बांगलादेशमधील गोपालगंज जिल्ह्यातील मालीबाटा विश्वबंधु सेवाश्रम येथे एका महिला हिंदू पुजाऱ्याचा मृतदेह सापडला. ही घटना रविवारी, दि. ३ मार्च २०२४ रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव हशिलता बिस्वास असे आहे. महिलेचे वय ७० वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी दि. २ मार्चला रात्री त्या मंदिरात झोपल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक लोक मंदिरात गेले तेव्हा त्यांना दरवाजे उघडे दिसले. नंतर त्यांना हशिलता बिस्वास यांचा मृतदेह सापडला. महिलेचे तोंड आणि हात दोरीने बांधले होते.
Read More
बंगाली हिंदूंसाठी आवाज उठवणाऱ्या 'स्टोरीज ऑफ बंगाली हिंदूज' नावाचे हँडल ट्विटरने निलंबित केले
अल्पसंख्याकांविषयक चर्चेला बांगलादेशातील घटनाक्रमामुळे एक वेगळेच वळण मिळाले आहे. भारतीय परिप्रेक्ष्यातील यासंबंधीचे प्रश्न वेगळ्याच पद्धतीने पाहावे लागतील.