लखनौ : अयोध्येतील राम मंदीराचे २२ जानेवारीला उद्धाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थीतीत रामललांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे, तर पहिल्या मजल्यावर बांधकाम सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रामललला ज्या पाण्याने अभिषेक केला जाईल ते पाणी नेपाळच्या पवित्र नद्यांमधून आणण्यात आले आहे.
Read More
अयोध्येत बनत असलेल्या श्रीराममंदीरासाठी लखनौ येथील एका भाजीविक्रेत्याने पेटंट वर्ल्ड क्लॉक भेट म्हणुन दिले आहे. ही अनोखी भेटवस्तू भाजी विक्रेते अनिल कुमार साहू यांनी राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे सुपूर्द केली. अनिल कुमार साहू यांनी दिलेले घड्याळाचे वैशिष्ठ्य म्हणजे हे घड्याळ एकाच वेळी अनेक देशांची वेळ सांगते. ज्यामध्ये भारत, मेक्सिको,जपान, दुबई,टोकियो, मेक्सिको सिटी, वॉशिंग्टन या देशांचा समावेश आहे.
अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवसाकडे भारताच्या सांस्कृतिक स्वातंत्र्याचा दिन म्हणून आपण पाहतो, असे प्रतिपादन श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी खासगी हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले आहे.
अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. यावेळी मंदिराच्या बांधकामादरम्यान केलेल्या उत्खननात पुरातन अवशेष सापडले असून तेही सर्वसामान्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. ह्या अवशेषांची छायाचित्र ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे सरचिटणीस चंपत राय यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वरही शेअर केले आहेत. दरम्यान, दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत म्हणाले की, भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारने त्यांना राम मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी आमंत्रित केले तर त्यांचा देश या कार्यक्रमात नक्कीच सहभागी ह
दै. भास्करने केलेल्या पडताळणीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. तसेच भ्रष्टाचाराचा आरोप करणारे माजी मंत्री तेज नारायण पांडे 'पवन' आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी सुलतान यांचे खूप चांगले संबंध असल्याचेही तपासात आढळून आले आहे. याबाबतचे काही फोटोदेखील पुराव्यादाखल दैनिक भास्करने प्रसिद्ध केले आहे.
अयोध्या श्रीराम मंदिराच्या निर्मिती संदर्भात आज श्रीराममंदिर निर्माण ट्रस्टची महत्वपूर्ण बैठक आज पार पडली
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांच्याशिवाय ते अन्य विश्वस्तांशी राममंदिर बांधण्याबाबत चर्चा करू शकतात.
राम मंदिराची सर्वत्र चर्चा असतानाच अयोध्येत विश्व हिंदू परिषदेने मंदिर बांधण्यासाठी ७० ट्रक भरून दगड मागवले आहेत.