सिडको महामंडळाने संपादित केलेल्या तसेच संपादित करण्यात येत असलेल्या जमिनींवर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे डंपर वाहन चालकाकडून डेब्रीज टाकण्यात येत असून हे डेब्रीज हे मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानीकारक असल्याचे निदर्शनास आले आहे.
Read More
बीड हत्या प्रकरणात मोठी अपडेट पुढे आली असून वाल्मिक कराड हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याची माहिती समोर आली आहे. सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राहुल गांधीची मजल छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यापर्यंत गेली असून हे निंदाजनक आहे. त्यांनी माफी मागावी, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी दिली.
सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” महागृहनिर्माण योजनेकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासह सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडण्याकरिता दिनांक ३१ जानेवारीपर्यंतची मुदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.
नवी मुंबई : ‘मुंबई लेबर युनियन’ (संलग्न : हिंदू मजदूर सभा)तर्फे ‘सिडको’ महामंडळातील ३०० कर्मचार्यांनी विविध मागण्यांकरिता ‘सिडको’ ( CIDCO ) भवनसमोर पुकारलेल्या धरणे आंदोलनाला आमदार मंदा म्हात्रे यांनी गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी उपस्थिती दर्शवली. कर्मचार्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या व सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डीले यांच्या दालनात तातडीची बैठक घेतली. या कर्मचार्यांचा मागण्या लवकर पूर्ण करण्यात याव्यात, असे आदेश आमदार म्हात्रे यांनी सहव्यवस्थापकीय संचालक कर्डीले व उपस्थित संबंधित अधिकार्यांना दिले.
सिडको कार्मिक विभागाच्या प्रधान व्यवस्थापक प्रमदा बिडवे यांनी जारी केलेले परिपत्रक दैनिक मुंबई तरुण भारतच्या हाती लागले आहे.
(Santosh Deshmukh Murder Case) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणीच्या तपासासाठी १ जानेवारीला स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, काही अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे.
(Vishnu Chate) बीड सरपंच संतोष देशमुख ह्त्या आणि अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणांमध्ये अटकेत असणाऱ्या संशयित आरोपी विष्णू चाटेला १८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ११ जानेवारी रोजी त्याला केज न्यायालयाकडून २ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती. दोन दिवसांच्या कोठडीची मुदत आज संपल्याने आरोपी विष्णू चाटेला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
(Santosh Deshmukh Murder Case) बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. ६ डिसेंबर रोजी मस्साजोगला जातना सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केल्याची माहिती समोर येत आहे.
नियंत्रक अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई व नैना) विभागातर्फे सन २०२४मध्ये सिडको अधिकारक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध धडक मोहिमा राबवून २,१०२ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आल्याची माहिती सिडको प्राधिकरणाने दिली आहे. या कारवाईमुळे २ लाख ६ हजार ४३१ चौ.मी. क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले.
(Walmik Karad) बीड मस्साजोगच्या सरपंच देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी ३१ डिसेंबरला पुणे सीआयडी मुख्यालयात शरण आला. शरणागतीनंतर सायंकाळी त्याला पुणे पोलिसांनी केज पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर रात्री उशिरा कराडला केज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयातील युक्तिवादानंतर त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याला केज न्यायालयातून बीड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे.
(Sudarshan Ghule) सीआयडीच्या कारवाईनंतर खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना मंगळवारी ३१डिसेंबरला सीआयडीच्या पुणे मुख्यालयात शरण आला. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्याची सीआयडी चौकशी सुरू आहे. मात्र मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुदर्शन घुले हा शरण येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून यातील फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, वाल्मिक कराडच्या शोधासाठी सीआडीची तीन पथके पुण्यातून रवाना झाल्याची माहिती पुढे आली आहे.
(Walmik Karad) खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याच्या दिवशी वाल्मिक कराड हा उज्जैनमध्ये होता, अशी माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर वाल्मिक कराडची बँक खाती गोठवण्यात आली आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराडच्या नातेवाईकांची बँक खाती गोठवण्यात आल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून कसून चौकशी करण्यात आली आहे.
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” या २६,००० घरांच्या महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस १० जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडकोतर्फे सादर करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत २६,००० सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गुणवत्ता, पर्यावरण, व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षितता यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन करण्याच्या निकषावर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर या मेट्रो परिचालन सेवेला आयएसओ ९००१, आयएसओ १४००१ आणि आयएसओ ४५००१ मानांकने प्राप्त झाली आहेत. अशा प्रकारची तिनही आयएसओ मानांकने प्राप्त करणारी नवी मुंबई मेट्रो ही राज्यातील एकमेव मेट्रो सेवा ठरली आहे.
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” या २६ हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेने १ लाख अर्जांचा विक्रमी टप्पा गाठला आहे. हे पाहता नागरिकांच्या विनंतीस मान देऊन या योजनेकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी २६ डिसेंबर २०२४ पर्यंत ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. अंतिम मुदत संपुष्टात येईपर्यंत नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद कायम राहणार असल्याचा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
सिडको महामंडळाने संपादित केलेल्या तसेच संपादित करण्यात येत असलेल्या जमीनीवर, भूखंडावर मोठया प्रमाणात अनधिकृतपणे डंपर वाहन चालकाकडून डेब्रीज टाकण्यात येत आहे. या अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य दक्षता अधिकारी, सिडको यांच्या नेतृत्वाखाली दक्षता पथकाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे.
हजार घरांच्या विक्रीकरिता सिडकोने दीड महिन्यांपूर्वी आणलेल्या महागृहनिर्माण योजनेतील वन बीएचके व टू बीएचके घरांच्या किंमती सिडकोने आजतागायत जाहीर न केल्यामुळे या महागृहनिर्माण योजनेतील घरे खरेदी करण्याकरिता नोंदणी केलेले ग्राहक संभ्रमात आहेत.
सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”या महागृहनिर्माण योजनेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून एक महिन्याच्या कालावधीत ९२ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या गृहनिर्माण योजनेकरिता अधिकाधिक नागरिकांना अर्ज करता यावा याकरिता योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीसही ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सिडको प्राधिकरणाने दिली आहे.
नवी मुंबई विमानतळ येथील हाकेच्या अंतरावर असलेल्या पारगाव येथील डोंगराळ ठिकाणी अवैध दर्गा (illegal Mosque) बांधण्यात आला होता. विमानतळाचे काम हे युद्ध पातळीवर सुरू असल्याने सिडकोने या अवैध दर्ग्यावर जेसीबी चढवत दर्गा जमीनदोस्त केला आहे. गेल्या काही वर्षांपासून या दर्ग्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. फुल पीर शाह बाबा दर्गा असे या दर्ग्याचे नाव आहे.
( Irshalwadi )ईर्शाळवाडीतील दरडग्रस्तांना आचारसंहितेआधी घरांचा ताबा देण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी दिली. खालापूर तालुक्यातील ईर्शाळवाडी या आदिवासी वस्तीवर दरड कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ५७ जण बेपत्ता झाले होते.
(kharghar) खारघरमधील जलमार्ग सेक्टर १६ ते बेलापूरला जोडणाऱ्या (KCR) खारघर कोस्टल रोडच्या डिझाइन आणि बांधकामासाठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) निविदा प्रक्रिया सुरू केली. आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवेश सुधारण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प पावसाळ्यासह ३० महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने रस्त्यासाठी कोस्टल रेग्युलेशन झोनला मंजुरी दिली, ज्यामुळे बांधकाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.
नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी शासन आदेश निघूनही अडचणी येत होत्या. मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले होते. आज खा. नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास विभागात सिडको अधिकारी आणि स्थानिक भूमिपुत्र यांची संयुक्त बैठक होऊन चर्चा झाली. अंतिम मसुदा आता लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार असल्याने ही बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सिडकोतर्फे सातत्याने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता गृहनिर्माण योजना राबविण्यात येतात. सोडतीद्वारे या गृहनिर्माण योजनेतील घरांची विक्री होते. हे पाहता यंदाच्यावर्षी सिडकोतर्फे कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर २७ ऑगस्ट रोजी ९०२ सदनिकांच्या विक्रीकरिता गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती, सिडकोने दिली आहे.
देशभरातील अनेक शहरांमधील गृहनिर्माण प्रकल्प रखडले आहेत. ४२ शहरांमधील सुमारे २ हजार गृहनिर्माण प्रकल्प रखडले असून यात एकूण ५.०८ लाख सदनिकांचा समावेश आहे. हे प्रकल्प मुख्यतः विकासकांच्या पैशांचा गैरवापर आणि काम पूर्ण करण्याची त्यांची क्षमता नसल्यामुळे रखडले आहेत, असे 'PropEquity' या डेटा ॲनालिटिक्स कंपनीने म्हटले आहे.
‘नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या विमानतळाचा पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना या विमानतळाच्या पाहणीदरम्यान दिली.
सिडको महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवार, दि. २४ एप्रिल रोजी पुष्पक नोडमधील सेक्टर-२७, २८, २९ व ३०, उलवे किनारी मार्ग प्रकल्प, विमानतळ जोडणी करणारे पूल क्र. ४, ५ व ९ तसेच सायन्स पार्क आणि खारघर हिल प्लेट्यू या प्रकल्प स्थळांना भेट देऊन आढावा घेतला.
सिडकोने बेलापूर व वाशी येथे दिलेल्या सार्वजनिक वाहनतळ भूखंडावर आता सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप - पीपीपी) बहुमजली (मल्टीस्टोरीड) वाहनतळासोबत वाणिज्य संकुल (कमर्शिअल कॉम्फ्लेक्स) उभारण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्याकरिता या दोन्ही भूखंडाचा वापर बदल करण्याकरिता महापालिकेने गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात सिडकोकडे ना हरकत (एनओसी) प्रमाणपत्र मागितले होती.
सिडकोचे सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी डॉ. दिलीप वाटाणे यांचे नुकतेच हृदय विकाराने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे. डॉ दिलीप वाटाणे हे त्यांच्या कार्यतत्पर, हसतमुख आणि मिश्किल स्वभावामुळे लोकप्रिय होते.
नवी मुंबईतील ११२९ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. दि. २३ फेब्रुवारी रोजी १२ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंगल यांची नियुक्ती सिडकोच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर करण्यात आली आहे.
'शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ(सिडको)' अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. सिडकोकडून नव्या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 'सिडको'मधील रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 'सिडको'अंतर्गत एकूण १०१ रिक्त जागांकरिता होणाऱ्या भरतीसंदर्भातील सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा झटका बसला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी मानून दोषी ठरवले आहे. त्यासोबतच अन्य पाच जणांवरील गुन्हासुद्भा सिद्ध झाला आहे. त्याव्यतिरीक्त तिघांची न्यायालयाने पुराव्याच्या आधारे निर्दोष मुक्तता केली आहे.
गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता म्हाडाकडून विशेष अभियान राबविण्यात येत असून त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यश न मिळालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला दि. १४ जानेवारी २०२४ पर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
सध्या बहुप्रतीक्षित धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत स्थानिकांसह काही राजकीय पक्षांनीही विरोधाची भूमिका घेतल्यामुळे या प्रकल्पाला विलंब होण्याची आणि पर्यायाने बांधकाम खर्चात भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रकारे महामुंबईतील महत्त्वाकांक्षी तिसरी मुंबई अर्थात ‘नैना’ शहर प्रकल्पाविरोधातही विरोधाचे सूर कानी पडू लागले आहेत. त्यानिमित्ताने महामुंबईच्या विकासपर्वात आमूलाग्र बदल घडविण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाविषयी...
महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांकरिता थेट मुलाखतीद्वारे नियुक्ती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळांतर्गत होणाऱ्या थेट मुलाखतीसाठी दि. २२ नोव्हेंबर आणि २३ नोव्हेंबर रोजी इच्छुक आणि पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे सन २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र ११४ गिरणी कामगार / वारस यांना आज सहाव्या टप्प्यांतर्गत सदनिकांच्या चाव्यांचे वाटप आज करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याने नुकतेच महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र सागरी विकास धोरण-२०२३ जाहीर केले असून यामाध्यमातून सागरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना राज्य शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या ६७० झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली. तसेच, या प्रकल्पात सदनिकातील सुविधा, सौर ऊर्जेची व्यवस्था, इमारतीची सुरक्षा, देखभाल आणि स्वच्छता, परिसरातील वृक्षारोपण, जलपुनर्भरण आदीविषयी माहिती घेत इमारतीच्या परिसरात स्वच्छता राखावी, प्रकल्पातील विविध सेवांसाठी स्थानिकांना संधी द्यावी, असेही अजित पवार म्हणाले.
भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय किंवा सीबीआयकडे सोपवण्याच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल कोलकत्ता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या ममता सरकारला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार जिल्ह्यातील महिला सहकारी संस्थेतील घोटाळ्याशी संबंधित आहे. याचा तपास सध्या सीआयडी करत आहे. दंड ठोठावण्यासोबतच कोलकत्ता उच्च न्यायालयाने ममता सरकारलाही खडसावले आहे.
‘म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील १२५ यशस्वी गिरणी कामगारांना मंगळवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सदनिकांच्या चाव्यांचे वाटप राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
म्हाडाची लवकरच आणखी एक सोडत निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाची ४ हजार घरांसाठी सोडत निघणार आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली , विरार, मीरारोड याठिकाणी म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमुळे माफक दरात घर घेणाऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण झाली आहे. दरम्यान, म्हाडाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर या संबंधी तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. म्हाडा आणि सिडको यांमुळे स्वस्त दरात मुंबई, पुण्यासारख्या महानगरांत घरे घेणे सामान्यांना शक्य झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेत सुरु असलेले बचावकार्य थांबविण्यात आले असून जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात दि. १९ जुलै पासुन सुरु असलेली बचाव कार्य मोहीम आज दि.२३ जुलै रोजी सायं. ५.३० पासून थांबविण्यात आल्याचे यावेळी जाहीर केले. तसेच, इर्शाळवाडी दुर्घटनेतून बचावलेल्या १४४ लोकांच्या पाठिशी शासन ताकदीने उभे असून या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मुंबई : सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी अनिल डिग्गीकर यांनी जेएनपीएच्या चेअरमन पदी काम पाहिले आहे. यामुळे उरण पनवेल मधील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याचा विश्वास वाटत आहे. अनिल डिग्गीकर यांनी सिडको महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे अनिल डिग्गीकर यांनी आज सिडकोचे पूर्वीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडून स्वीकारली आहे.
मुंबई : गृहनिर्माण संस्थांकडून प्रस्तावित असणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांची माहिती देण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. या जाहिरातींमध्ये आता क्यूआर कोड दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. महारेराने याबाबत नुकतेच आदेश दिले आहेत.
सिडकोच्या जागेवर बेकायदेशीर कंटेनरयार्ड चालवणाऱ्या भूमाफियावर कारवाई करा, अशी मागणी उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे केली. त्या अनुषंगाने विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश सिडकोला दिले.
मध्य रेल्वे लवकरच मुंबईकरांना अधिक रेल्वे स्थानकांची सुविधा देणार आहे. मुंबई लोकल ट्रेनसाठी लवकरच सहा उपनगरीय रेल्वे स्थानके सुरू होणार आहेत. यामध्ये उरण मार्गावरील पाच आणि दिघे रेल्वे स्थानकावरील ठाणे-वाशी मार्गावरील एका मार्गाचा समावेश आहे. सहाही रेल्वे स्थानकांच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उरण मार्गावरील गव्हाणपाडा, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी आणि उरण ही स्थानके आहेत.सध्या मध्य रेल्वेची मुंबईत ८० स्थानके असून ही संख्या आता ८६ होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या एकूण ३७ लोकल ट्रेन स्थानकांसह,
सिडको गृहनिर्माण योजनेत नवी मुंबईतील पत्रकारांना अडचण ठरणारी अट शिथिल करण्यात आली आहे. यापूर्वी पत्रकारांना सिडकोतून घरांसाठी अर्ज करण्यासाठी राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क संचलनालयाकडून प्राप्त कराव्या लागत होत्या. ही अट आता शिथिल करण्यात आली असून यानंतर सिडकोमार्फतच शहानिशा करून पत्रकारांची पात्रता निश्चित केली जाणार आहे. या निर्णयामुळे पत्रकारांना सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील घरे मिळण्याचा मार्ग आता सुकर होणार आहे.
नवीमुंबईतील कामोठेच्या सेक्टर ३४ आणि ३६ येथे अवैध रित्या बांधलेले बांध तोडून भरतीचे पाणी पुन्हा कांदळवनात वाहते करण्यात आले आहे. ही कारवाई वनविभागाच्या कांदळवन कक्षाने केली. ही जमीन नुकतीच 'सिडको'कडून कांदळवनकक्षाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. या मोक्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणात कांदळवन आहे.