सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उबाठा गटात गेले अनेक दिवस वाद सुरु होता. काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी सांगलीच्या जागेवर दावा केला होता. मात्र, आता विश्वजित कदम उबाठा गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Read More
योद्धा शरण जात नाही, तेव्हा त्याला बदनाम केले जाते...’, अशी उद्विग्न प्रतिक्रिया नुकतीच उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली. पण, त्यांचा रोख सत्ताधार्यांकडे नव्हता, तर स्वपक्षातील कट-कारस्थानांना कंटाळूनच त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. पक्षनेतृत्व आपल्या नाराजीची दखल घेईल, अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु, उद्धव ठाकरेंनी त्यांना फारसे महत्त्व दिले नाही.
माझी माघार घ्यायची तयारी आहे. फक्त मित्रपक्षांनी शेतकऱ्याचा मुलगा खासदार म्हणून चालणार नाही, हे जाहीर करावं, असं वक्तव्य ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केलं आहे. सांगली लोकसभेच्या जागेसाठी सध्या मविआमध्ये वाद सुरु आहेत. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज भरल्याने आता विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरुन महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु आहे. यात ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही जागांवरून मतभेद आहेत. त्यात सांगली आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ, दक्षिण मध्य मुंबई या तीन जागेवर ठाकरे गटाने उमेदवारांची घोषणा केली आहे. ज्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. त्यात आघाडीतील मित्रपक्षाने काँग्रेससाठी सांगली, भिवंडी, उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा जागा सोडण्यास
'उथळ पाण्याला खळखळाट फार’ अशीच आजच्या ठाकरे गटाची अवस्था. मविआत मोठा भाऊ आपणच, हे सिद्ध करण्याच्या नादात ठाकरेंनी मित्रपक्षांना विचारात न घेता, परस्पर उमेदवारांची यादी जाहीर केली आणि पायावर धोंडा मारून घेतला. सकाळी ९ वाजता ठाकरेंची घोषणा होण्याची फुरसत, तिकडे काँग्रेसच्या संजय निरूपम, वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरातांनी म्यान केलेली शस्त्रे बाहेर काढली आणि ते ठाकरेंवर तुटून पडले. निरूपम यांनी तर उमेदवार बदला; अथवा महागात पडेल, असा इशारा देत बंडाचे निशाण फडकावले.
महाविकास आघाडीची सांगली लोकसभेची जागा उबाठा गट लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सांगलीच्या जागेवर काँग्रेस आणि उबाठा गटाकडून दावा सांगण्यात येत असून अखेर हा तिढा सुटल्याची माहिती पुढे आली आहे. या जागेवर आता डबल महाराष्ट्र केसरीचे चंद्रहार पाटील निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे.