मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे राज्याचे नुकसान केले. पुढच्या वेळी ठाकरेंचे पाच आमदारही नसतील, असा दावा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. गुरुवार, १७ एप्रिल रोजी त्यांनी बेस्ट भवन येथे बेस्टच्या विविध प्रश्नांसंदर्भात समर्थ बेस्ट कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Read More
मराठी नाट्यसृष्टीतला सर्वोच्च आदराचा झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात यंदा ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’, ‘असेन मी नसेन मी’, ‘शिकायला गेलो एक’, ‘वरवरचे वधूवर’, ‘विषामृत’ अशा अनेक नाट्यकृतींमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली. अखेरीस, सोहळा संपन्न झाल्यानंतर आता विजेत्या कलाकारांची नावे हळूहळू उलगडू लागली आहेत.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. श्रीनिवास यांनी गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला असून ते १९९१ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.
मुंबई मेट्रो ३ ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या मार्गिकेवरील पहिल्या टप्प्यातील आरे-बीकेसीदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बेस्टने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकांदरम्यान वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे. भूमिगत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मेट्रो स्थानक ते इच्छितस्थळ प्रवास सुलभ करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) आणि बेस्ट प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
कुर्ल्यात बेस्ट बस अपघातानंतरही मुंबई महानगरपालिकेडून अतिक्रमणे हटविण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांकडून रोष व्यक्त होतो आहे. कुर्ला (प) स्थानक ते स.गो. बर्वे मार्ग- रॉयल हॉटेल पर्यंत तसेच कुर्ला (प)हॅप्पी होम ते श्रीकृष्ण चौक आणि सेंट जोसेफ हायस्कुल ते मार्केट पर्यंतचे सर्व फुटपाथवरील अतिक्रमण तातडीने कायमस्वरुपी हटविणेबाबत भाजप जिल्हा सचिव व्यंकट बोद्दुल यांनी मुंबई महानगरपालिका एस विभाग आणि कुर्ला वाहतूक पोलिसांना पत्र लिहिले आहे. तसेच ही अतिक्रमणे न हटविल्यास शुक्रवार, दि.२० रोजी महापालिका कार्या
मुंबई : मुंबईतील बेस्ट बसच्या ( Best Bus ) अपघाताची घटना गंभीर असून, राज्य शासनाने याची दखल घेतली आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना राबविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. १६ डिसेंबर रोजी दिली.
बेस्टच्या व्हायरल व्हिडिओ मागचं भयाण सत्य काय? कशी चालतेयं कंत्राटी कामगारांची व्यवस्था? भाजप नेते रवी राजांनी ( Ravi Raja ) दाखवला बेस्ट प्रशासनातर्फे चालविल्या जाणाऱ्या कंत्राटी व्यवस्थेचा काळा चेहरा!
दररोज ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उददेशाने एसटी महामंडळ गेली ७६ वर्ष काम करीत असून रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी चालकांचे सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचे मानसिक आरोग्य सुदढ करणे या बरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बसेंस उपलब्ध करुन देणे या त्रिसूत्रीवर यापुढे भर देण्यात येत असून, प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचे अंतिम ध्येय राहील असे प्रतिपादन एसटीचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी केले.
मुंबई : अखेर, कुर्ला ( Kurla ) स्टेशनपर्यंत बस सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. कुर्ला स्टेशन पर्यंत बस सेवा पूर्ववत करण्याबाबत मागील ३ दिवसापासून चुकीची माहिती देत बस सेवा स्थगित करत सामान्य प्रवाश्यांना वेठीस धरणारे वरिष्ठ वाहतुक अधिकारी लक्ष्मण महाले यांची चौकशी करत कारवाई करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांसकडे केली आहे.
मुंबई : कुर्ला पश्चिम पसिरात बेस्ट बसचा अपघात होऊन ७ निष्पापांना जीव गमवावा लागला. या घटनेकडे चौकस नजरेने पाहता अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी कामगार नेते तथा बेस्ट ( BEST ) वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला विशेष संवाद.
कुर्ल्यातील बेस्ट बस दुर्घटनेमुळे अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि वाहतूक नियोजनाची आवश्यकता असे अनेक मुद्दे चर्चेत आले आहे. मुंबईचे वाहतूक नियोजन आखताना महानगरपालिका, एमएमआरडीए, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील समन्वयाची आवश्यकता याविषयी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्याशी दैनिक मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद.
कुर्ला येथे बेस्ट बस दुर्घटनेत ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे मुंबईतील रहदारीच्या ठिकाणांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूना रस्त्याच्या कडेला लावण्यात येणारी अनधिकृत वाहने, पदपथावर लावण्यात येणारी अनधिकृत दुकाने आणि अनधिकृतरित्या उभारण्यात येणारे व्यवसाय यांचा विळखा मुंबईतील रस्त्यांच्या भोवती घट्ट होताना दिसतो आहे. विशेषतः रेल्वे स्थानकांच्या बाहेर आणि स्थानकांच्या ५०० मीटरच्या परिसरात अशी अनधिकृत कारवायांमुळे स्थानकांकडे जाणारे रस्ते निमुळते झाले आहे. अशातच बेस्ट चालकांना या स्थानकांच्या परि
(CSMT Best Bus Accident) कुर्ला बेस्ट बस अपघात दुर्घटना ताजी असताना सीएसएमटी परिसरातील बेस्ट बस अपघातात आणखी एकाचा निष्पाप बळी गेल्याचे वृत्त समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे बेस्ट बस खाली चिरडल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. सीएसएमटी स्थानकाजवळ हा अपघात घडला असून जवळच्या रुगणालयात नेत असतानाच व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
(Kurla Best Bus Accident) मुंबईतील कुर्ला येथे सोमवार दि. ९ डिसेंबर रोजी रात्री भरधाव वेगात बेस्ट बसने आठ ते दहा वाहने आणि पादचाऱ्यांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून ४९ लोक गंभीर जखमी झाले असून त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
(kurla) कुर्ला येथे सोमवारी ९ डिसेंबर रोजी झालेल्या भीषण बेस्ट बस अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखाची मदत जाहीर केल्याचे मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत सांगितले आहे. तसेच त्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करत अपघाताविषयी शोक व्यक्त केला आहे.
मुंबई : ( Kurla ) बसचे ब्रेक फेल गेल्याने हा अपघात घडला असा दावा बसचालक संजय मोरे याने केला आहे. मात्र, इलेक्ट्रिक बसचे ब्रेक कधीच फेल होत नाहीत असा तर्क तज्ज्ञांनी काढला आहे. त्यामुळे आता बसचालक खोटे तर बोलत नाही ना?, असा प्रश्नही आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. सोमवार दि. ९ डिसेंबर रोजी रात्री कुर्ल्यात भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले. बसचालक संजय मोरेची नियुक्ती १ डिसेंबर रोजीच झाली होती. या बेस्ट बसचालकाला कंत्राटावर घेतले होते. त्याला यापूर्वी बस चालवण्याचा अनुभव नव्हता. या अपघातानंतर आरोपीवर एफआयआर द
(Kurla Best Bus Accident ) बेस्ट मध्ये भाडे करार तत्त्वावर बसेस घेण्याचे कंत्राट वर्ष २०१८ ते २०२१ या काळात तत्कालीन सत्ताधारी उबाठा सेनेच्या नेतृत्वात आणि उबाठा सेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार देण्यात आले होते. त्यावेळी भाजपने सदर प्रस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आता वाढणाऱ्या अपघातामुळे आणि झालेल्या जीवितहानीमुळे सदर बाबीचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचे भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी बेस्ट महाव्यवस्थापकांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बसच्
महाराष्ट्रात आज दि. २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया आरामात आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रेल्वे, मेट्रो १, मेट्रो ३ आणि मेट्रो २ए आणि ७ तसेच, बीएसटीनेही त्यांच्या सेवा पहाटे ४ ते दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १ वाजेपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
(Karde)महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती. पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक स्वप्निल कापडणीस, सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड, कृषी अधिकारी सुनील खरात यांनी हा पुरस्कार दिल्ली येथे स्वीकारला. या स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल पर्यटनमंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटील यांनी
शिवशक्ती मित्र मंडळांचा बाप्पा देतोय ‘बेस्ट बचाओ’चा संदेश!
जगातील सर्वोत्तम कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. जागतिक टाईम्स मासिकाकडून जगातील टॉप-१००० सर्वोत्तम कंपन्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. देशातील नामांकित आयटी क्षेत्रातील कंपनी एचसीएल टेक या कंपनीने ११२ व्या स्थानी झेप घेतली आहे.
मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी बेस्ट बचाओ अभियानाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत यावर्षी ‘बेस्ट बचाओ’ या विषयाअंतर्गत संदेश दिला आहे. यामध्ये बेस्ट बसचा कमी होणारा ताफा आणि अल्पदरात मिळणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला लागणारे टाळे याबाबत जनजागृती करणारे बॅनर, देखावे करण्यात आले आहेत.
मुंबईतील लालबाग परिसरात गणशोत्सवात सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यात दि. १ सप्टेंबर रोजी रात्री बेस्ट बसने रस्त्यावरील ९ नागरिकांना धडक दिली. त्यापैकी पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून तिघांवर उपचार सुरु आहेत. मात्र या अपघातात जखमी झालेल्या एका तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यात या बसमधील एका मद्यधुंद प्रवाशामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जातयं. दरम्यान बस चालकावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“मुंबईच्या परिवहन सेवेला सक्षम करायचे असेल, तर ‘बेस्ट’ला अधिक बळकट करावे लागेल. त्याशिवाय, एकात्मिक प्रणाली विकसित होऊ शकणार नाही, जी सिंगल अॅपवर आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे ‘बेस्ट’च्या बळकटीकरणासाठी धोरण आखा,” अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. 26 जुलै रोजी केली. ‘बेस्ट’ कामगारांना सेवेमधील विविध लाभ वाटपाचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडला. यावेळी ते बोलत होते.
१५ व्या कृषी नेतृत्व समिती २०२४ आणि एग्रीकल्चर टुडे या मासिकाच्या वतीने देण्यात येणारा 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार' महाराष्ट्राला जाहीर झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवार, १० जुलै रोजी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, एग्रीकल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉ.एम.जे.खान, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
बेस्टमधील भंगार भ्रष्टाचाराची चौकशी करा, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मंगळवारी सभागृहात केली. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून शेलारांनी बेस्ट बसमधील भंगार घोटाळ्याचा प्रश्न सभागृहात मांडला. दरम्यान, यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले.
मुंबईतील १७हून अधिक बस रसिकांनी शेवटच्या बेस्टच्या मालकीच्या टाटा सीएनजी नॉन-एसी बसला निरोप दिला. शनिवार दि.१ रोजी या बसमधून संपूर्ण शहरात फेरी मारण्यात आली. या निरोप समारंभात चालक आणि वाहकांचा सन्मान करताना केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, मार्ग निर्देशकांसाठी रोलर बोर्ड असलेली ही शेवटची बस होती. रोलर इंडिकेटर असलेल्या फक्त उरलेल्या बसेस नॉन-एसी मिडी बसेस आहेत तर ताफ्यातील इतर सर्व बसेस इलेक्ट्रॉनिक रूट इंडिकेटरमध्ये बदलल्या आहेत.
महाराष्ट्रात एसटी आणि बेस्ट बरोबरच पुण्याच्या पीएमपीएमलला इलेक्ट्रिक बसेस पुरवणाऱ्या ऑलेक्ट्रा ग्रिनटेक लिमिटेड चा वार्षिक आर्थिक निकाल जाहीर झाला आहे. कंपनीला आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये एकूण ८,२३२ इलेक्ट्रिक वाहनांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत, ज्यात ३,००० बसेसच्या मागणीचा समावेश आहे.
जगभरातील कलाविश्वात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी ‘ऑस्कर पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार आहे. ९६व्या अकादमी पुरस्कार २०२४ चे वितरण लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये ११ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ४.३० वाजता सुरु झाले. यंदाच्या ऑस्करवर ‘ओपनहयमर’ (Oppenheimer) चित्रपटाने शिक्कामोर्तब केला असून तब्बल (Oppenheimer) ७ पुरस्कारांवर नाव कोरण्याचा इतिहास त्यांनी रचला आहे. पाहूयात ऑस्करवर यंदा कोणी आपले नाव कोरले आहे याची यादी...
राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी बारामती इथे भाषण करत असताना. पार्लमेंटमध्ये बेस्ट अवॉर्ड मिळवून काही होत नाही अस म्हणत सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला लगावला आहे. आपल्या भाषणात अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवारांच्या तुफान फटकेबाजीनं भाषणात एकच हशा पिकला.
मराठी रंगभूमीवर खणखणीत वाजलेलं व गाजलेलं नाटक म्हणजे देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’. देवेंद्र पेम लिखित ही एकांकिका ९०च्या दशकाच्या सुरुवातीला विशेष गाजली. ३१ डिसेंबर १९९३ला या व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग झाला. तीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकानं अनेक विक्रमांना गवसणी घातली आणि रंगभुमीवर मोठा इतिहासचं घडवला.
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसचा प्रति किलोमीटरमागे खर्च तब्बल १९३ रुपये असल्याची लेखी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका लक्षवेधीवरील उत्तरात दिली आहे. तसेच बेस्ट उपक्रमाचे मासिक उत्पन्न ६० कोटी, तर खर्च २४० कोटी इतका असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' अभियानांतर्गत भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने दिल्ली, पंजाब, चंदीगड, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पुडुचेरी, अंदमान निकोबार द्वीपसमूह व लक्षद्वीप या १२ राज्यांचा स्थापना दिवस १ नोव्हेंबर रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरा झाला.
औद्योगिक न्यायालयाने बेस्ट प्रशासनाला आपल्या कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के दराने बोनस देण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना २०११-१२ आणि २०१२-१३ मध्ये बोनस देण्यात आलेला नाही. बेस्ट एम्प्लॉईज युनियनने याला अन्याय म्हणत प्रशासनाविरोधात खटला दाखल केला होता. ज्यावर औद्योगिक न्यायालयाने निर्णय दिला आहे.
मुंबईच्या बेस्ट उपक्रमाने आपल्या ताफ्यातील एसी बसची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या ताफ्यात आणखी २५० सिंगल डेकर एसी बस ताफ्यात दाखल करणार आहे. त्यासाठी २७ सप्टेंबर पासून निविदा जारी केली जाणार आहे. या बस १२ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतल्या जातील. या उपक्रमासाठी बेस्टला १ हजार ३२३ कोटी रुपयांहून अधिक खर्च मोजावा लागणार आहे.
भारतातील सामाजिक रचना गुंतागुंतीची आहे बहुआयामी कंगोरे असलेली आहे. परंतु नोकरदार वर्गात व कार्यालयीन स्थळी महिलांप्रती विषमता कमी होत चालल्याचे मान्यच करावे लागेल. समाज प्रबोधनातून या गोष्टी साध्य होतील. पण यालाही पूर्वनियोजित सुरक्षित कामाची चौकट दिल्याशिवाय आता गत्यंतर राहिले नाही. नोकरी व्यवसायात धर्म, पंथ, लिंग असत नाही असं म्हटल तरी वंचित असलेले सर्व घटक, महिला, दिव्यांग, LGBTQ, विशेष पात्रता असलेले सगळ्यांना ' सर्वसमावेशक ' वातावरण निर्माण करण्याची उद्योग विश्वात मागणी आहे. एकत्रित प्रयत्न केल्यास समा
माटुंगा रोड रेल्वे स्टेशन ते टी एच कटारिया मार्ग परिसरामध्ये माटुंगा लेबर कॅम्प ते माटुंगा वेस्टर्न रेल्वे (तरंगता पूल) शाहूनगर बीट क्र.३, या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी बहुतेक विद्युत खांबातील लाईटी बंद पडलेली आहे. गेल्या अनेक दिवसपासून विद्युत खांबामधील लाईटचं गायब आहे.वारंवार पालिका व बेस्ट प्रशासनाच्या निदर्शनात आणून देखील अद्यापही काही कारवाई झालेली नसल्याचे स्थानिक कार्यकर्ते संजय भालेराव यांनी सांगितले.
केंद्र सरकारने मंगळवारी ८ यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. या यूट्यूब चॅनलवर फेक न्यूज पसरवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. हे यूट्यूब चॅनल भारतीय सेना, सरकारी योजना, लोकसभा निवडणुका आणि इतर अनेक गंभीर विषयांवर दिशाभूल करणारी माहिती पसरवत होते. या ८ चॅनेलचे मिळून २३ दशलक्ष सदस्य आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेकडून एसी बससेवा नागरिकांना माफक दरात उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना अवघ्या ५ रुपयांत गारेगार प्रवास करता येणार आहे. दरम्यान, ही बससेवा पहिल्या टप्प्यात वाशी ते कोपरखैरणे यादरम्यान चालविण्यात येणार आहे. पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर पालिकेकडून एसी बससेवेचा विस्तार करण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या यानिर्णयामुळे बेस्टच्या धर्तीवर नवी मुंबईकरांना बससेवा उपलब्ध होणार आहे.
मागील दोन दिवसांपासून बेस्टमधील कंत्राटी कर्मचारी आंदोलनावर गेल्यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था, येत्या २४ ते ४८ तासात पूर्ववत करणार असल्याचे मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. ते मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांच्या पार्शवभूमीवर बुधवार दिनांक ४ ऑगस्टपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. याचा परिणाम थेट तिसऱ्या दिवशी देखील पाहण्यास मिळाला आहे. मुंबईतील अनेक बस थांब्यांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा पाहण्यास मिळाल्या. मुंबईतील एकूण २७पैकी १२ आगारांमधील भाडेतत्त्वावरील तब्बल एक हजार बस मागील तीन दिवसांपासून मुंबईच्या रस्त्यांवर धावल्या नसल्यामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबईतील घाटकोपर डेपोमधील बेस्ट बसचे कंत्राटी चालक कालपासून संपावर गेले आहेत. विविध मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारला आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे आणि हा संप आता अनेक आगारांमध्ये पसरला आहे.
कंत्राटी कामगारांना बेस्टच्या कामगारांसारख्या सुविधा द्याव्यात, बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विलीन करावा आदी विविध मागण्यांसाठी बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज बुधवार (२ ऑगस्ट) सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याचा परिणाम बेस्टच्या वाहतुकीवर झाला आहे. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे.
‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे मुंबईकर ‘नेमेचि होते मुंबईची तुंबई’ असे म्हणत कसेबसे पावसाळ्यांत अक्षरश: ‘जीवाची मुंबई’ करतात. पालिकेचेही दरवर्षीप्रमाणे १०० टक्के नालेसफाईचे दावे पहिल्या पावसात धुवून निघतात. यंदाही मुंबईची परिस्थिती काही वेगळी नाहीच. त्याचाच या लेखातून घेतलेला हा आढावा...
राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणात कंपनीचे कामकाज आणि कर्मचार्यांचे काम यासंदर्भात कार्यसंस्कृतीवर विशेष भर देण्यात आला. कंपनीला उत्तमच नव्हे, तर सर्वोत्तम बनविण्यात कंपनीस्तरावर व कंपनीअंतर्गत काम करण्याची पद्धती म्हणजेच कार्यसंस्कृती. हा एक मुख्य परिणामकारक पैलू असतो, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहेच. त्याविषयी सविस्तर...
मुंबई : मुंबईकरांचा बसप्रवास आता आणखी गारेगार होणार असून बेस्ट प्रशासनाकडून आणखी आठ एसी डबल डेकर बस सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आणखी आठ एसी डबलडेकर बस मुंबईच्या रस्त्यांवर चालवण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाकडून घेण्यात आला असून पुढील आठवड्यापासून दक्षिण मुंबईतील विविध मार्गांवर या बस धावणार आहेत. या नव्या आठ एसी डबलडेकर बसमुळे आता एकूण डबलडेकर बसची संख्या बारा होणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून लोकेश चंद्रा (भाप्रसे) यांनी पदाची सूत्रे स्वीकारली आहे. याआधी ते मुंबई ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक पदी कार्यरत होते. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा हे १९९३ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी (दिल्ली) मधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी आणि एमटेक (स्ट्रक्चर्स) पदवी प्राप्त केली आहे.
नुकतेच व्यावसायिक राज्यनाट्य स्पर्धेत विजयी ठरलेल्या ‘सफरचंद’ या नाटकात अभिनय करणार्या आणि प्रायोगिक नाटकासाठी झटणार्या अवलिया प्रमोद शेलार यांचा जीवनप्रवास उलगडणारा हा लेख...
मुंबई : मागच्या वर्षी बेस्ट प्रशासनाने २१०० सिंगल डेकर बसचा करार टाटा मोटर्सने घेतलेल्या आक्षेपामूळे रखडला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य ठरवल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या ऑलेक्ट्रा आणि इव्हे ट्रान्सच्या इ बसेस आता बेस्टच्या ताफ्यात येणार असल्याने ई-बसेसची संख्या वेगाने वाढेल.
घराला घरपण देणारी ती स्त्री. मग ती आई असेल, बहीण, पत्नी किंवा अन्य कोणतेही नाते सांगणारी आणि काहीवेळेला नात्याला नाव नसले तरी घराला सर्वस्वी आपलेसे करणारी स्त्री. म्हणूनच तर विवाहानंतर गृहप्रवेशाच्या वेळी या गृहलक्ष्मीचे माप ओलांडून स्वागत करण्याची आपल्याकडे जुनीच प्रथा. पण, केवळ ‘गृहलक्ष्मी’, घराची ‘होम मिनिस्टर’ असे म्हणून महिला सक्षमीकरण होत नसते, तर प्रत्यक्ष कृतीत, सरकारच्या ध्येय-धोरणांतही त्याचे प्रतिबिंब हे उमटायला हवे.