निसर्ग संपदेचा र्हास आणि पर्यावरणीय परिसंस्थेतील अनेक घटकांचे होणारे नुकसान, तसेच त्यामुळे प्रजातींचे नष्ट होणे चिंताजनकच. याच नष्ट होण्याच्या साखळीमध्ये आणखी एका प्रजातीचा समावेश झाला आहे, ती म्हणजे ‘आफ्रिकन रॅप्टर्स’ म्हणजेच ’आफ्रिकी शिकारी पक्षी.’ गेल्या ४० वर्षांच्या कालावधीमध्ये या पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये तब्बल ८८ टक्के इतकी घट झाल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी निरीक्षण केलेल्या ४२ प्रजातींपैकी दोन तृतीयांश प्रजाती जागतिक स्तरावर धोक्यात असल्याचे पुराव
Read More