्याचा मूळ साचा ठेवतात, तसे नंदाघरी आढ्यावर एक छकडा ठेवला होता. छकड्याला संस्कृत भाषेत ‘शकट’ म्हणतात. त्या शकटाला दोर बांधून कृष्णाचा पाळणा बांधला होता. आता कृष्ण बालकाला एकटाच पाहून कंसाचा दूत असलेल्या त्या शकटात एकदम जीव संचारला व त्याने पाळण्यात झोपलेल्या कृष्णाला आपल्या भाराखाली दाबण्याचा प्रयत्न केला.
भगवान गोपालकृष्णांच्या जीवनघटनांद्वारे भगवान वेदव्यास राजयोग्यांचा प्रशस्त मार्ग प्रत्येक आवश्यक अशा कर्मानुसार सांगत आहेत. कृष्णाचा जन्म मध्यरात्रीच का होतो? सर्व जग ज्यावेळेस निद्रेत असते, त्यावेळेस योगी जागृत असतो. गीता सांगते, ‘या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी।’ अशा मध्यरात्रीच्या शांत वेळी योगी आपले चित्त एकाग्र करून विश्वशक्तीचे स्वत:मध्ये कर्षण करीत असतो. ‘कर्षति इति कृष्णः’ योग्याच्या या महान कर्षण अवस्थेलाच वेदव्यास ‘कृष्ण’ म्हणतात. ही कृष्ण अवस्था योग्यांच्या चित्तात मध्यरात्री जन्मास येत
कोणत्याही विषयाशी तद्रूप झाल्याशिवाय त्या अवस्थेचा अनुभव वा ज्ञान होत नसते.
जिल्हापातळीवर एखादे लहानसे काम करायचे आणि त्यानंतर पर्यावरण, मानवता, विचारधारा यावर बोधामृत पाजायचे, अशी सध्याची ‘फॅशन’ झालेली आहे. इतरांप्रमाणे डॉ. अभय बंगदेखील त्याच ‘फॅशन’मध्ये ‘रॅम्पटॉक’ करणारे. रा. स्व. संघावर त्यांनी निराधार आरोप केले, पण आपण अनुसरण करत असलेला गांधीवाद का फसला, याचे त्यांना काही सोयरसुतक असल्याचे दिसले नाही.
सापेक्षरित्या एकसमयावच्छेदेकरून संघात संभव झाले की, त्यापासून परमाणू तयार होतो. परमाणूपासून अणू, अणूपासून विभिन्न पदार्थ एवं विभिन्न पदार्थांच्या संघातापासून सर्व जग तयार झाले आहे. ओतांच्या साकारण्यामुळेच सर्व जग दृश्यमान होते, म्हणून तेजस तत्त्वाचा गुण आकार मानला आहे. कुंडलिनीजागृत साधकाला बाह्य उत्तेजनाशिवाय स्वत:च्या ठिकाणी दिव्यस्पर्शाचा अनुभव येत असतो.
साधनेद्वारे झालेली गुणाणुरचना, शरीरशुद्धी व चित्तशुद्धीकरिता असल्याने त्यासाठी गुणाणुंची रचना अतिशय शुद्ध म्हणजेच सुसंस्कृत हवी. योगसाधना म्हणजे प्राणायाम, ध्यानधारणा करताना साधकाच्या शरीरातील असली उपयुक्त गुणाणुरचना आपोआप घडत असे. साधकाचा मूळ स्वभावच बदलत असतो
सर्व वेळ योगासनात खर्च करणे उचित नाही. आजकाल सर्वत्र योगासनांचा प्रचार होत आहे, ही चांगली गोष्ट आहे, पण योगासनेच योगशास्त्राचे सर्वस्व नाहीत. ‘अष्टांग योगा’पैकी तो केवळ एक भाग आहे एवढेच!
ध्यानाचा अभ्यास दृढ आणि दीर्घकाळ करण्याच्या अवस्थेला ‘धारणा’ म्हणतात. १५ मिनिटे ध्यान कायम ठेवल्यास एक मिनिट अवस्थेची प्राप्त होऊ शकते. धारणेमध्ये ध्येयविषय सोडून अन्य विषयाचे अस्तित्व उरत नाही. सखोल ध्यान म्हणजे धारणा. धारणा ही समाधीची पहिली पायरी आहे. साधकाचा पिंडधर्म जागृत होतो. पिंडधर्म जागृत झाल्यावर साधक आपल्या पिंडधर्मानुसार समाधीअवस्था आणि ज्ञान प्राप्त करेल.
तेजस म्हणजे प्रकाश. प्रकाशाला ज्ञान मानलेले आहे. तेजस तत्त्वाची प्रमुख देवता जी श्री गणेश आहे, तिला ज्ञानमूर्ती मानलेले आहे. बुद्धिविना ज्ञान मिळू शकत नाही, म्हणून श्री गणेशाला बुद्धिदेवतासुद्धा मानलेले आहे. आप तत्त्वातून हे तत्त्व उत्पन्न होते, म्हणून श्री गणेशाला आपतत्त्व देवता शिवाचा पुत्र मानलेले आहे. प्रकाशतत्त्व सर्व तत्त्वाचा मध्य असल्यामुळे तेजस तत्त्वाला मध्य तत्त्वसुद्धा मानलेले आहे.
आपतत्त्वाच्या साधकाचे शरीर दिव्य सुगंधयुक्त असते. अशा साधकांना ‘गंधर्व’ही म्हणतात. साधकाची ‘गंधर्व’ ही एक उच्च आपतत्त्वीय अवस्था आहे. सर्व सिद्ध, यक्ष, गंधर्व याच तत्त्वाच्या आधाराने राहतात. कारण, याच तत्त्वात सर्व सिद्धींची प्राप्ती होते. आपतत्त्व हे सर्व सिद्धींचे माहेरघर आहे.
पृथ्वी तत्त्व सर्वात पहिले तत्त्व आहे. या तत्त्वाचे साधक भक्तिमार्गी असतात आणि एखाद्या बुवा, महाराजाला किंवा जडदेही गुरुला मानतात. हे लोक विशुद्ध तत्त्व समजू शकत नाहीत. एक वैदिक परंपरा सोडल्यास इतर पंथांची आणि परंपरांची मजल या तत्त्वापर्यंतच आहे म्हणून त्यांच्यात एखाद्या प्रेषितालाच किंवा श्रद्धेला प्राधान्य आहे.
स्वरोद्यशास्त्र’ हे योगशास्त्राचे उपांग असून, त्याला ‘स्वरज्ञान’ किंवा ‘काकुज्ञान’सुद्धा म्हणतात. म्हणून भगवान रामांना काकुत्स्थ वंशाचे मानलेले आहे. जो काकुज्ञान जाणतो, तो काकुत्स्थवंशी आहे. आकाशतत्वाचे साधक काकुत्स्थ वंशाचे आहेत.
वायुतत्त्वामध्ये प्रवेश करतेवेळी साधकाला छायापुरुषाची जी एक दिव्य अनुभूती येते तिचे हुबेहूब वर्णन रामायणात आलेले आहे. वायुसूत महाबली हनुमान जेव्हा समुद्र पार करून लंकेवर उड्डाण करण्याच्या तयारीत होते तेव्हा मार्गामध्ये त्यांच्या पडछायेला सिंहिका नावाची एक राक्षसीण आकृष्ट करीत होती. पडछायेला आकर्षित करण्यामुळे वायुसूत हनुमानसुद्धा त्या राक्षसीकडे आकृष्ट होऊ लागले. परंतु, कार्याला निघालेले वायुसूत त्या राक्षसीच्या पकडीत अधिक काळ फसले नाहीत.
गणेशदर्शन आणि ज्योतीदर्शन यांच्या अगोदर साधनामग्न साधकाला एक विचित्र प्रकारचे दर्शन होते. त्याला एखादवेळी ध्यानात कुत्रा दिसतो. साधकाला कुत्र्याचे दर्शन होणे अत्यावश्यक आहे. ज्या साधकाला कुत्र्याचे दर्शन होणार नाही, त्याची साधनेमध्ये प्रगती होणार नाही आणि झाली तरी ती कष्टसाध्य असेल.
‘कुंडलिनी’ शक्तीचे शरीरातील स्थान पेशीतील गुणसूत्रात ‘जीन्स’ असतात. या ‘जीन्स’मध्येसुद्धा आणखी परमसूक्ष्म रचना असतात, त्यांना ‘गुणाणू’ किंवा ’र्टीरश्रळीूं झरीींळलश्रशी’ म्हणतात. हे ‘गुणाणू’ एक दुसर्यामुळे नेहमी एका विशिष्ट ढंगाने स्पंदन पावत असतात. ‘गुणाणू’ंचे स्थान त्यांच्या भिन्न भिन्न रचनेनुसार जरी भिन्नभिन्न असले, तरी गुणाणूंची एकूण रचना कुंडलाकार अवस्थेमध्ये (डळिीरश्र) असते. कुंडलस्थित ‘गुणाणूं’ची रचना जर बदलविली, तर भिन्न गुण उत्पन्न होतात आणि ते त्या व्यक्तींचे गुण बनतात.
आप तत्त्वा’चा रस हा गुण समजण्यासाठी प्राणवायूच्या निर्मितीचे उदाहरण पाहूया. एकाच वेळी आठ विद्युतकण (Electron) जेव्हा विशिष्ट रचनेमध्ये येतात, तेव्हा प्राणवायू निर्माण होतो. याचप्रकारे जर दोन विद्युतकण एकत्र आले, तर ‘उद्जन’ (हायड्रोजन) वायुकण तयार होतात. त्यांच्यावर सतत होणार्या संस्कारामुळे विद्युतकणांना किंवा ओतांना (Electron) नेहमीच प्राणवायूची निर्मिती करणे भाग पडते. ही विवशता किंवा बाध्यता त्यांच्यावर सतत होत असलेल्या संस्कारामुळे येते. याच संस्कारांना ‘आप तत्त्वा’चा ‘रस’ म्हणतात. ‘रस’ म्हणजे संस्काराम
‘कुंडलिनी’ जागृतीसाठी पद्मासनाशिवाय उपयुक्त अशी अजून दोन आसने आहेत. महामुद्रा उजवा पाय थोडा तिरपा करून समोर ठेवावा. डाव पाय उजव्या जांघेवर अंतर्भागावर अशा प्रकारे ठेवावा की, टाच मूलाधारावर जोराने दाबली जाईल व पाऊल उजव्या जांघेवर चिकटून राहील. दोन्ही हात समांतर उचलावेत आणि दोन्ही हातांची बोटे उजव्या पायाच्या अंगठ्याला भिडवावीत. यात प्रगती झाल्यावर साधकाने हळूहळू आपले मस्तक उजव्या गुडघ्यावर टेकवून श्वास मंदगती करून त्याच अवस्थेमध्ये अधिकाधिक वेळ बसावे. त्याचप्रमाणे डाव्या पायावरही महामुद्रा करावी. महामु
साधकाला आपले मन, साधनेच्या पूर्वावस्थेत खूप सांभाळावे लागते. त्याला यम, नियम व चांगल्या संस्कारांचे कुंपण घालावे लागते.एखादी कृती पुन्हा पुन्हा केल्यास आपल्याला त्याची सवय लागते. सवयींमुळे स्वभाव बनत असतो. सवय नकळत लागत असते. आपण जाणीवपूर्वक एखादी सवय लावून घेऊ शकतो व ती सोडूही शकतो.
रोजच्या जीवनात आपण कितीही व्यस्त असलो, तरी आसन, प्राणायम, मन:शांतीसाठी ध्यान यांना वेळ दिलाच पाहिजे. कारण, रोजच्या योगसाधनेने कार्यकुशलतेबरोबर कामाचा दर्जाही वाढू लागतो. म्हणून योग हा रोजच्या दैनंदिनीतील एक अविभाज्य घटक असणे अत्यावश्यक आहे.
क्षत्रियाने कधीही धीर न सोडता, तलवार चालवली तर ‘जय’ अवश्य प्राप्त होतो. समर्थ सांगतात की, जसा तोफेचा गोळा गवताच्या गंजीत निर्भयपणे शिरतो, तसे क्षत्रियाने मुसंडी मारून शत्रूच्या सैन्यात शिरले पाहिजे. अशा रीतीने सैन्यातील प्रत्येकजण उसळून आला, तर शत्रूसैन्याची पर्वा करण्याचे कारण नाही. मर्दाने आपली ताकद, आपला उत्साह न सोडता लढले तर ‘जय’ प्राप्त होतो. समर्थांची ही चढाई करण्याची रणनीती शिवाजी महाराजांनी वापरलेली होती. परंतु, समर्थांचा विवेक येथेही दिसून येतो.
तेरणा स्पेशालिटी रुग्णालयात स्तुत्य उपक्रम
रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशींच्या सुचक वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
अमेठीमधून ‘अंडे’ मिळवत वायनाडमधून धार्मिक विद्वेषाचा आधार घेत निवडून आलेले ‘राजकुमार.’ त्यांना योग दिनाचा तसा तिटकाराच. ‘राजकुमारां’च्या ‘आलू’पासून ‘सोनाबिना’ला झूठ ठरवणारे काही लोक म्हणतात, ‘राजकुमारांना योग आवडत नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या चेंबूर येथील माहुलगावच्या एव्हरस्माईल संकुलनातील रहिवाशांची समस्याचा पाढा वाचल्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सुरक्षारक्षकाच्या गराड्यात पळ काढला.
येथील नगरपरिषद निवडणुकीत आज ६ रोजी अपेक्षेनुसार जोरदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुमारे ७०.९२ टक्के मतदान झाले. ३५ हजार ९१३ पैकी २५ हजार ४७१ (स्त्री- ११ हजार ८६७ आणि पुरुष-१३ हजार ५६४) मतदारांनी आपला हक्क बजावला. मतमोजणी आता १२ ला होणार आहे.